वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १९१३- मृत्यू : १९७९)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
जन्म : १ जुलै १९१३ (विदर्भातील गहूली जिल्ह्यातील यवतमाळ)
आई : होनुबाई फुलसिंग नाईक
वडिल : फुलसिंग नाईक
शिक्षण: माध्यमिक शिक्षण खेड्यामध्ये, १९३८ ते १९४० एल. एल. बी.
लग्न : १९४१ प्रेमविवाह
पत्नी : वत्सलाबाई त्यांचे शिक्षण (बी. ए.)
त्यांची मुले : निरंजन, अविनाश
कृषीसेवेत काम : १९४३ ते १९४७ (पुसत कृषीमंडळाचे अध्यक्ष)
पक्ष : १९४६ मध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश
- महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ञ. त्यांचा जन्म विदर्भातील गहुली (जिल्हा यवतमाळ) येथे सधन शेतकरी कुटुंबात झाला.
- नाईकांचे मूळ आ डनाव राठोड; पण गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड याने वसविले. त्याने जमीनजुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले.
- साहजिकच तो वंजारी समाजाचा नाईक म्हणजे पुढारी झाला.
- त्यावरून पुढे नाईक हे आडनाव रूढ झाले.
- चतुरसिंगाचा फुलसिंग हा मुलगा पुढे या समाजाचा नाईक झाला.
- त्याच्या होनूबाई या पत्नीला दोन मुलगे झाले.
- राजूसिंग व हाजूसिंग.
- हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते.
- पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले.
- वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण विविध खेड्यांत झाले.
- पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०).
- विद्यार्थिदशेत त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांची छाप पडली.
- तसेच महाविद्यालयात असताना त्यांचा स्नेह नागपूरमधील घाटे या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी जडला.
- या स्नेहाची परिणती वसंतराव व वत्सलाबाई यांच्या आंतरजातीय प्रेमविवाहात झाली (१९४१).
- या विवाहामुळे विदर्भात थोडी खळबळ उडाली व उभयतांना काही वर्षे आपापल्या घरांपासून अलिप्त राहणे अपरिहार्य झाले; पण वसंतरावांनी पूर्ण विचारान्ती हे लग्न केले होते.
- त्यांची वकिलीही ठीक चालली होती. वत्सलाबाई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असतात. त्यांना दोन मुलगे निरंजन व अविनाश असून दोघेही सुविद्य आहेत.
- १९४६ ते १९५२ पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष
- १९५२ ते १९५६ राज्यांच्या महसुल खात्याचे उपमंत्री
- १९५७ – कृषीमंत्री
- ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७).
- प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले.
- ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले;
- त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला.
- कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत.
- त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या.
- विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते.
- २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
- त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य केले. १९७७ मार्चमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.
- १९६२ महसुल मंत्री
- १९६३ ते १९७५ महाराष्ट्राचे तीसरे मुख्यमंत्री
- १९७७ लोकसभेवर निवड, रोजगार हमी योजना
- मृत्यू १८ ऑगस्ट १९७९
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents