तलाठी भरती संदर्भातील नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर !

Talathi Bharti 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
37,423

Talathi Bharti 2023

 

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र.४५/२०२३ दि.२६/६/२०२३ प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर तलाठी पदभरती करिता दिनांक १७/०८/२०२३ ते दि. १४/९/२०२३ या कालावधीत एकुण १९ दिवसामध्ये एकुण ५७ सत्रामध्ये परीक्षा घेणेत आलेली आहे. दि.२८/०९/२०२३ रोजी पासून उमेदवारांना त्यांचे लॉगइन आयडी वर त्यांचे परीक्षेचे सत्राची उत्तरतालिका (Answer Key) उपलब्ध करुन देणेत आली होती व त्याबाबत उमेदवारांना उत्तर तालिका (Answer Key) चे अनुषंगाने प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे असल्यास इ. बाबत आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.२८/९/२०२३ ते दि.०८/१०/२०२३ रोजी पर्यंत TCS कंपनीकडून लिंक खुली करुन देण्यात आली होती. त्याबाबत TCS कंपनीकडून प्राप्त आक्षेप / हरकतीची आकडेवारी उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. सदर प्राप्त आक्षेपाबाबत TCS कंपनीचे समितीमार्फत कार्यवाही करणेत येऊन उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडीवर माहिती उपलब्ध करुन देणेत येणार आहे. ज्या सत्राच्या परिक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकत समितीमार्फत स्विकृत झालेस त्या सत्राची सुधारित (Answer Key) उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या (Log in) लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. तद्नंतर कोणतेही आक्षेप / हरकत विचारार्थ घेण्यात येणार नाहीत.

 

 

नवीन परिपत्रक पहा

 

 

 


Talathi Bharti 2023 : 3628 पदांच्या तलाठी भरतीला मान्यता GR प्रकाशित – जिल्हानिहाय माहिती पहा

Talathi Bharti 2023

 

प्राप्त नवीन माहिती नुसार, राज्यात लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बऱ्याच दिवसापासून उमेदवार या भरतीची वाट बघत आहे. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यामुळे एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने यंत्रणेवर ताण पडत होता तसेच कामांना देखील उशीर होत होता. त्यामुळे या पदांसाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते, ज्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे

या भरती प्रक्रियेमध्ये एकुण ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकुण ३६२८ पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार आहे, जाणून घ्या. पुणे विभागात एकुण ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. अमरावती विभागात एकुण १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. नागपूर विभागात एकुण ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. औरंगाबाद विभागात एकुण ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. नाशिक विभागात एकुण ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. कोकण विभागात एकुण ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे

Talathi Bharti 2023 : महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या ३६२८ पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे.  या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. ता PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा. या नवीन माहिती पत्रकानुसार नाशिक, औरंगाबाद, कोकण, नागपूर, अमरावती, पुणे विभागात ३६२८  पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे. राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तलाठी पदे रिक्त असून, अनेक गावांचा अतिरिक्त प्रभार असल्याने जनतेच्या कामांना अडचणी येतात. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपवविण्यात आली आहेत

Talathi and Mandal Adhikari Bharti 2023

Talathi Bharti 2022

 

 

Talathi Bharti 2022
Talathi Bharti 2022

 

अ.क्र. महसूल विभाग जिल्हा तलाठी साझे  महसुली साझे
1.  पुणे  पुणे  331  55
2.  सातार्ा  77  12
3.  सांगली  52  09
4.  सोलापूर्  111  19
5.  कोल्हापूर्  31  05
  एकू ण  602  100 
6.  अमरावती अमरावती 34  06
7.  अकोला  01
8.  यवतिाळ  54  09
9.  बुललाणा  10  02
10.  वामशि  0
  एकू ण  106  18 
11.  नागपूर्  नागपूर्  94  16
12.  चंद्रपूर्  133  23
13.  वर्धा 50  08
14.  गडचिरोली 114  19
15.  गोंदिया 49  08
16.  भंडारा  38  06
    एकू ण  478  80 
17.  औरंगाबाद औरंगाबाद 117  19
18.  जालना  80  13
19.  परभणी 76  13
20.  हिंगोली 61  10
21.    बीड  138  23
22.  नांदेड  84  14
23.  लातुर्  39  07
24.  उस्मानाबाद 90  15
  एकू ण  685  114 
25.  नाशिक नाशिक 175  29
26.  नांदुरबार 0
27.  धुळे  166  28
28.  जळगाव  146  24
29.  अहमदनगर 202  34
  एकू ण  689  115 
30.  कोंकण  मुंबई 19  4
31. मुंबई उपनगर्  31  3
32.  पालघर्  86  16
33.  ठाणे  72  10
34.  र्ायगड  140  22
35.  रत्नागिरी 103  18
36.  सिंधुदुर्ग 99  18
  एकू ण  550  91 
  एकू ण  3110  518 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

GR पहा    

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Talathi Bharti 2023,

तलाठी भरती,

तलाठी भरती 2022,

तलाठी भरती GR,

तलाठी भरती जिल्हानिहाय माहिती

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम