तलाठी भरती : बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आणि कागदपत्र पडताळणी बद्दल प्रसिद्धिपत्र जाहीर!
Talathi Bharti 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Talathi Bharti 2024
बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील निवड झालेल्या ज्या उमेदवारांची जिल्हा निवड समितीकडून चारित्र्य, वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे, अशा सुमारे एक हजार उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. तसेच या नवनियुक्त तलाठ्यांना निवडपणक कामकाजातळी महभागी करून घेतले जाणार आहे. तलाठी परीक्षेतील २३ जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी २३ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील ज्या उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी पूर्ण झाली आहे. अशा उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित नियुक्ती पत्रे आचारसंहिता संपल्यानंतर दिली जातील.
तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर प्रश्न-उत्तरांबाबत आक्षेप मागवण्यात आले आणि त्यांचे निराकरण करण्यात आले. ही सर्व पकिया केल्यानंतर तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. भरतीचा पुढील टप्पा म्हणून २३ जानेवारी रोजी राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम परभणी बीड लातर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली, अशा २३ जिल्ह्यांमधील निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली. त्यानुसार आचारसंहिता लागण्यापूर्वी सुमारे एक हजार नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित पत्रे आचारसंहितेनंतर दिल्ली जाणार आहेत.
App Download Link : Download App
परीक्षेतील २३ जिल्ल्यांमधील उमेदवारांची निवड व प्रतीक्षायादी २३ जानेवारीला रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाने जाहीर केली असून, चालू आठवड्यापर्यंत संबंधित उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात येणार आहे. मात्र, आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे या १३ जिल्ह्यांमधील तलाठी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुमारे दोन हजार उमेदवारांचे भवितव्य तूर्त अधांतरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील २३ जिल्ह्यांतील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू आहे.
तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी अंती ४४६६ जागांसाठी १० लाख ४९ हजार ७१३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांकडून हरकती, आक्षेप मागविणे, त्यांचे निराकरण आदी प्रक्रिया पूर्ण करून तलाठी भरती परीक्षेची गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आणि भरतीचा पुढील टप्पा म्हणून २३ जानेवारीला रात्री उशिरा राज्यातील २३ जिल्ल्यांमधील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली.
या २३ जिल्ह्यांमधील निवड यादीत अराखीव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अशा विविध प्रवर्गातील सुमारे २५२६ उमेदवार आहेत. या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे पडताळणी, चारित्र्य पडताळणी आणि परीक्षेला जाताना उमेदवारांनी जो अंगठा यंत्रावर दिला आहे, निवड झालेल्या उमेदवाराचा आणखी एकदा अंगठा घेऊन परीक्षेला बसलेला आणि निवड झालेला उमेदवार तोच आहे किंवा कसे? आदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यापैकी पडताळणीत संबंधित उमेदवार गळाल्यास तातडीने प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला निवड समिती पाचारण करत आहे. ही सर्व प्रक्रिया होऊन पुढील आठवड्यापासून नियुक्तीपत्रांचे वाटप करण्याचे नियोजन आहे.
मूळ ओळखपत्र (मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स) पडताळणी वेळी सादर करावे. https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याचा पुरावा. दिव्यांग, खेळाडू, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन या समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज केलेल्यांनी विहित नमुन्यातील मूळ प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, चारित्र्य व पूर्वचारित्र्य पडताळणीसाठी सोबतच्या परिशिष्ट- क मध्ये जोडलेला साक्षांकन नमुना परिपूर्ण भरून (दोन प्रतीत) प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर करावा.
कोणत्याही आरक्षणाचा अथवा सोयी-सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा/ नियम/आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. मागासवर्ग (अ.जा./अ.ज. वगळून) प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी भरलेला सेतू कार्यालयातील अर्ज व सादर केलेली सर्व कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस दोन प्रतीत स-साक्षांकित करून सादर करावीत. पडताळणीस अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना तलाठी भरती २०२३ मधील निवड प्रक्रियेकरिता दावा करता येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे सचिव शिवकुमार स्वामी यांनी म्हटले आहे.
असे आहे वेळापत्रक
- सोमवारी (ता. पाच) ११ वाजता : निवड यादीतील अराखीव (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी.
- मंगळवारी (ता. सहा) : दुपारी एक वाजता निवड यादीतील इमाव, विमाप्र, भजड, भजकभजब, विजाअ, अज, अजा प्रवर्गातील उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासणी होईल.
- बुधवारी (ता. सात) : सकाळी ११ वाजता प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवार तसेच तलाठी भरतीच्या अनुषंगाने निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी.
- गुरुवार (ता. आठ) : सकाळी ११ वाजता निवड यादीमधील सर्व सामाजिक प्रवर्गांतील सर्व उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी.
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents