तलाठी भरती उर्वरित १३ जिल्ह्यांचा निकाल लवकरच होणार जाहीर!

Talathi Bharti Result 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
7,018

 

Talathi Bharti Result 2023

 

तलाठी उर्वरित 13 जिल्ह्याचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अपडेट  आणि निकाल उपलब्ध झाल्यावर आम्ही लगेच येथे अपडेट करू.  तसेच, तलाठी अंतिम गुणवत्ता यादी 2023-24 सर्व जिल्ह्यांसाठी PDF स्वरूपात खाली दिलेल्या आहेत. उमेदवार त्यांचे तलाठी भरतीचे फायनल म्हणजेच अंतिम निकाल 2023 PDF खाली शेअर केलेल्या थेट लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात. PDF मध्ये उमेदवारांची नावे, रोल नंबर आणि गुण यांचा उल्लेख आहे.

उपरोक्त तलाठी पदभरती परीक्षा 2023 च्या अनुषंगाने विचाराधीन उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षाधीन यादी www.gondia.nic.in या संकेत स्थळावर दिनांक 23.01.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून जिल्हा निवड समिती समक्ष उमेदवारांचे मूळ शैक्षणीक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी दि. 05/02/2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे उपस्थित राहण्याकरीता विचाराधीन उमेदवारांना तसेच प्रतिक्षाधीन उमेदवारांना दुरध्वनीव्दारे तसेच ई-मेल व्दारे या कार्यालयाकडून सूचित करण्यात आले होते. दिनांक 05/02/2024 रोजी जिल्हा निवड समिती समक्ष झालेल्या मूळ शैक्षणीक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवजांच्या तपासणीकरीता उक्त वर नमूद अ.क्र. 1 ते 2 व 7 वरिल विचाराधीन व अ.क्र. 3 ते 6 व अ.क्र. 8 ते 9 वरिल प्रतिक्षाधीन उमेदवार अनुपस्थित असल्याने त्या उमेदवारांना शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक 21 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा निवड समिती मार्फत अनुपस्थित असलेल्या उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

 

तरी उक्त उमेदवारांनी जाहिरातीत नमूद सर्व मुळ कागदपत्रे, फॉर्म भरल्याची प्रत, चालान प्रत तसेच इतर आवश्यक दस्तऐवजांसह (सर्व मुळ कागदपत्रासह) तसेच सर्व कागदपत्रांची । छायांकित प्रत साक्षांकित सह दिनांक 21.02.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे न चुकता उपस्थित राहावे. उक्त दिनांक 21/02/2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे कागदपत्रे / दस्तऐवज पडताळणी/तपासणी करीता गैरहजर राहिल्यास सदरील गैरहजर उमेदवार निवड सुचितील आपले स्थान गमावून बसतील व गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. का.टि. मा. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने.

 

तलाठी पदभरती 2023 – कागदपत्रे पडताळणी दि. 21/02/2024 सकाळी 11:00 वा. तलाठी पदभरती 2023 – कागदपत्रे पडताळणी दि. 21/02/2024 सकाळी 11:00 वा. 14/02/2024 21/02/2024 पहा (277 KB) 

 

 

 

 


तलाठी भरती २०२३ सर्व जिल्ह्यांच्या नवीन निवड याद्या जाहीर

Talathi Bharti Result 2023 Check Now, Cut off Marks and Merit List

Talathi Bharti Result 2023 : बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. भूमिअभिलेख विभागाने पेसा अंतर्गत असलेले ते १३ जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे. खालील लिंक वर यादी उमेदवारांना पाहता येईल.

हि निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या १३ जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार आहे.पेसा वगळता अन्य २३ जिल्ह्यांमधील जिल्हा निवड समिती यांनी ही निवड यादी तयार केली आहे संबंधित यादी सर्व उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य समन्वयक, तलाठी परीक्षा तथा प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली. निवड प्रतीक्षा यादीनंतर उमेदवारांची ओळख, प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्रे यांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळणी तसेच समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही नियुक्ती पूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समिती मार्फत केली जाणार आहे.

तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी ६ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. त्यात १३ आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. भूमी अभिलेख विभागाकडून हे युद्धपातळीवर करण्यातमित्रांनो, तलाठी परीक्षेतील गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर २३ जिल्ह्यांतील रिक्त पदांनुसार जात संवर्गाप्रमाणे उमेदवारांची जिल्हानिहाय निवड याद्या आता जाहीर करण्यात येत आहे.

तसेच, येत्या आठवडाभरापर्यंत पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली.


तलाठी भरती उर्वरित १३ जिल्ह्यांचा निकाल लवकरच होणार जाहीर!

तलाठी भरती निकाल 2023 – निवड यादी व प्रतीक्षा यादी

 

तलाठी भरती उर्वरित १३ जिल्ह्यांचा निकाल लवकरच होणार जाहीर!

App Download Link : Download App

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाभूमी वर प्रकाशित याद्यांची सरळ लिंक

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

मागील अपडेट!

तलाठी भरती निकाल जानेवारी मध्ये जाहीर होणार, नवीन अपडेट!

Talathi Bharti Result 2023 : बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ उमेदवारांकडून आलेले आक्षेप, १४६ प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती, अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते.

छाननी अंती ४४६६ जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुदत दिली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांनी नोंदवले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत.

दरम्यान, परीक्षेत एकूण ५७०० प्रश्न होते. आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टीसीएस कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याची माहिती त्यांनी दिली. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे, नरके म्हणाल्या.

परीक्षार्थी संख्या फार मोठी होती. त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, म्हणून अगदी काटेकोरपणे, कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील दोन दिवसांत निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

राज्यात झालेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणखी काही मदत करता येईल का, याबाबतही सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या विखे-पाटील यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात ४ हजार ७९३ तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यात १० लाख ४१ हजार ७१३ जणांनी अर्ज केले होते. यापैकी प्रत्यक्ष ८ लाख ६४ हजार ९६० जणांनी परीक्षा दिली दरम्यान, अनुकंपातत्त्वावर तलाठी नियुक्त्या झाल्या. यामुळे पदांची संख्या कमी झाली होती. दरम्यान, वाढीव पदासाठी राज्य शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर राज्यभरात १४९ पदे वाढवून देण्यात आली. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत विविध टप्प्यांत ऑनलाईन परीक्षा झाली. परीक्षा झाल्यापासून उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. याबाबत विचारता विखे- पाटील यांनी परीक्षेचा निकाल लावण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्णत्वाकडे आली आहे. यामुळे लवकरच या परिक्षेचा निकाल जाहीर होईल, असे सांगितले. 

 

राज्यात अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांचे या पावसाने नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय नियमानुसार मदत केली जाणारच आहे. त्याहीपेक्षा आणखी काही मदत करता येईल का, याबाबतही विचार सुरू असल्याचेही विखे-पाटील यांनी नमूद केले.


Talathi Bharti Result 2023

Talathi Bharti Result 2023 : राज्यात झालेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणखी काही मदत करता येईल का, याबाबतही सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या विखे-पाटील यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात ४ हजार ७९३ तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली.

 

 या परीक्षेसाठी राज्यात १० लाख ४१ हजार ७१३ जणांनी अर्ज केले होते. यापैकी प्रत्यक्ष ८ लाख ६४ हजार ९६० जणांनी परीक्षा दिली दरम्यान, अनुकंपातत्त्वावर तलाठी नियुक्त्या झाल्या. यामुळे पदांची संख्या कमी झाली होती. दरम्यान, वाढीव पदासाठी राज्य शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर राज्यभरात १४९ पदे वाढवून देण्यात आली. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत विविध टप्प्यांत ऑनलाईन परीक्षा झाली. परीक्षा झाल्यापासून उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. याबाबत विचारता विखे- पाटील यांनी परीक्षेचा निकाल लावण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्णत्वाकडे आली आहे. यामुळे लवकरच या परिक्षेचा निकाल जाहीर होईल, असे सांगितले. 

राज्यात अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांचे या पावसाने नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय नियमानुसार मदत केली जाणारच आहे. त्याहीपेक्षा आणखी काही मदत करता येईल का, याबाबतही विचार सुरू असल्याचेही विखे-पाटील यांनी नमूद केले.

तलाठी भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी अंती ४ हजार ४६६ जागांसाठी दहा लाख ४१ ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४.९६० उमेदवारांनी राज्यातील केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा दिली होती. 

 

Talathi Bharti Result 2023 : राज्यात नुकत्याच झालेल्या तलाठीपदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहेत. येत्या रविवारपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर आठवड्याभरात हरकतीचे संकलन करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत. मात्र, अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात येईल. बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेचा निकाल डिसेंबरमध्ये जाहीर करून नव्या वर्षात प्रजासत्ताक दिनी नवनियुक्त तलाठयांना नियुक्तिपत्रे देण्याचा भूमी अभिलेख विभागाचा मानस आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली, त्यांना उत्तरतालिका पाहून त्यावर हरकती घेण्यास दिलेली मुदत ८ ऑक्टोबरला संपली. प्राप्त हरकतींची तपासणी करून योग्य हरकतींना ३ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दिले जाणार आहे. 

 

राज्यात ४ हजार ४६६ तलाठी पदांसाठी तब्बल ८ लाख ५६ हजार जणांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा ५७ टप्प्यांत घेण्यात आली. त्यानंतर प्रत्येक टप्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. आठवड्याभरात हरकतीचे संकलन करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत. मात्र, अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात येईल. त्यामुळे नियुक्तीपत्र जानेवारी महिन्यात भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागाच्या सूत्रांनी दिली.

 

 

तलाठी भरती उर्वरित १३ जिल्ह्यांचा निकाल लवकरच होणार जाहीर!

 

Talathi Bharti Result 2023 : तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी अंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१. ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४.९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा. २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे करण्यत आले होते. एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली. परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांना उत्तरपत्रिका पाहण्याची आणि त्यावर काही हरकती असल्यास त्या नोंदविण्याची सुविधा दिली होती. ही मुदत आता संपली आहे. प्राप्त हरकती परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून एकत्रित केल्या जात आहेत. प्रत्येक सत्राला वेगळी प्रश्नपत्रिका देण्यात आली होती.

 

त्यामुळे नेमक्या किती हरकती प्राप्त झाल्या. याबाबत टीसीएसकडून पुढील आठवड्यात माहिती प्राप्त होणार आहे. त्यापैकी योग्य हरकतींचे ३ नोव्हेंबरपर्यंत निराकरण केले जाणार आहे. तसेच हरकत योग्य असल्यास संबंधित सत्रातील उत्तरतालिका बदलण्यात येणार आहे. अशी माहिती अप्पर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी दिली. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा १५ डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे.


तलाठी भरती उर्वरित १३ जिल्ह्यांचा निकाल लवकरच होणार जाहीर!

 

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

 

Talathi Bharti Result 2023

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम