संत एकनाथ महाराज (१५३३-१५९९) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १५३३ - मृत्यू : १५९९)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते.
संत एकनाथ महाराज (१५३३-१५९९) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
- संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. त्यांचा जन्म इ. स. १५३३ मध्ये पैठण जि. औरंगाबाद येथे झाला.
- श्री. संत एकनाथ महाराजांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते व आईचे नाव रुक्मिनी होते.
- आई वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत.
- एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.
- एकनाथांचे गुरू सदगुरू जनार्दन स्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मुळचे चाळीसगावचे होते. त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते.
- गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले आणि द्वारपाल म्हणून नाथांच्या दारी उभे असत असे म्हणतात.
- नाथांनी अनेक तिर्थयात्रा केल्या. नाथांनी एका मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. त्यांचे नाव गिरजाबाई असे होते.
- संत एकनाथ आणि गिरजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथाचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हा जंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपूरास नेण्यास सुरूवात केली.
- संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारुड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली.
- संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते.
- त्यांनी रंजन व प्रबोधन केले, ते ‘एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात एका जनार्दन ही त्यांची नाममुद्रा आहे. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले.
- एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहील्या आहेत. मुळ भागवत १२ स्कंदाचे आहे. हे (व्यासकृत) आहे. नाथांनी लिहीलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत.
- रूक्मीणी स्वयंवर हे ही काव्य त्यांनीच लिहीले आहे. नाथांनी दत्ताची आरतीही ‘त्रिगुणात्मक त्रयमुर्ती दत्त हा जाण त्यांनीच लिहीले आहे.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त होते. जातीभेद दुर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन एकनाथांनी केले.
- फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला.
- फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.
कार्य व लेखनः
एकनाथी भागवत – भागवत पुराणातील आकराव्या स्कंधावर ओवीबद्ध मराठी टिका.
चतुःश्लोकी भागवत
एकनाथी अभंग गाथा.
जातीयतेला विरोध करणारे कृतीशील संत
संत एकनाथ महाराज युगप्रवर्तक होते, असे म्हटले जाते. त्यांनी भारुडे, अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलन, जातीयतेच्या विरोधात कार्य केले. केवळ उपदेश केला नाही, तर आपल्या कृतीतून दाखवूनही दिले.
डोळस आणि कृतीशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले. संत कवींनी संपन्न केलेल्या भारुड रचनेच्या शैलीला संत एकनाथ महाराजांनी भाषा समृद्धी दिली.
अमृताहूनी गोड अशा मराठी भाषेला लोकभाषा बनविली. त्याचबरोबर हिंदी भाषेतही त्यांनी रचना केल्या. भागवत धर्मप्रसाराच्या हेतूने त्यांनी हिंदी भाषेचा कौशल्यपूर्णरित्या वापर करुन भारुडातून रुढी परंपरांवर प्रहार केले आहेत. दोनशेपक्षा जास्त पदे त्यांनी हिंदीतून लिहिली आहेत.
संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ एकुण २५ अभंग –
१) हस्तमालक टीका २) शुकाष्टक टीका ३) स्वात्म बोध
४) चिरंजीवपद ५) आनंदलहरी ६) अनुभवानंद
७) मुद्राविलास ८) लघुगीत
- भावार्थ रामायण (४० हजार ओव्या) हिंदीसह अनेक भाषांत भाषांतरे
- संत ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समाधीस्थळाचा शोध.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents