तलाठी भरती ‘नॉर्मलायजेशन’ प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात

Talathi Bharti 2024

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,625

Talathi Bharti 2024

तलाठी भरती परीक्षा प्रक्रियेतील नॉर्मलायजेशनवर आक्षेप आणि भ्रष्ट कारभाराचा आरोप करुन विद्यार्थी रस्त्यावरुन आंदोलन करीत आहेत. मात्र, मोठ्या संख्येने विद्यार्थी जेव्हा परीक्षा देतात, त्यावेळी सामान्यीकरण (नॉर्मलायजेशन) प्रक्रिया राबवावीच लागते, असा दावा टीसीएस संस्थेने केला आहे. दुसरीकडे, परीक्षांसाठी भरमसाठ वाढवलेले शुल्क, पेपर फुटी प्रकरणे आणि एकूणच अनागोंदीवर मात्र संस्थेने आणि सरकरी यंत्रणणेही चुप्पी साधलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात संतापाची लाट कायम आहे.

 

राज्यभरात झालेली तलाठी परीक्षा सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते. परीक्षेतील सामान्यीकरणानंतर (नॉर्मलायजेशन) अनेक विद्यार्थ्यांचे गुण कमी तर काहींचे अधिक झालेले आहेत. त्यातही ४८ विद्यार्थ्यांना तर २०० पैकी २०० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत! मुळात संशयास्पद असलेल्या टीसीएस आणि आयबीपीएस या दोन्ही संस्था रद्द करुन एमपीएससीमार्फतच घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

 

विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करा
तलाठी भरती निकालानंतर सामान्यीकरणामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर केला पाहिजे. सरळसेवा भरतीची परीक्षा देणारे विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील असतात. भरमसाट शुल्क असल्याने एकाच वेळी अनेक जाहिरातीचे फॉर्म विद्यार्थी भरू शकत नाहीत. परिणामी अभ्यास असूनही ते हतबल असतात. म्हणून सर्वप्रथम शुल्क कमी केले पाहिजे. सातत्याने पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा आता परीक्षांवर विश्वास राहिला नाही. काळाची पाऊले ओळखून सरकारने या बाबींची दखल घेतली पाहिजे.

 

सदर परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते. कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावणेसाठीची हि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. गुण सामान्यीकरणची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड, एस एस सी, म्हाडा इत्यादी मध्ये नोकर भरतीसाठी यापूर्वी वापरण्यात आली आहे.(Latest Marathi News)

 

TCS तर्फे देण्यात आलेले पूर्ण स्पष्टीकरण

 


तलाठी भरती; कट ऑफ होणार की पुन्हा परीक्षा द्यायची?

Talathi Bharti 2024

 

तलाठी भरतीसाठी झालेल्या परीक्षेतील घोळ उघडकीस आल्यानंतर ही परीक्षा पास झालेल्या भावी तलाठ्यांच्या भरतीची नौका वादंगात सापडली आहे. परीक्षार्थीमध्ये कट ऑफ किती मार्काना लावणार, आता ज्यांना १५० ते २०० दरम्यान मार्क मिळाले ते तरी खरे आहेत का, किंवा पुन्हा परीक्षा द्यावी लागणार, असा संभ्रम आहे.

तीन भागांत ५७ सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेस महाराष्ट्रातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांवरील उत्तरांबाबतच्या शंकांचे निरसन आयसीपीएस कंपनीने केले असून, ही तलाठी भरती मेरिटनुसारच होईल, याविषयीची मेरिट लवकरच जाहीर केले जाईल, असा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे.

 

प्रशासनही अंधारात

जिल्ह्यात तलाठीची ५६ पदे रिक्त आहेत; पण त्यामध्ये वाढ झाल्याचे समजले आहे. काही सज्जे फोडण्यात आले आहेत; पण किती आणि ते कोणकोणते सज्जे आहेत, हे माहिती नाही. कोणत्या आरक्षणाअंतर्गत तिथे भरती केली जाईल हे अंधारात आहे. स्थानिक प्रशासनाकडे फक्त परीक्षा घेण्याची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांच्याकडेही या प्रश्नांची उत्तरे नाहीत

 

सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. कारण, जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत, त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थ्याच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही.

 

गुण जास्त दिसत असले तरी मेरिटप्रमाणे नियुक्ती
– राज्यात तलाठी भरती पारदर्शकपणे झालेली असून, काही प्रश्नांचे सामान्यीकरण केल्याने गुणांत वाढ दिसत आहे. याबाबत सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. मात्र, ही संधी साधून विरोधक बेछूट आरोप करत आहेत. अशांविरोधात बदनामी केल्याबद्दल गुन्हे दाखल करू, अशा इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

– याबाबत मंत्री विखे-पाटील म्हणाले की, राज्यात ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षा दिली. टीसीएस कंपनीमार्फत ही परीक्षा झाली. त्यात काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे किंवा कठीण असल्याचे पुढे आल्यानंतर सामान्यीकरण पद्धतीतून ती दुरुस्ती करण्यात आली. या प्रश्नांना सरसकट गुण दिल्याने काहींचे गुण २०० पेक्षा जास्त दिसत आहेत. यापूर्वीच्या जेवढ्या काही परीक्षा झाल्या, त्यातही सामान्यीकरणाची पद्धत वापरलेली आहे. गुण जास्त दिसत असले तरी त्याच मेरिटप्रमाणे नियुक्ती दिली जाईल.

 

तलाठी भरती परीक्षेत ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात, असाही खुलासा प्रभारी राज्य परीक्षा समन्वयकांकडून करण्यात आला आहे.

 

 


तलाठी भरती गुणवत्ता यादी आठवड्यात होणार जाहीर

Talathi Bharti 2024

 

मित्रांनो, आत्ताच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तलाठी भरतीची याच आठवड्यात गुणवत्ता यादी जाहीर होईल. तसेच तलाठी भरती प्रक्रियेत कुठलीही अनियमितता झाली नसल्याचं देखील सांगण्यात येतंय. भरती प्रक्रिया राबवणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूटची सोमवार 8 जानेवारी रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. वाढीव गुण हा मुल्यांकनाचा एक भाग असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलीये. 

 

या भरती प्रक्रियेदरम्यान एकूण 500 हरकती आलेल्या होत्या. त्यापैकी 24 हरकती स्विकारण्यात आल्या आहेत. शहीद भगतसिंग यांच्या संदर्भातील प्रश्नावर सर्वात जास्त हरकती आल्याची माहिती समोर आलीये. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यामुळे पाच हजार पदांसाठी राबवलेल्या तलाठी भरतीची गुणवत्ता यादी याच आठवड्यात जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

 

200 पेक्षा जास्त गुण कसे मिळाले, कारण समजून घ्या?
सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल, तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत. त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही.

तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये 17 ऑक्टगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये ३ भागात एकूण 57 सत्रामध्ये घेण्यात आली. सदर परीक्षेस महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण 10,41,713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. सदर उमेदवारांपैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली. परिक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे TCS कंपनीने तीन वेळा शंकासमाधान (एकूण 149 प्रश्नांचे) केले. दिनांक 04/01/2024 अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर टीसीएस कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानुसार 57 सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे 57 प्रश्न पत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

 

 


 

तलाठी भरती परीक्षा २०२३ दिनांक १७/०८/२०२३ ते १४/०९/२०२३ या कालावधीमध्ये ३ भागात एकूण ५७ सत्रामध्ये घेण्यात आली आहे. सदर परीक्षेस महाराष्ट्र भरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण १०,४९,७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. सदर उमेदवारांपैकी ८,६४,९६० उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. परिक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे TCS कंपनीने तीन वेळा शंकासमाधान (एकूण १४९ प्रश्नांचे) केले आहे. दिनांक ०४/०१/२०२४ अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर टीसीएस कंपनी द्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानुसार ५७ सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे ५७ प्रश्न पत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सदर गुण सामान्यीकरण पद्धती www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर दिनांक २७/०९/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक ०५/०१/२०२४ रोजी या सामान्यीकरण केलेल्या गुणानुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यीकृत गुण (normalised score) www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल टॅब वर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

 

 

दिनांक ०७/०१/२०२४ रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी माध्यमातून या सामान्यीकृत गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही.

 

सदर परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते. कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावणेसाठीची हि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. गुण सामान्यीकरणची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड, एस एस सी, म्हाडा इत्यादी मध्ये नोकर भरतीसाठी यापूर्वी वापरण्यात आली आहे.(Latest Marathi News)

 

TCS तर्फे देण्यात आलेले पूर्ण स्पष्टीकरण

 

 


तलाठी परीक्षेत नवीन गोंधळ, गैरव्यवहार झाल्यास परीक्षाच रद्द करू – देवेंद्र फडणवीस!

Talathi Bharti 2024

तलाठी भरती ‘नॉर्मलायजेशन’ प्रक्रिया वादाच्या भोवऱ्याततलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका घेतली.

 

तलाठी भरती ‘नॉर्मलायजेशन’ प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात

 

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट दिली. त्यांनी कार्यालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तलाठी भरतीत राज्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल.

 

तलाठी भरती ‘नॉर्मलायजेशन’ प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात

App Download Link : Download App

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम