तलाठी भरती सुधारित Response Sheet प्रकाशित
Talathi Answer Key 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Talathi Answer Key 2023
दि.२९/०९/२०२३ ते दि.८/१०/२०२३ या कालावधीत परीक्षार्थीनी परीक्षेतील प्रश्नावर शंका उपस्थित केल्या. सदर शंकानिरसन करण्यासाठी TCS कंपीनकडून शंका निरसन करत प्रश्ननिहाय दुरुस्त सोबत माहिती नवीन रिस्पॉन्स शीट खालीलप्रमाणे प्रसिध्द केली आहे.
Download Responce Sheet PDF
Talathi Answer Key 2023
दि.२९/०९/२०२३ ते दि.८/१०/२०२३ या कालावधीत परीक्षार्थीनी परीक्षेच्या ५७ सत्रातील ५७०० प्रश्नापैकी २८३१ प्रश्नांबाबत १६२०५ शंका उपस्थित केल्या. सदर शंकानिरसन करण्यासाठी TCS कंपीनकडून विषय तज्ञ समितीने दि.६/१२/२०२३ रोजी प्रथमतः ९०७२ शंका मान्य करुन १४६ प्रश्नोत्तरे दुरुस्त केली. त्यानंतर दि. २२/१२/२०२३ रोजी पुन्हा ८५ शंका निरसन करत ही प्रश्नोत्तर संख्या १४८ झाली. आता अतिमतः आणखी १२ प्राप्त शंकाच्या अनुषंगाने एकुण पाच शंका मान्य करुन २ प्रश्नांना पुर्ण गुण व ३ प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करणेत आले आहेत. एकुण १४९ प्रश्नोत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आली आहेत याबाबत प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिध्द करणेत येत आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारित गुण देणेत आले आहेत.
Download Responce Sheet PDF
तलाठी भरती फायनल उत्तर तालिका , रिस्पॉन्स शिट जाहीर
Talathi Answer Key 2023 Download PDF
तलाठी पदाच्या परीक्षेसाठी फायनल उत्तरपत्रिका आणि रिस्पॉन्स शीट प्रकाशित करण्यात आली आली आहे. तलाठी उत्तरतालिका 2023 वर आक्षेप घेण्याची तारीख दिनांक 28 डिसेंबर 2023 ते 08 ऑक्टोबर 2023 होती. त्यानुसार TCS कंपनीने महसूल विभागाला आक्षेपांबाबत माहिती दिली असून एकूण 2831 प्रश्नांसाठी 16205 आक्षेप घेण्यात आले होते त्या पैकी 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9072 आक्षेप कंपनीने वैध ठरवले आहेत. तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 प्राप्त आक्षेपांबद्दल प्रसिद्धीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी उमेदवार खालील लिंकचा वापर करू शकतात.
फायनल उत्तर तालिका आणि रिस्पॉन्स शीट लिंक
राज्यात ४ हजार ४६४ तलाठीपदांसाठी तब्बल ८ लाख ५६ हजार जणांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा ५७ टप्प्यात घेण्यात आली. त्यानंतर प्रत्येक टप्यात घेण्यात आलेल्या प्रनपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. आठवडाभरात हरकतीचे संकलन करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा पुन्हा अंतिम करण्यात येऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत. मात्र, अंतिम गणवत्ता यादी १६ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात येईल. त्यामुळे नियुक्तीपत्र जानेवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.
Talathi Answer Key 2023 Download PDF | तलाठी भरती उत्तरतालिका अपडेट, हरकती ८ ऑक्टोबर पर्यंत घेता येईल
Talathi Answer Key 2023 Download PDF
तलाठी Response Sheet उपलब्ध झालेली आहे. बाकी शिफ्ट्स ची लवकरच येईल !! राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे त्यांना २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तलाठी भरती परीक्षेची उत्तरतालिका उमेदवार खालील लिंक वरून डाउनलोड करू शकतात. उमेदवारांनी आपला युसरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे आणि उत्तरतालिका डाउनलोड करावी.
उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवादारांच्या ऑनलाइन लॉगइनमध्ये सोय करण्यात आली आहे. उमेदवारांना काही हरकत असल्यास ती परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदविताही येणार आहे. तलाठी भरती परीक्षा पार पडल्यानंतर आता भूमी अभिलेख विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तरतालिका पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. उत्तरतालिका पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका, आक्षेप, हरकत असल्यास परीक्षा घेतलेल्या टीसीएस कंपनीकडून दुवा (लिंक) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका हरकतीला १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराला परत केली जाणार आहे. मात्र, आक्षेप अयोग्य असल्यास १०० रुपये शुल्क परत केले जाणार नाही.
तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी दिली.</p><p>दरम्यान, ही प्रक्रिया झाल्यानंतर निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे.
संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारा निकाल अंतिम असणार असून, त्याबाबत कोणतेही आपेक्ष, हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. तलाठी पदाची परीक्षा १९ दिवस तीन सत्रांत घेण्यात आली. जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या अटीप्रमाणे तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र आणि अपात्र गुणांनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांसह जिल्हानिहाय पात्रता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. याबबतच्या सर्व नोटीस भूमी अभिलेख विभागाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही रायते यांनी स्पष्ट केले.
How to Download Maharashtra Talathi Answer Key 2023 ?
- महाराष्ट्र तलाठी भरतीच्या वेबसाइटला भेट द्या.
- उत्तरतालिका लिंकवर क्लिक करा.
- आपला युसरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
- महाराष्ट्र तलाठी उत्तरतालिका PDF डाउनलोड करा.
- उत्तरतालिका ची प्रिंट काढा.
Talathi Bharti Answer Key 2023 PDF Download, Response Sheet
Maharashtra Talathi Answer Key 2023@ mahabhumi.gov.in
Organization Name | Maharashtra Revenue Department |
Exam Name | Talathi Bharti Exam |
Category | Answer key |
Status | Released Soon |
Official website For Talathi Answer Sheet | mahabhumi.gov.in/mahabhumilink |
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Talathi Answer Key 2023 Download PDF
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents