विष्णुशास्त्री चिपळूणकर (1850 – 1882)यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८५० - मृत्यू : १८८२)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,867

विष्णुशास्त्री चिपळूणकर  (जन्म : पुणे, २० मे १८५०; मृत्यू : १७ मार्च १८८२) हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हेदेखील नामवंत लेखक होते.

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८५० – मृत्यू : १८८२)

विष्णुशास्त्री चिपळूणकर (1850 - 1882)यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

जन्म : २० मे १८५०

मृत्यू : १७ मार्च १८८२

जन्मगाव : पुणे महाराष्ट्र –

कार्यक्षेत्र : साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, राजकारण

पूर्ण नाव: विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर

वडिलांचे नाव : कृष्णशास्त्री हरिपंत चिपळूणकर (नामवंत लेखक होते)

पत्नी नाव : काशीबाई

भाषा : मराठी

साहित्य प्रकार: निबंध

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

प्रसिद्ध साहित्य : निबंधमाला

महाविद्यालयीन शिक्षण पुना कॉलेज (डेक्कन कॉलेज) येथे.

  • १८५७ प्राथमिक शिक्षण इन्फंड स्कूल पुणे येथे.
  • १८६१ पुना हायस्कूलमध्ये इयत्ता ४ थी पर्यंत इंग्रजीत शिक्षण.
  • १८६५ मॅट्रिकचे शिक्षण पुणे येथे पूर्ण.
  • १८६६ महाविद्यालयीन शिक्षण सुरवात डेक्कन कॉलेज (पुना कॉलेज) पुणे येथे.
  • १८६८ वडिलांनी सुरु केलेल्या शालापत्रक या मासिकाचे संपादक म्हणून काम सुरु केले.
  • १८७५ ब्रिटीश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी टीकेमुळे शालापत्रक हे मासिक ब्रिटीशांनी बंद पाडले.
  • जानेवारी १८७१ बाबा गोखले यांच्या शुक्रवार पेठ पुणे येथील शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
  • १८७१ मराठी व्याकरणातील निबंध व जॉन्सनच्या ‘रासेलस’ कादंबरीचे मराठीत भाषांतर केले.
  • १८७३ शाळा खाते प्रमुख चॅटफिल्ड यांनी वि. चिपळूनकरांची नियुक्ती पुना हायस्कूलमध्ये उपशिक्षकपदी केली.
  • २५ जानेवारी १८७४ : २४ वर्षी निबंधमाला हे मासिक पुणे येथुन सुरु केले.
  • मासिक जाहिरात सर्वप्रथम डिसेंबर १८७३ चा ज्ञानप्रकाश या प्रसिद्ध वृत्तपत्रातून दिली.
  • निबंधमाला मासिकाचा पहिला प्रास्ताविक लेख मराठी भाषेची सांप्रतची स्थिती (पहिला निबंध) शेवट ‘आमच्या देशाच्या स्थिती’ या निबंधाने

विष्णुशास्त्री चिपळूणकर (1850 - 1882)यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

  • निबंधमालेचे एकूण ८४ अंक प्रसिद्ध झाले होते.
  • ८ वर्षे हे मासिक अखंड चालले.
  • निबंधमालेचा उद्देश : बहुश्रुतता व योगय पुस्तकाची लोकांना माहिती देऊन मराठी भाषा समृद्ध करणे.
  • जून १८७६ विष्णूशास्त्रींनी Red Rag to a bull. (बैलाला तांबडी चिंधी) हा इंग्रजांना चिथावणारा लेख लिहिला. हा निबंधमाला मासिकातील ३० वा लेख होय.
  • जानेवारी १८७८ वि. चिपळूणकरांनी काशीनाथ नारायण साने, जर्नादन बालाजी मोडक यांच्या सहकार्याने काव्येतिहास संग्रह हे ४८ पानी मासिक काढले. या मासिकाचे व्यवस्थापक कृष्णाजी रघुनाथ केळकर व शंकर तुकाराम शालिग्राम हे होते.
  • १८७८ बाळकृष्ण जोशी यांना सोबत घेऊन किरण छापखान्याचे समान विकत घेऊन ‘चित्रशाळा’ व किताबखाना सुरु केले.
  • १८७९ रत्नागिरीतील शाळेच्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला.
  • २ जानेवारी १८८० – लो. टिळक, गो. ग. आगरकर, बाळाजी प्रभाकर भागवत, करंदीकर यांच्या सोबत पुण्यात ‘न्यु इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली.
  • १८८० आर्यभूषण हा छापखाना टिळक, आगरकर, नामजोशी यांच्या पुढाकाराने सुरु केला.
  • ४ जानेवारी १८८१ केसरीच्या पहिल्या अंकापासून केसरीतील मुख्या अग्रलेख विष्णुशास्त्री लिहीत असत. केसरीच्या पहिल्या अंकात त्यांनी उपाद्धात लिहिला आहे.
  • नोव्हेंबर १८८१ वयाच्या ३२ व्या वर्षी निबंधमाला या मासिकातील आमया देशाची स्थिती हा निबंध शेवटचा लिहिला. मार्च १८८२ विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे पहाटे ५:३० वाजता विषमज्वरामुळे निधन झाले.

विष्णुशास्त्री चिपळूणकर (1850 - 1882)यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

महत्त्वाचे :

१) शिवाजी महराज हे चिपळूणकर यांचे आराध्य दैवत होते.

२) यांचे वडिल कृष्णाजीपंत यांना बृहस्पती या पदवीने सन्मानित केले होते. कृष्णाजीपंत हे संस्कृत वेदपंडित, इंग्रजी पंडित या पाठशाळा चालवत असत.

१८५२ ला कृष्णजीपंत हे ट्रान्सलेटर व पुना ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपल होते व १८५१ मध्ये दक्षिणा प्राईज कमिटीचे सेक्रेटरी होते.

३) निबंधमालेतुन विष्णशास्त्री यांनी लोकभ्रंम, डॉ. जॉक्सन व मोरोपंताच्या कविता, लोकभ्रंम, शकुन, अपशकुन, धर्म चिंतन, आचारधर्म, विद्वत्व व कवित्व, भाषादूषण, लेखनशुद्धी, भाषापद्धती, भाषा शोधन, इतिहास, वकृत्व लोकहितवादी व भाषांतर अशा विषयांवर अनेक निबंध लिहिले आहेत.

४) विष्णूशास्त्री यांना सनातनी, प्रतिगामी विष्णूशास्त्री म्हटले गेले होते कारण विष्णूशास्त्री यांनी स्वामी दयानंद यांचा पुणे भेटीदरम्यान त्यांना ‘निर्दयानंद स्वरस्वती’ अशा शब्दांत टिका केली होती.

५) विष्णूशास्त्रींनी चित्रशाळा, आर्यभूषण, किताबखाना, न्यू इंग्लिश स्कूल या संस्था काढलेल्या होत्या.

६) विष्णूशास्त्री हे एक प्रखर राष्ट्रवादी आणि भारतीय संस्कृतीचे कट्टर स्वाभिमानी विचारवंत होते.

विचार :

१) भूक लागली म्हणजे व्याकरण खाता येत नाही, तहान लागली म्हणजे काव्यरस पिता येत नाही.

२) मेलेल्या माणसांना जिवंत करण्याची कला म्हणजेच चरित्रकला होय.

३) Coming events cast their shadows before (पुढे येणाऱ्या प्रसंगाच्या सावल्या आधीच पडतात.)

४) Hero is a hero at all point.

प्रभाव : वि. चिपळूणकर यांच्यावर डॉ. जॅक्सन, मेकॉले, ॲसिडन यांचा प्रभाव होता आणि डॉ. जाक्सन यांच्या रासेलस ही कादंबरी व Vanity of human wishes या दीर्घकाव्याचा प्रभाव होता.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम