नोकरीची सुवर्णसंधी! राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती; करोना संकटात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
करोना संकटामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान ठाकरे सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून यानिमित्ताने राज्यातील तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.