NCRB – शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
154

शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक

देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी अधिक आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २०१७-१८ मधील आकडेवारी जाहीर केली आहे.
 

नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरो ही गृह मंत्रालयातंर्गत येणारी संस्था आहे. देशभरातील गुन्हे व त्यांच्याशी निगडीत घटनांचे आकडेवारी एनसीआरबी जाहीर करते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बेरोजगारीमुळे वर्ष २०१८ मध्ये १२ हजार ९३६ लोकांनी आत्महत्या केली. तर, कर्ज व शेतीच्या इतर कारणांमुळे १० हजार ३४९ जणांनी आत्महत्या केली.

वर्ष २०१७ मध्ये १२ हजार २४१ जणांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली होती. तर, कृषी संकटामुळे १० हजार ६५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तर, वर्ष २०१६ मध्ये बेरोजगारांपेक्षा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक होते. त्यातही फारसा फरक नव्हता. वर्ष २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकरी-शेतमजुरांनी आत्महत्या केल्या होत्या. तर, ११ हजार १७३ बेरोजगारांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

 
सरसकट माफी सगळ्यांनाच आवश्यक आहे… तो शेतकरी असो की बेरोजगार… सर्वांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देऊन टाका… सरसकट… सरसकट… बेरोजगारांना बेरोजगार भत्ता द्या….
 
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, वर्ष २०१८ मध्ये ५७६३ शेतकऱ्यांनी आणि ४५८६ शेतमजुरांनी आत्महत्या केली. ५४५७ पुरुष शेतकरी आणि ३०६ महिला शेतकऱ्यांचा समावेश होता. शेतमजुरांमध्ये ४०७१ पुरुष आणि ५१५ महिलांचा समावेश होता.

आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचेही एनआरबीने म्हटले आहे. देशात वर्ष २०१८ मध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये ३.६ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१८ मध्ये १ लाख ३४ हजार ५१६ मृत्यू हे आत्महत्या म्हणून नोंद करण्यात आले होते. तर, वर्ष २०१७ मध्ये १ लाख २९ हजार ८८७ जणांनी आत्महत्या केली होती.

बेरोजगारांच्या आत्महत्यांमध्ये ८२ टक्के पुरुषांचा समावेश आहे.

 
या राज्यांमध्ये सर्वाधिक बेरोजगारांच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
  • केरळ (१५८५)
  • तामिळनाडू (१५७९)
  • महाराष्ट्र (१२६०)
  • कर्नाटक (१०९४)
  • उत्तर प्रदेश (९०२) 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम