उमाजी दादोजी नाईक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १७९१ - मृत्यू : १८३४)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
769

उमाजी दादोजी नाईक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

नाव : उमाजी दादोजी नाईक (खोमणे)

जन्म : ७ सप्टेंबर १७९१ (भिवंडी, पुणे)

मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३४ (खडकमाळ आळी, पुणे)

वडील : दादोजी खोमणे (नाईक)

आई :  लक्ष्मीबाई

उमाजी दादोजी नाईक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

  • महाराष्ट्राच्या इतिहासात महापराक्रमी यौद्ध्यांच्या नामावलीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा पराक्रम लक्षवेधून घेतो.
  • लढवय्य क्रांतीकारक आणि प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा पराक्रम प्रेरणा देत राहील.
  • इंग्रजाच्या सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगवत असताना त्याला पायबंद घालण्याचा विडा उचलून त्यांनी क्रांतीचा लढा उभारला.
  • राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे 7 सप्टेंबर 1791 रोजी झाला.
  • वडील दादोजी नाईक-खोमणे, आई लक्ष्मीबाई, भाऊ अमृता व कृष्णा, बहिण जिजाई, गंगू, म्हाकाळा, तुका व पार्वती असे कुटूंब.
  • वयाच्या 10 व्या वर्षी कुस्तीगीर म्हणून त्यांचा लौकिक होता.
  • सातारा गादीचे राजे प्रतापसिंह यांच्याकडून नसरापूरला राममंदिरात त्यांचा गौरव करण्यात आला होता.
  • कुशल शिस्तप्रिय संघटक आणि धाडसी बाणा यामुळे सुरवातीला 300 च्या वर सैन्याची त्यांनी जमवा जमव केली.

उमाजी दादोजी नाईक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

  • १८१८ भोर जवळील बिग गावात पहिला दरोडा.
  • १८१८ एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा तुरुंगवासामध्ये लिहीणे, वाचणे शिकले.
  • १८२४ उमाजीने भावुरडी इंग्रज खजिना लुटला.
  • १८२६ ईजांनी उमाजी विरुद्ध पहिला जाहीरनामा काढला.
  • १८२७ पुण्याचा कलेक्टर एच. डी. रॉबर्टसन यांच्याकडे खालील मागण्या केल्या.
    • इंग्रजांनी अमृता रामोशी व विनोबा यांना मुक्त करावे.
    • रामोशांची परंपरागत वतने परत करावीत.
  • इंग्रजांनी उमाजीला कैद करून उमाजीकडे पुणे व सातारा भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी उमाजीकडे सोपविण्यात आली. परंतु भोर संस्थानातील महसुलावरून संघर्ष झाला.
  • १५ डिसेंबर १८३१ भोर तालुक्यातील उतरोली या गावी बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले.
  • उमाजीवर देशद्रोहाचा खटला जेम्स टेलर या न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली झाला.
  • ३ फेब्रुवारी १८३४ पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत ४३ व्या वर्षी फासी देण्यात आली.
  • उमाजी बरोबर त्याचे साथीदार खुशाबा नाईक व बापू सोळकर यांनाही फाशी दिली.
  • अशा महापुरुषाचे प्रेरणादायी स्मारक त्यांच्या जन्मगावी भिवडी येथे उभारण्याची घोषणा अनेकवेळा झाली.
  • पण योग्य तो न्याय अजून राजे उमाजी नाईक यांना मिळाला नाही.
  • इतिहासकारांनी त्यांना हवे ते स्थान दिले नसले तरी जनतेच्या मनात स्वातंत्र्याचे महानायक म्हणून उमाजीराजांचे स्थान अबादीत आहे.
  • थरकाप उडविणा-या त्यांच्या मोहीमांच्या दंतकथा आजही लोक मोठ्या आपुलकीने सांगत असतात.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम