स्वामी रामानंद तीर्थ यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १९०३- मृत्यू : १९७२)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
5,385

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

नाव :  व्यंकटेश भगवानराव खेडगीकर

जन्म  : ३ ऑक्टोबर १९०३ सिंदगी (विजापुर)

शिक्षण : सोलापूर येथील सरकारी शाळेत

चळवळ : हैदराबाद मुक्तिसंग्रामा

  • हैदराबाद (दक्षिण) स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर.
  • त्यांचा जन्म कर्नाटकातील सिंदगी (जिल्हा विजापूर) येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते.
  • त्यांनी दोन मुलींनंतर संन्यास घेतला पण पत्नीची संमती घेतली नाही. तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना परत गृहस्थाश्रमात जाण्याची आज्ञा दिली. त्यानंतर त्यांना हे पुत्ररत्न झाले.
  • जन्मगावी प्राथमिक शिक्षण घेऊन ते सोलापूरच्या नॉर्थकोट हायस्कूलमध्ये दाखल झाले. तिथे मॅट्रिकला असताना गांधी टोपी घातली म्हणून स्वामीजींना छड्या खाव्या लागल्या पण टोपी काढण्याचा हुकूम त्यांनी पाळला नाही. त्यांना शाळेतून बहिष्कृत केले गेले.
  • तेव्हा त्यांनी एका राष्ट्रीय विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा दिली आणि पुढे अमळनेर व पुणे येथील महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांसह बी.ए. व ‘लोकशाहीचा विकास’ हा प्रबंध लिहून एम्.ए. पदवी संपादन केली.
  • त्यानंतर १९२६ मध्ये ना. म. जोशी यांच्या स्वीय साहाय्यकपदी ते रुजू झाले. त्यामुळे आपाततः गिरणी कामगारांच्या लढ्यात ते सक्रिय सहभागी झाले.
  • तत्पूर्वी लोकमान्य टिळकां च्या निधनाने ते अतीव दुःखी झाले. त्यांनी त्या वेळी ‘या क्षणापासून माझे सर्व उर्वरित जीवन मी मातृभूमीच्या चरणी वाहत आहे, सर्व सुखांचा त्याग करून मी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीन’, अशी प्रतिज्ञा केली आणि आयुष्यभर तिचे पालन केले.

हैदराबाद मुक्तिसंग्रामातिल मराठवाड्याचे योगदान

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

    • हैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या संघटनेने मराठवाडा जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते.
    • यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती.
    • २७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले.
    • ‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली.
    • याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत.
    • माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते.
    • हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते

 

  • १९३० पर्यंत त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केले.
  • १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी त्यांना दिक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले.
  • अंबाजोबाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाचे त्यांनी नुतनीकरण केले.
  • रझाकार या संघटनेने मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार केले त्याविरुद्ध काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटनीस म्हणून कार्य केले.
  • १९३८ मध्ये आपल्या कार्यकत्यांना सोबत घेऊन हैद्राबाद येथे उपोषणे, आंदोलने केली. स्टेट काँग्रेसची स्थापना.
  • १९३८ मध्ये त्यांना ४ महिण्याचा कारावास झाला त्यानंतर त्यांनी भूमीगत काम केले.
  • मुक्तीसंग्रामातून आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी व्हिजन हे साप्ताहिक सुरू केले.
  • १७ सप्टेंबर १९४८ रोजी त्यांच्या प्रयत्नांनी हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले.
  • स्वामी रामानंद तीर्थ हे औरंगाबाद व गुलबर्गा येवून लोकसभेवर निवडून आले.
  • २२ जानेवारी १९७२ ला हैद्राबाद येथे त्यांचे निधन झाले.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

  • ✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
  • Free Current Affairs Test, mpscexams,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम