वनविभाग भरती शारीरिक चाचणीत गोंधळ, टायमिंग, मार्क्स मध्ये गोंधळ!
Van Vibhag Nagpur Recruitment 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Van Vibhag Nagpur Recruitment 2024
वनविभागाच्या सामाजिक वनीकरण खात्यासाठी गुरुवारी नागपुरातील मिहान परिसरात आयोजित शारिरीक चाचणी परिक्षेत गोंधळ निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. राज्यात अनेक ठिकाणी तलाठी पाठोपाठ वनरक्षक भरतीत गोंधळ पुढे येत आहेत हे विशेष. वनविभागाच्या सामाजिक वनीकरण खात्याच्या २७५ जागांसाठी नागपूरच्या मिहान परिसरातील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शारिरीक चाचणी परिक्षेत ५ हजारापेक्षा जास्त उमेदवार सहभागी झाले आहेत. विदर्भातील लांबून विद्यार्थी, पालक नागपुरात बुधवारपासून दाखल झाले आहेत. गुरूवारी सकाळी व दुपारी दोन सत्रात ही शारीरिक चाचणी होती. शारिरिक चाचणी परिक्षेत उमेदवारांनी केलेल्या रनिंगचा तपशील देण्यात यावा, अशी परीक्षार्थींची मागणी आहे. मात्र, शारिरिक चाचणी परिक्षेतील रनिंगचा तपशील उमेदवारांना देण्यात येणार नाही, असे वनविभागाच्या अधिका-यांची प्रतिक्रिया. यावरुनच उमेदवारांचा गोंधळ सुरू झाला. (Forest Department Recruitment 2024)
वन विभागाच्या वतीने वनरक्षक या पदासाठी महिला आणि पुरुष उमेदवारांची धाव चाचणी २१ फेब्रुवारी २०२४ पासून मौजा कलकुही, लुपिन चौक, मिहान येथे घेण्यात येत आहे. गुरुवारी मात्र या भरती प्रक्रियेत पालकांनी गोंधळ घातला. ३ किलोमिटरची धाव चाचणी पूर्ण केलेल्या महिला उमेदवारांना त्यांचे टायमिंग आणि मार्क सांगण्यात आले नसल्याचा आरोप पालकांनी केला. यामुळे काही काळासाठी येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर अधिकाऱ्यांनी पालकांची समजुत घालून त्यांना भरती प्रक्रिया इन कॅमेरा व पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याची माहिती दिल्यानंतर पालक शांत झाले.
भरती प्रक्रिया पारदर्शक
‘वन विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेली वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. यात सर्व प्रक्रीया आॅनलाईन असल्यामुळे कुठलाही मानवी हस्तक्षेप करण्यात येत नाही. सर्व उमेदवारांना त्यांचे टायमिंग आणि मार्क सांगण्यात येत आहेत. परंतु पालकांना टायमिंग आणि मार्क सांगणे ही वन विभागाची जबाबदारी नाही. आक्षेप घेतलेल्या पालकांना ही बाब समजुन सांगितल्यानंतर ते शांत झाले.’ -डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक तथा सदस्य सचिव प्रादेशिक निवड समिती नागपूर
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents