तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला!

Talathi Bharti 2023 Result

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
15,684

Talathi Bharti 2023 Result

तलाठी भरती परीक्षेच्या सुरुवातीच्या गुणवत्ता याद्यांमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार भूमी अभिलेख विभागाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित गुणवत्ता यादीनुसार अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे, यात राज्यात सर्वाधिक २१४ गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचांही समावेश आहे. तलाठी भरती परीक्षेतील काही परीक्षा केंद्रांवर झालेला गोंधळ आणि धाराशिव, लातूर येथील केंद्रावरील गैरप्रकारांच्या तक्रारीनंतरही भरती पारदर्शक पद्धतीनेच झाल्याचा दावा राज्य सरकारने केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यात सुरुवातीच्या गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार आता अपात्र ठरले आहेत. याशिवाय ७० संशयित उमेदवारांचे निकालही थांबवण्यात आले आहेत.

 

तलाठी भरतीसाठी टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा एकूण ५७ सत्रांमध्ये १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर टीसीएस कंपनीने २८ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत प्रश्न-उत्तरांबाबत प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा समितीसह अनेक उमेदवारांनी भरतीमधील चुकांवर आक्षेप घेतला. काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करूनच निकाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी काही संशयित उमेदवारांची नावेही देण्यात आली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत भूमी अभिलेख विभागाने जानेवारीत गुणवत्ता यादी जाहीर केली. परंतु, काही उमेदवारांनी परीक्षेतील प्रश्नांबाबत आक्षेप नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. त्यावर याचिकाकर्त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार प्रश्नोत्तर तालिकेतील एकूण २१९ प्रश्नांमध्ये/त्यांच्या उत्तर सूचीत बदल करण्यात आले. एकूण ३९ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त केले गेले. २१९ प्रश्नांतील बदलामुळे गुणवत्ता यादीमध्ये बदल झाल्याने जानेवारीतील गुणवत्ता यादीत पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार आता अपात्र ठरले आहेत. महसूल विभागाने संपूर्ण तपासणी न करता निकाल जाहीर केल्याने हा गोंधळ उडाला. आम्ही नावे दिलेल्या संशयितांचा निकाल थांबवला आहे. आतातरी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करूनच नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.

 

 


तलाठी भरती नवीन सुधारित गुणवत्ता याद्या जाहीर

Talathi Bharti 2023 Result

 

तलाठी भरती निवड यादी व प्रतिक्षा यादी ( सुधारित गुणवत्ता यादी ) नुसार

 

 कोल्हापूर  सिंधुदुर्ग  गोंदिया  अकोला  बुलडाणा  नागपूर
 परभणी  जळगाव  मुंबई  रत्नागिरी  भंडारा  लातूर
 नाशिक  धुळे  रायगड  जालना  अहमदनगर  सोलापूर
 बीड  नांदेड  मुंबई उपनगर  यवतमाळ  हिंगोली  ठाणे
 अमरावती  सातारा  सांगली  वर्धा  चंद्रपूर  पालघर
 छत्रपती संभाजीनगर  धाराशिव  नंदुरबार  वाशिम  गडचिरोली  पुणे

 

तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला!

 

 

 

 


 

तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या असून खालील लिंक वरून आपण बघ शकता . या संदर्भातील पुढील अपडेट  आम्ही लगेच येथे प्रकाशित करू.  तसेच, तलाठी अंतिम गुणवत्ता यादी 2023-24 सर्व जिल्ह्यांसाठी सुधारित गुणवत्ता याद्या PDF स्वरूपात खाली दिलेल्या आहेत. उमेदवार त्यांचे तलाठी भरतीचे सुधारित गुणवत्ता याद्या निकाल 2023 PDF खाली शेअर केलेल्या थेट लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात. PDF मध्ये उमेदवारांची नावे, रोल नंबर आणि गुण यांचा उल्लेख आहे.

 

 

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय सुधारित गुणवत्ता यादी 


 अकोला  अमरावती  यवतमाळ  वाशिम  गडचिरोली  नागपूर
 धुळे  गोंदिया  नाशिक  अहमदनगर  नांदेड  नंदुरबार
 पालघर  पुणे  बीड  बुलडाणा  भंडारा  रायगड
 मुंबई  मुंबई उपनगर  कोल्हापूर  रत्नागिरी  लातूर  वर्धा
 सातारा  सांगली  सिंधुदुर्ग  सोलापूर  हिंगोली  परभणी
 छत्रपती संभाजीनगर  चंद्रपूर  जळगाव  जालना  धाराशिव  ठाणे
  यादी १ (निकाल राखीव)  यादी २

 

 

तलाठी उर्वरित 13 जिल्ह्याचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अपडेट  आणि निकाल उपलब्ध झाल्यावर आम्ही लगेच येथे अपडेट करू.  तसेच, तलाठी अंतिम गुणवत्ता यादी 2023-24 सर्व जिल्ह्यांसाठी PDF स्वरूपात खाली दिलेल्या आहेत. उमेदवार त्यांचे तलाठी भरतीचे फायनल म्हणजेच अंतिम निकाल 2023 PDF खाली शेअर केलेल्या थेट लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात. PDF मध्ये उमेदवारांची नावे, रोल नंबर आणि गुण यांचा उल्लेख आहे.

उपरोक्त तलाठी पदभरती परीक्षा 2023 च्या अनुषंगाने विचाराधीन उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षाधीन यादी www.gondia.nic.in या संकेत स्थळावर दिनांक 23.01.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून जिल्हा निवड समिती समक्ष उमेदवारांचे मूळ शैक्षणीक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी दि. 05/02/2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे उपस्थित राहण्याकरीता विचाराधीन उमेदवारांना तसेच प्रतिक्षाधीन उमेदवारांना दुरध्वनीव्दारे तसेच ई-मेल व्दारे या कार्यालयाकडून सूचित करण्यात आले होते. दिनांक 05/02/2024 रोजी जिल्हा निवड समिती समक्ष झालेल्या मूळ शैक्षणीक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवजांच्या तपासणीकरीता उक्त वर नमूद अ.क्र. 1 ते 2 व 7 वरिल विचाराधीन व अ.क्र. 3 ते 6 व अ.क्र. 8 ते 9 वरिल प्रतिक्षाधीन उमेदवार अनुपस्थित असल्याने त्या उमेदवारांना शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक 21 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा निवड समिती मार्फत अनुपस्थित असलेल्या उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

 

 

तरी उक्त उमेदवारांनी जाहिरातीत नमूद सर्व मुळ कागदपत्रे, फॉर्म भरल्याची प्रत, चालान प्रत तसेच इतर आवश्यक दस्तऐवजांसह (सर्व मुळ कागदपत्रासह) तसेच सर्व कागदपत्रांची । छायांकित प्रत साक्षांकित सह दिनांक 21.02.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे न चुकता उपस्थित राहावे. उक्त दिनांक 21/02/2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे कागदपत्रे / दस्तऐवज पडताळणी/तपासणी करीता गैरहजर राहिल्यास सदरील गैरहजर उमेदवार निवड सुचितील आपले स्थान गमावून बसतील व गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. का.टि. मा. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने.

तलाठी पदभरती 2023 – कागदपत्रे पडताळणी दि. 21/02/2024 सकाळी 11:00 वा. तलाठी पदभरती 2023 – कागदपत्रे पडताळणी दि. 21/02/2024 सकाळी 11:00 वा. 14/02/2024 21/02/2024 पहा (277 KB) 

 


 

बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. भूमिअभिलेख विभागाने पेसा अंतर्गत असलेले ते १३ जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे. खालील लिंक वर यादी उमेदवारांना पाहता येईल.

हि निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या १३ जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार आहे.पेसा वगळता अन्य २३ जिल्ह्यांमधील जिल्हा निवड समिती यांनी ही निवड यादी तयार केली आहे संबंधित यादी सर्व उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य समन्वयक, तलाठी परीक्षा तथा प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली. निवड प्रतीक्षा यादीनंतर उमेदवारांची ओळख, प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्रे यांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळणी तसेच समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही नियुक्ती पूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समिती मार्फत केली जाणार आहे.

तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी ६ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. त्यात १३ आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. भूमी अभिलेख विभागाकडून हे युद्धपातळीवर करण्यातमित्रांनो, तलाठी परीक्षेतील गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर २३ जिल्ह्यांतील रिक्त पदांनुसार जात संवर्गाप्रमाणे उमेदवारांची जिल्हानिहाय निवड याद्या आता जाहीर करण्यात येत आहे.  सर्व जिल्ह्यांच्या PDF महाभरती(www.MahaBharti.in) वर प्रकशीत केलेल्या आहेत . खालील जिल्हानिहाय  लिंक वरून आपणआपल्या जिल्ह्याचा  निकाल बघू शकता. सर्व जिल्ह्यांच्या PDF लिंक आम्ही सर्व प्रथम महाभरती वर देत आहेत. तेव्हा सर्व अपडेट्स साठी महाभरतीला भेट देत रहा.  

तसेच, येत्या आठवडाभरापर्यंत पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. 

 

Talathi Bharti Document Verification List

 

तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला!

 

Download Hingoli Talathi Bharti Document Verification Time Table

 

तलाठी भरती निकाल 2023 – निवड यादी व प्रतीक्षा यादी

राज्यातील २३ जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर | Talathi Final Result 2024: District-wise Result PDF Link

१. रायगड, २. रत्नागिरी, ३. सिंधुदुर्ग, ४. मुंबई शहर, ५. मुंबई उपनगर,६. सातारा, ७. सांगली, ८. सोलापूर, ९. कोल्हापूर, १०. अकोला, ११. बुलढाणा, १२. वाशिम, १३. परभणी, १५. लातूर, १६. जालना, १७. वर्धा, १८. नागपूर, १९. गोंदिया, २०. भंडारा, २१. छ. संभाजी नगर, २२. धाराशिव, २३. हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश

 

 

 

तलाठी भरतीच्या अंतिम यादीवर उमेदवारांचा आक्षेप !

सामान्यीकरण (नॉर्मलायझेशन) चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे. सामान्यीकरणात घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांसह काही राजकीय पक्षांनीही केला होता. असे असताना मंगळवारी रात्री उशीर भूमी अभिलेख विभागाने उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे.

तलाठ्यांच्या सुमारे ४ हजार ६०० पदांसाठी ५ जानेवारीला सामान्यीकरण करून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी आदिवासीबहुल जिल्हे वगळता प्रसिद्ध झाली. सामान्यीकरणामुळे ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून आले. यावर समन्वय समितीसह विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. मात्र मंगळवारी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर अंतिम यादी जाहीर झाली. परीक्षेत घोटाळा झाल्याचे अनेक पुरावे दिले असतानाही चौकशी न करताच यादी जाहीर करण्यावर समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी आक्षेप घेतला आहे.

सामान्यीकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप

आक्षेप काय?

  • ● तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये झालेल्या परीक्षेत पहिल्या १५ उमेदवारांचे सरासरी गुण सामान्यीकरण सूत्रात वापरण्यात आले आहेत.
  • ● पहिल्या क्रमांकाच्या काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचा आरोप झाला आहे.
  • ● प्रामाणिक उमेदवारांच्या गुणांच्या आधारे सामान्यीकरण केल्यास गुणवत्ता यादीत बदलाची शक्यता असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
  • ● अशा उमेदवारांच्या गुणांच्या आधारे इतरांचे गुण काढणे चुकीचे असल्याचे समन्वय समितीचे म्हणणे आहे.
  • ● निवड यादी जाहीर करण्याआधी आरोपांची चौकशी करण्याची मागणी झाली होती. देवेश गोंडाणे, लोकसत्ता

पुढील प्रक्रिया जिल्हास्तरावर

  • आता पात्र उमेदवारांना पुढील प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. ओळख, प्रमाणपत्रे आणि संबंधित कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी, वैद्याकीय तपासणी, समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी आदी नियुक्तीपूर्वीची कार्यवाही जिल्हास्तरावर होणार आहे. याचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त संचालक तथा तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी स्पष्ट केले.

mahabhumi.gov.in Talathi Final Result 2023 link

Talathi Recruitment Exam was conducted from 17th August to 14th September 2023 in 57 sessions in three phases. 10 lakh 41 thousand 713 candidates from across the state had applied for the Talathi post for this examination. Out of these 8 lakh 64 thousand 960 candidates appeared for the exam.

16 thousand 205 objections were registered by the candidates on 2831 questions in the entire examination. Out of these objections, a total of 9072 objections taken for 146 valid questions were upheld by the TCS company conducting the examination. Accordingly, 48 candidates have secured more than 200 normalized marks in the examination by normalization method.

How to check Talathi Result 2023?

The step by step details to check the Maharashtra Talathi Bharti Exam Result 2023 are given here.

  1. महाराष्ट्र राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा: mahabhumi.gov.in.
  2. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर ‘परिणाम’ किंवा ‘परीक्षा निकाल’ विभाग पहा आणि त्यावर क्लिक करा.
  3. ‘रिझल्ट’ विभागात, ‘महाराष्ट्र तलाठी निकाल २०२३’ लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  4. तुम्हाला तुमची परीक्षा क्रेडेंशियल एंटर करण्यास सांगितले जाईल, जसे की तुमचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक. कृपया ही माहिती अचूक द्या.
  5. तुमची परीक्षा क्रेडेंशियल्स एंटर केल्यानंतर, डेटावर प्रक्रिया करण्यासाठी सिस्टमची प्रतीक्षा करा आणि तुमचे निकाल आणि एकूण निकाल प्रदर्शित करा.
  6. एकदा तुमचे परिणाम प्रदर्शित झाल्यानंतर, तुमच्याकडे ते मुद्रित करण्याचा, स्क्रीनशॉट घेण्याचा किंवा तुमच्या रेकॉर्डसाठी निकाल डाउनलोड करण्याचा पर्याय आहे.

 

महाभूमी वर प्रकाशित याद्यांची सरळ लिंक

 

 

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी   


 अकोला  कोल्हापूर  नागपूर  परभणी  बुलडाणा  भंडारा
 मुंबई  मुंबई उपनगर  रत्नागिरी  लातूर  वर्धा  छत्रपती संभाजीनगर
 वाशिम  सातारा  सांगली  सिंधुदुर्ग  सोलापूर  हिंगोली
 जालना  बीड  धाराशिव  गोंदिया  रायगड

 

परीक्षेची उत्तरसूची प्रकाशित करून उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले. परिणामी, परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्याथ्यर्थ्यांसह राजकीय संघटनांनी केले. दरम्यान, भूमिअभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले. ते काम अंतिम टप्प्यात आले आहे.

 


 

तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर आता येत्या आठवड्यात जिल्हानिहाय उमेदवारांची निवड यादी जाहीर होणार आहे. जात संवर्गनिहाय तसेच जिल्ह्यातील रिक्त पदांनुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या २६ जानेवारीला ही नियुक्ती पत्र देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच भूमीअभिलेख विभागाने जाहीर केली. त्यावर परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केला होता. दरम्यान, भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले. ते काम अंतिम टप्प्यात आहे. आदिवासी जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच भरण्यात येतील, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. 

 

राज्यातून तलाठी परीक्षेसाठी सुमारे आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिल्या आहेत. अर्जदारांची संख्या मोठी असल्याने तीन टप्प्यात ही परीक्षा घेण्यात आल्या. दिवसातील तीन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर सहा जानेवारीला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

तलाठी परीक्षेतील उमेदवारांची जिल्हानिहाय निवड यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात ही यादी जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे- सरिता नरके, राज्य समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त

‘निवड यादीसाठी जिल्हा निवड मंडळाची मदत घेण्यात येते. या याद्यांमध्ये जिल्ह्यातील रिक्त पदांचा विचार केला जाणार आहे. ही रिक्त पदे भरताना जात संवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे. या याद्या २३ जिल्ह्यातील असून ते तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या आठवडाभरात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हास्तरावर जाहीर करण्यात येणार आहे,’ अशी माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली. दरम्यान, यशस्वी उमेदवारांना येत्या २६ जानेवारीला नियुक्ती पत्रे देण्याचे नियोजन सुरू आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

 

 


तलाठी भरती 2023 निकाल जाहीर

Talathi Bharti 2023 Result

 

तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी निकाल  आज ५ जानेवारी २०२४ रोजी रात्री १०.०० वाजता प्रकाशित झाला असून त्यानंतर जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर केली आहे.  खालील जिल्ह्यांच्या लिंक वरून आपण आपला निकाल सरळ बघू शकता. याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टीसीएस कंपनीकडून युद्धपातळीवर पूर्ण केले असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक यांनी दिली. दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांना २६ जानेवारी रोजी निवडपत्रे देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली. खालील लिंक वरून आपण आपला जिल्ह्याचा निकाल बघू शकता.

 

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी   

 

 

 

 


तलाठी भरती परीक्षेची गुणवत्तायादी येत्या आठवडाभरात लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर केली जाणार आहे. याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टीसीएस कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली. दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांना २६ जानेवारी रोजी निवडपत्रे देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली.

 

तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यातील साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीनंतर ४ हजार ४६६ जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ एवढे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्यात आली. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण ५ हजार ७०० श्नांपैकी २ हजार ८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांनी नोंदवले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९ हजार ७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत.

तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला!

त्यानुसार कंपनीने १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे. त्यानंतरही प्रश्नांवर आलेल्या आक्षेपांमधून ७ आक्षेप ग्राह्य धरण्यात आले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याचे त्या म्हणाल्या. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान ही प्रक्रिया २६ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असून निवड झालेल्या उमेदवारांना २६ जानेवारी रोजी निवडपत्रे देण्यात येतील अशी शक्यता जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलून दाखवली.

 

परीक्षार्थींची संख्या फार मोठी असून कुठल्याही परीक्षार्थीवर अन्याय होऊ नये, म्हणून अगदी काटेकोरपणे, कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. आठवडाभरात गुणवत्तायादी जाहीर होण्याची शक्यता आहे. जानेवारीअखेर नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

 

 


तलाठी भरती निकाल जानेवारी मध्ये जाहीर होणार

Talathi Bharti 2023 Update

 

तलाठी भरती परीक्षेचा निकाल आता पेसा क्षेत्रातील (अनुसूचित क्षेत्र ) जागा, अनाथ आणि दिव्यांग आरक्षणाच्या कचाट्यात सापडला आहे. त्यावर राज्य सरकारकडून ठोस निर्णयाची प्रतीक्षा असून त्यासाठी भूमीअभिलेख विभाग, महसूल आणि सामान्य प्रशासन विभाग काम करत आहे, त्याबाबत योग्य निर्णय झाल्यानंतरच निकाल जानेवारीपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ उमेदवारांकडून आलेले आक्षेप, १४६ प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती, अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते.

 

Maharashtra Talathi Result 2023 Link

Candidates who appeared in the Maharashtra Talathi Bharti examination can check their Results from the merit list of qualified candidates by visiting the official website www.mahabhumi.gov.in. It is expected that the Maharashtra Talathi Result 2023 will be announced in December 2023. In this article, we will also update the Talathi Result link once activated at www.mahabhumi.gov.in. Candidates who qualified for the Maharashtra Talathi written examination will be called to appear for document verification from given Maharashtra Talathi Result 2023 Link.

 

MAHA Talathi Expected Cut-off Marks

 

We will make an update with Maharashtra Talathi Cut off Marks here when the exam results are declared officially. Till then, you can check the expected cut-off marks for this exam. The expected cut off marks for Maharashtra Talathi Exam 2023 for different categories is as given below:

Category Name Cut-off Marks
General 178-182
OBC 170-174
EWS 166-170
SC 158-162
ST 152-156
VJ 158-162
NT 160-165

तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला!

App Download Link : Download App

 

तलाठी भरती अत्यंत महत्वाची असल्याने टीसीएस या खासगी कंपनीलाही प्रत्येक काम योग्य पद्धतीने केल्याचे पुरावेही द्यावे लागणार आहेत. कुठल्याही उमेदवाराने त्याची मागणी करताच सरकारच्या माध्यमातून त्यांना ते उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे. तलाठी भरती निकालातील पारदर्शकतेसाठीच प्रक्रियेस विलंब होत असल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

४,४६६ जागांसाठी ८,६४,९६० उमेदवारांनी दिली परीक्षा : राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ४, ४६६ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी साडेअकरा लाखांपेक्षा अधिक अर्ज आले. छाननी अंती १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज पात्र ठरले. पैकी ८ लाख ६४ हजार ९६० जणांनी प्रत्यक्षात ५७ सत्रांमध्ये परीक्षा दिली.

प्रश्नांबाबत १७, २०५ हरकती प्राप्त झाल्या. त्यांचे निराकरणही झाले. डिसेंबरअखेरपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असताना अद्यापही आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील जागांवरील उमेदवार
निवडीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. तसेच दिव्यांग आणि अनाथांबाबत नेमका कुठला निर्णय घ्यायचा याबाबत स्पष्टता नसल्यानेच हा निकाल रखडला असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

 

छाननी अंती ४४६६ जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुदत दिली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांनी नोंदवले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत.

दरम्यान, परीक्षेत एकूण ५७०० प्रश्न होते. आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टीसीएस कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याची माहिती त्यांनी दिली. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे, नरके म्हणाल्या.

परीक्षार्थी संख्या फार मोठी होती. त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, म्हणून अगदी काटेकोरपणे, कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील दोन दिवसांत निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


तलाठी परीक्षेतील उमेदवारांना १४६ प्रश्नांसाठी पूर्ण गुण देणार

 

तलाठी परीक्षेची उत्तर तालिका अर्थात आन्सर की उपलब्ध करून देण्यात होती. यामध्ये प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्यास आक्षेप अथवा हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार २हजार ८३१ प्रश्नांवर १६ हजार २०३ आक्षेप उमेदवारांकडून नोंदविण्यात आले. या आक्षेपांपैकी एकूण १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९ हजार ७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले आहेत. यामध्ये ११४ प्रश्नच चुकीचे होते, म्हणजेच प्रश्न किंवा उत्तरसुची चुकलेले असे हे प्रश्न होते, त्याचे पूर्ण गुण उमेदवारांना देण्यात येणार आहेत. तर उर्वरित ३२ प्रश्नांच्या उत्तरसूचीमध्ये देण्यात आलेले उत्तर चुकीचे होते, त्यामुळे योग्य उत्तर देणाऱ्यांना गुण देण्याचा निर्णय भूमि अभिलेख विभागाने घेतला आहे.

 

तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४ हजार ४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. हरकती नोंदविण्यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.


मागील अपडेट 

Talathi Bharti 2023 Update

Talathi Bharti 2023 Update : राज्यात नुकतीच सुमारे चार हजार सहाशे तलाठी पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात अनुकंपा तत्वावर तलाठी पदांची भरती करण्यात आली. त्यामुळे पदांची संख्या कमी झाली. मात्र, कोणत्याही जिल्ह्यात रिक्त पदांची संख्या शून्य राहू नये, यासाठी भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे पदाची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्यात सुमारे १४९ रिक्त पदे वाढली आहेत. 

राज्य सरकारने तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भूमी अभिलेख विभागाने ४६४४ रिक्त पदांसाठी जाहिरात काढली होती. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने अनुकंपा तत्त्वावर तलाठी पदांची भरती करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानुसार राज्य सरकारने ही पदे भरली. परिणामी, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परीक्षा घेतलेल्या तलाठ्यांची पदे कमी झाली होती. त्यामुळे तेथील परीक्षार्थीवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही पदे कमी झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात कोणत्याही संवर्गासाठी रिक्त पदांची संख्या शून्य राहू नये, यासाठी पदांची संख्या वाढवून मिळावी, असा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने १४९ पदे वाढवून देण्यास परवानगी दिली. त्यानुसार राज्यात आता ४ हजार ७९३ पदे भरण्यात येणार आहेत. परीक्षा झालेल्या उमेदवारांमधूनच ही निवड करण्यात येणार आहे. मात्र, राज्यात नेमकी किती पदे अनुकंपा तत्त्वावर भरण्यात आली, याची माहिती मिळू शकली नाही.

प्रवर्गनिहाय संख्या

  • सर्वसाधारण १६७६
  • महिला १४७३
  • खेळाडू २१६
  • माजी सैनिक ७०५
  • प्रकल्पग्रस्त २१३
  • भूकंपग्रस्त ६३
  • पवीधर अंशकालीन ४४७

तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला!

App Download Link : Download App

जिल्हानिहाय पदांची संख्या

अकोला 48
अमरावती 78
कोल्हापूर 56
गहत्चिरोली 140
गांदिया 717
चंद्रपूर 151
जळगाव 249
जालना 122
ठाणे 81
धाराशिव 110
धुळे 205
नंदुरबार 54
नगर 255
नांदेड 135
नागपूर 186
नाशिक 274
परभणी 15
पालघर 243
पुणे 3855
बीड 913
बुलढाणा 53
भंडारा 67
मुंबई उपनगर 41
मुंबई शहर 17
यवतमाळ 142
रत्नागिरी 210
रायगड 220
लातूर 55
वर्धा 84
वाशिम 26
संभाजीनगर 154
सांगली 110
सातारा 156
सिंधुदुर्ग 145
सोलापूर 200
हिंगोली 76

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

नवीन परिपत्रक पहा


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Talathi Bharti 2023 Update

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम