जलसंपदा विभागात विविध ३६८ पदे रिक्त – WRD नवीन महत्वाचा अपडेट जाहीर!
WRD Maharashtra Recruitment 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
WRD Maharashtra Recruitment 2024
मित्रांनो,आताच प्राप्त अपडेट नुसार महाराष्ट्र जल संपदा विभागात विविध श्रेणीतील एकूण ३६८ पदे रिक्त आहे. या रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी हि मागणी आहे. प्रस्तुत अर्जान्वये आपणाकडून अपेक्षिलेल्या माहितीच्या अनुषंगाने कळविण्यात येते की मा. कार्यासनाशी संबंधित सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य), सहायक अभियंता श्रेणी २ (विवया), सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी) रिक्त पदांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. जलसंपदा विभागातील सहायक अभियंता (स्थापत्य) श्रेणी-२, गट व या संवर्गातील ३३४ पदे रिक्त आहेत, तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेना परिक्षा-२०२२ करिता १०२ पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार सदर पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १०१ उमेदवारांची शिफारस प्राप्त झालेली बसून सदर उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही सद्यस्थितीत सुरु आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०२४ मधील सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य), सहायक अभियंता श्रेणी-२ (विवय, सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी) या संवर्गातील मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आलेले नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स लवकरच नवीन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेले 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. अमरावतीच्या (Amravati News ) ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर 20 आणि 21 फेब्रुवारीला विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याच्या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर यांचे तीव्र पडसाद उमटत अनेकांनी या विषयी तक्रार दाखल करत हा प्रश्न लावून धरला होता. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच परीक्षेबाबत विश्वासहर्ता कायम राहावी या उद्देशाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबत राज्याचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी संबंधित विभागाला आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
लवकरच नवीन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
मृद व जलसंधारण विभागाची भरती प्रक्रिया परीक्षा रद्द
अमरावतीच्या ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर मृद आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यावेळी परीक्षा केंद्रांवर असलेल्या कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी लावून धरत आंदोलनाचा इशारा दिला होता. मृद व जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियंता पदाकरिता ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यात 52 हजार 690 विद्यार्थी बसले होते. तर सदर भरती प्रक्रिया ही टीसीएस मार्फत घेण्यात आली होती.
मात्र या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्या करिता गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्र घेत आपली मागणी लावून धरली होती, सोबतच संबंधित विभागाला अनेक तक्रारी देखील दिल्या होत्या. परिणामी ही परीक्षा रद्द करण्याचे आदेश राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला दिले आहे.
परीक्षा नवी, पण पेपर फुटीचा पॅटर्न तोच- विजय वडेट्टीवार
पेपर फुटीच्या या प्रश्नावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया एक्सवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला होता. त्यावेळी ते म्हणाले, WCD चा अमरावती येथील ड्रीमलँड सेंटरवर आज पुन्हा पेपर फुटला. जलसंधारण अधिकाऱ्यांनीच पेपर फोडून परिक्षार्थ्यांना उत्तरे पुरवल्याची माहिती आहे. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. परीक्षा नवी पण पेपर फुटीचा पॅटर्न तोच. या सरकार ला अजून काय पुरावे हवेत? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला होता.
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
जलसंपदा विभाग अंतर्गत “या” पदाची नवीन भरती जाहिरात
WRD Maharashtra Recruitment 2024
जलसंपदा विभागा अंतर्गत “वकील” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.
पदाचे नाव & तपशील: वकील
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक.
अर्ज पद्धती: ऑनलाइन (ई-मेल)
ई-मेल पत्ता: kidclegal@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents