Talathi Bharti 2023: 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरू होईल: महसूल मंत्री विखे पाटील
Talathi Bharti 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023 :- राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात (Talathi Bharti 2023) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले. ते अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषद संपन्न झाली आहे. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनीही उपस्थिती लावली. दोन दिवस चाललेल्या या महसूल परिषदेत अनेक धोरण निश्चित करण्यात आली असून या धोरणांपैकी वाळू लिलावाचे महत्त्वाचे धोरणाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. लवकरच ते कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patill) यांनी दिली आहे. प्रथमच अशी परिषद यशदाच्या बाहेर ग्रामीण भागात घेण्यात आली आणि यापुढे सुद्धा पुण्याच्या बाहेर परिषद घेण्याचा मानस महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.
राज्यात 3110 तलाठी आणि 518 महसूल मंडळे निर्माण करण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. सरकारने आता या महसूल मंडळांसाठी 3110 तलाठी आणि 510 मंडल अधिकाऱ्यांची एकूण 3628 पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. मराठवाड्यात केवळ महसूल प्रशासनाचीच तब्बल १६९३ पदे रिक्त असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. यात लघुलेखक, तलाठी, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक टंकलेखकसह शिपाई पदांचा समावेश आहे. रिक्तपदांमुळे कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढल्याचे चित्र सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सध्या दिसत आहे. तसेच मित्रांनो तलाठी भरतीचे पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास नवीन आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा!
सध्या महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचे ताण वाढले आहे. आठही जिल्ह्यांसाठी वर्ग ३ आणि ४ (तलाठी संवर्गाच्या ३२१८ पदांसह) ७ हजार ४४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ५ हजार ७५१ कर्मचारी जिल्हानिहाय रिक्तपदे कार्यरत आहेत. तर १६९३ पदे रिक्त आहेत. शिवाय प्रत्येक महिन्यात चार ते पाच कर्मचारी सेवानिवृत्त होतच आहेत. परंतु असे असतानाही शासनाकडून अद्याप रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली नाही.
Talathi Bharti Starting Date
In all over Maharashtra Talathi Bharti 2023 is expected to starts from 15th March 2023. The More details & updates will be published on MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. तलाठी भरती 2022 रिक्त असलेली 4 हजार 122 पदांसाठी शासन निर्णय (GR) आला आहे. याच्यात सर्व राज्यातील जिल्ह्यातील रिक्त असलेली तलाठी एकुण पदे देण्यात आली आहे.
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
तलाठी भरती,
Talathi Bharti 2023,
विखे पाटील,
Table of Contents