दहावी पंचवार्षिक योजना
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
दहावी पंचवार्षिक योजना
कालावधी : 1 एप्रिल,2002 ते 31 मार्च, 2007
मुख्यभर : शिक्षण व प्राथमिक शिक्षण
गांधीवादी प्रतिमान
सर्वसामान्य विकासाचे धोरण.
प्राधान्य देण्यात आलेले क्षेत्र :
1. ऊर्जा-25%
2. सामाजिक सेवा-22.8%
3. कृषि व ग्रामीण विकास-20%
4. वाहतूक-14.8%
अपेक्षा वृद्धी दर : 8%
प्रत्यक्ष वृद्धी दर : 7.8%
योजनेची लक्ष्ये :
1. GDP च्या वाढीच्या दराचे लक्ष्य- प्रतिवर्षी 8%
2. दरिद्रय रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण 2007 पर्यंत 21% तर 2012 पर्यंत 11% पर्यंत कमी करणे.
3. 2001 ते 2011 या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर 16.2% पर्यंत कमी करणे.
4. साक्षरतेचे प्रमाण 2007 पर्यंत 75% पर्यंत तर 2012 पर्यंत 80% पर्यंत वाढविणे.
5. माता मृत्यू प्रमाण (MMR) 2007 पर्यंत दर हजारी 45 पर्यंत तर 2012 पर्यंत दर हजारी 28 पर्यंत कमी करणे.
6. बाळमृत्यू प्रमाण (IMR)2007 पर्यंत दर हजारी 45 पर्यंत तर 2012 पर्यंत दर हजारी 28 पर्यंत कमी करणे.
7. 2003 पर्यंत सर्व मुले शाळेत हजर तर 2007 पर्यंत सर्व मुलींना 5 वर्षाचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण करावा, हे साध्य करणे.
8. 2012 पर्यंत सर्व खेड्यांना शाश्वत स्वच्छ पेयजल पुरवठा.
9. 2007 पर्यंत सर्व मोठ्या प्रदूषित नद्यांची स्वच्छता.
योजनेत सुरू करण्यात आलेल्या योजना :
1. सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना : (social security pilot scheme) (23 जानेवारी 2014)
2. वंदे मातरम योजना : (9 फेब्रुवारी 2014 )
3. राष्ट्रीय कामगार अन्न योजना : (national food for work programmed) (14 नोव्हेंबर 2004)
4. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : (National Rural Employment Guarantee scheme) (2 फेब्रुवारी 2004)
5. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान : (Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission : JNNURM) (3 डिसेंबर 2005)
योजनेची फलनिष्पती :
1. दहाव्या योजनेदरम्यान 7.6% एवढी सरासरी वर्षीक वृद्धी दर प्राप्त झाला.
2. उद्योग व सेवा या अर्थव्यवस्थांच्या दोन प्रमुख क्षेत्रांमध्ये दहाव्या योजनेदरम्यान प्राप्त करण्यात आलेली वृद्धी दर जवळजवळ साध्य झाला.
3. कृषि क्षेत्र 4% वार्षिक वृद्धीचे लक्ष्य होते. साध्य प्राप्त आकड्यांनुसार केवळ 2.13% एवढा वृद्धी दर प्राप्त झाला.
4. सध्य प्राप्त आकड्यांनुसार या योजनेत चालू किमतीची गुंतवणूक दर जीडीपीच्या 30.8% राहिला, त्याचे लक्ष्य 28.41% एवढे होते.
5. योजना कालावधीत चलन वाढीचा दर सरासरी 5% ठेवण्याचे लक्ष्य होते. मात्र प्रत्यक्षात तो 5.1% एवढा ठरला.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents