मराठी व्याकरण – संधी आणि संधीचे प्रकार
संधी आणि संधीचे प्रकार
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
संधी :-
संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात.
-
संधी म्हणजे सांधने, जोडने किंवा एकत्र करणे होय.
-
जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात.
-
संधी हा प्रकार संस्कृत मधून मराठीत आला आहे.
-
संधी म्हणजे वर्णांचे एकत्रीकरण होय.
संधीचा विग्रह अधिक (+) चिन्हाने दाखवला जातो.
उदा. सूर्य + उदय = सूर्योदय
जगत् + नाथ = जगन्नाथ
संधीचे प्रकार :-
अ) संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.
1) स्वरसंधी
2) व्यंजन संधी
3) विसर्गसंधी
स्वरसंधी :-
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना ‘स्वरसंधी’ असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.
स्वर संधी = स्वर + स्वर
आदेश : एका वर्णांची जागा जेव्हा दूसरा वर्ण घेतो तेव्हा त्यास आदेश असे म्हटले जाते.
उदा. :-
एकत्र येणारे स्वर |
बनणारा आदेश |
बनणारा शब्द |
देव + आलायअ + आ |
आ |
देवालय |
कवि + इच्छाइ + ई |
ई |
कविच्छा |
एक + एकअ + ए |
ऐ |
एकेक |
आदेशाचे खालील पाच प्रकार पडतात :-
-
दिर्घत्व संधी –
-
गुणादेश संधी –
-
वृद्ध्यादेश संधी –
-
यणादेश संधी –
-
अयादी आदेश संधी –
– आदेशाला अनुसरून स्वर संधीचे पाच प्रकार पडतात.
1) दिर्घत्व संधी :-
– दोन सजातीय स्वर एकमेकांसमोर आले असता त्यांच्या मध्ये दीर्घ स्वर तयार होतो, त्याला दीर्घत्व असे म्हणतात.
– आणि दीर्घादेश पासून बनलेल्या संधीला दीर्घत्व संधी असे म्हणतात.
– दीर्घत्व संधी कशी ओळखावी – संधी होऊन तयार झालेल्या वर्णाला काना, दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असते .
अ / आ + अ / आ = आ (काना), इ / ई + इ / ई = ई ( दुसरी वेलांटी),
उ / ऊ + उ / ऊ = ऊ (दुसरा उकार)
1) अ + अ = आ
उदा. सूर्य + अस्त = सूर्यास्त, मिष्ठ + अन्न = मिष्टन्न, पुरुष + अर्थ = पुरुषार्थ
2) अ + आ = आ
उदा. हिम + आलय = हिमालय, देव + आलय = देवालय, फल + आलय = फलाहार
3) आ + अ = आ
उदा. विध्या + अर्थी = विध्यार्थी, विध्या + अमृत = विध्यामृत
4) आ + आ = आ
उदा. महिला + आश्रम = महिलाश्रम, राजा + आश्रय = राजाश्रय, कला + आनंद = कलानंद
5) इ + इ = ई
उदा. कवि + इच्छा = कवीच्छा, अभि + इष्ट = अभीष्ट, मुनि + इच्छा = मुनीच्छा
6) इ + ई = ई
उदा. गिरि + ईश = गिरीश, कवि + ईश्वर = कवीश्वर, परी + ईक्षा = परीक्षा
7) ई + इ = ई
उदा. रवी + इंद्र = रवींद्र मही + इंद्र = माहिंद्र गोमती + इच्छा = गोमतीच्छा
8) ई + ई = ई
उदा. मही + ईश = माहिश पार्वती + ईश = पार्वतीश रजनी + ईश = राजनीश
9) उ + उ = ऊ
उदा. गुरु + उपदेश = गुरुपदेश भानु + उदय = भानुदय
10) ऊ +उ = ऊ
उदा. भू + उध्दार = भुध्दार वधू + उत्कर्ष = वधूत्कर्ष लहू + उत्तरी = लघूत्तरी
11) ऊ + ऊ = ऊ
उदा. भू + ऊर्जा = भूर्जा
12) ऋ + ऋ = ऋ
उदा. मातृ + ऋण = मातृण
2) गुणादेश संधी :-
– अ किंवा आ या स्वरापुढे जर इ किंवा ई स्वर आल्यास तर त्या दोघांऐवजी ए हा स्वर येतो,
– जर उ किंवा ऊ हा स्वर आल्यास तर त्या दोघांऐवजी ओ स्वर येतो आणि
– जर ऋ हा स्वर आल्यास तर त्या दोनस्वरांमिळून अर येतो यालाच गुणादेश संधी असे म्हणतात.
– गुणादेश स्वरसंधी झालेल्या अक्षराला एक मात्रा, एक काना मात्रा व शेवटच्या अक्षराला रफार येतो.
1) अ + इ = ए
उदा. ईश्वर + इच्छा = ईश्वरेच्छा, स्व + इच्छा = स्वेच्छा, लोक + इच्छा = लोकेच्छा, मनुष्य + इतर = मनुष्येतर
2) अ + ई = ए
उदा. गण + ईश = गणेश , राम + ईश्वर = रामेश्वर, गुण + ईश = गुणेश
3) आ + इ = ए
उदा. महा + इंद्र = महेंद्र, यथा + इष्ट = यथेष्ट
4) आ + ई = ए
उदा. रमा + ईश = रमेश, उमा + ईश = उमेश, महा + ईश = महेश, अयोध्या + ईश = अयोध्येश, राजा + ईश = राजेश, लंका + ईश्वर = लंकेश्वर
5) अ + उ = ओ
उदा. चंद्र + उदय = चंद्रोदय, सूर्य + उदय = सूर्योदय, पुरुष + उत्तम = पुरुषोत्तम
6) अ + ऊ = ओ
उदा. समृद्र + ऊर्मी = समुद्रोर्मी, एक + ऊन = एकोन, जल + ऊर्मी = जलोर्मी
7) आ + उ = ओ
उदा. गंगा + उदक = गंगोदक, महा + उत्सव = महोत्सव, धारा + उष्ण = धारोष्ण
8) आ + ऊ = ओ
उदा. गंगा + ऊर्मी = गंगोर्मी
9) अ + ऋ = अर्
उदा. सप्त + ऋषी = सप्तर्षी, देव + ऋषी = देवर्षी, ब्रम्ह + ऋषी = ब्रह्मर्षी
10) आ + ऋ = अर्
उदा. महा + ऋषी = महर्षी, राजा + ऋषी = राजर्षी
3) वृद्ध्यादेश संधी :-
– जर अ आणि आ या स्वरापुढे ए किंवा ऐ स्वर आल्यास तर त्याबद्दल ऐ हा स्वर येतो.
– आणि ओ किंवा औ स्वर आल्यास तर त्याबद्दल औ हा स्वर येतो. यालाच वृद्ध्यादेश (वृद्धि+आदेश) संधी म्हणतात.
– वृद्ध्यादेश (वृद्धि+आदेश) संधी मध्ये अक्षराला दोन मात्रे किंवा एक काना दोन मात्रे येतात तेव्हा त्यास वृद्ध्यादेश स्वर संधी असे म्हणतात.
1) अ + ए = ऐ
उदा. क्षण + एक = क्षनैक एक + एक = एकैक
2) आ + ए = ऐ
उदा. सदा + एव = सदैव
3) अ + ऐ = ऐ
उदा. मत + ऐक्य = मतैक्य, जन + ऐक्य = जनैक्य
4) आ + ऐ = ऐ
उदा. प्रजा + ऐक्य = प्रजैक्य, विध्या + ऐश्वर्य = विद्धैश्वर
5) अ + आ = औ
उदा. जल + ओघ = जलौष
6) आ + ओ = औ
उदा. गंगा + ओघ = गंगौघ, यमुना + ओघ = यमुनौघ
7) अ + औ = औ
उदा. वृक्ष + औदार्य = वृक्षौदर्य, बाल + औत्सुक्य = बालौत्सुक्य, वन + औषधी = वनौषधी
8) आ + औ = औ
उदा. महा + औदार्य = महौदर्य, क्षमा + औचित्य = क्षमौचित्य
4) यणादेश संधी :-
इ, उ, ऋ’ (र्हस्व / दीर्घ) यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास ‘इ/ई’ बद्दल ‘य्’, ‘उ/ऊ’ बद्दल ‘व्’ तर ‘ऋ’ बद्दल ‘र्’ वर्ण येतात आणि त्यात पुढील स्वर मिसळून संधी होते. अशा प्रकारे य्, व्, र् असे बदल होतात, त्याला यणादेश असे म्हणतात.
1) इ + अ = य् + अ = या
प्रीती + अर्थ = प्रीत्यर्थ, अति + अल्प = अत्यल्प अति + अंत = अत्यंत, प्रती + अक्ष = प्रत्यक्ष, प्रती + अंतर = प्रत्यंतर, कोटि + अवधि = अत्यानंद
2) इ + आ = य् + ओ = या
इति + आदी = इत्यादी, अति + आचार = अत्याचार, अति + आनंद = अत्यानंद, वि + आसंग = व्यासंग
3) ई + ओ = य् + ओ = यो
नदी + ओघ = नद्योघ
4) इ + उ = य् + उ = यु
अति + उत्तम = अत्युत्तम
5) ई + उ = य् + उ = यु
नदी + उद्गम = नद्युद्गम
6) इ + ए = य् + ए = ये
प्रती + एक = प्रत्येक
7) ई + ए = य् + ए = ये
किती + एक = कित्येक
8) उ + अ = व् + अ = व
मनु + अंतर = मन्वंतर, अनु + अर्थ = अन्वर्थ, सू + अल्प = स्वल्प
9) उ + आ = व् + आ = वा
गुरु + आज्ञा = गुर्वाज्ञा, हेतु + आभास = हेत्वभास, सू + आनंद = स्वानंद, सू + आगात = स्वागत
10) उ + ओ = व् + ओ = वो
गुरु + ओघ = गुर्वोघ
11) उ + इ = व् + इ = वि
उदा. यदू + इंद्र = यव्दिंद्र
12) ऊ + ई = व् + ई = वी
उदा. भानू + ईश्वर = भांवीश्वर
13) ऋ + आ = र् + आ = रा
उदा. पितृ + आज्ञा = पित्राज्ञा
14) ऋ + औ = र् + औ = रौ
उदा. पितृ + औदार्य = पित्रौदार्य
15) ऋ + इ = र् + इ = रि
उदा. भ्रातृ + इच्छा = भ्रात्रिच्छा, मातृ + इच्छा = मात्रिच्छा
5) अयादी आदेश संधी :-
जर ए, ऐ, ओ किंवा औ या संयुक्त स्वरांपुढे स्वर आल्यास अनुक्रमे ए या संयुक्त स्वराऐवजी आय्, ऐ या संयुक्त स्वराऐवजी आय्, ओ या संयुक्त स्वराऐवजी अव्, औ या संयुक्त स्वराऐवजी आव् असे वर्ण मिसळून आदेश तयार होऊन त्यास पुढील स्वर मिसळून अयादी आदेश संधी तयार होते.
1) ए + अ = अय् + अ = अय उदा. ने + अन = नयन
2) ऐ + अ = आय् + अ = आय उदा. गै + अन = गायन
3) ओ + ई = अव् + ई = अवी उदा. गो + ईश्वर = गवीश्वर
4) औ + इ = आव् + इ =आवि उदा. नौ + इक = नाविक
5) ओ + अ = अव् + अ = अव उदा. पो + अन = पवन
6) औ + अ = आव् + अ = आव उदा. पौ + अन = पावन
व्यंजन संधी :-
दोन व्यंजने किंवा यापैकी दूसरा वर्ण स्वर असेल तर त्याला मिळून तयार होणार्या संधीला व्यंजन संधी असे म्हणतात.
-
व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी
-
व्यंजन + स्वर = व्यंजन संधी
-
स्वर + व्यंजन = व्यंजन संधी
व्यंजन संधीचे प्रकार :-
1) प्रथम व्यंजन संधी : (व्यंजन + व्यंजन)
2) तृतीय व्यंजन संधी : (व्यंजन + व्यंजन / स्वर)
3) अनुनासिक व्यंजन संधी : (व्यंजन + व्यंजन)
4) ‘त’ ची व्यंजन संधी : (व्यंजन + व्यंजन / स्वर)
5) ‘म’ ची व्यंजन संधी : (व्यंजन + व्यंजन / स्वर)
6) ‘छ’ ची व्यंजन संधी : (स्वर + व्यंजन)
7) ‘न’ ची व्यंजन संधी : (व्यंजन + व्यंजन / स्वर)
8) ‘र’ ची व्यंजन संधी : (व्यंजन + व्यंजन)
1] प्रथम व्यंजन संधी :-
दोन शब्दाची संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ग, ज, ड, द्, ब (मृदु व्यंजन) यांच्यापैकी आल्यास तर संधी होत असतांना त्याचे जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन (क, च, ट, त, प) येऊन संधी होते त्याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात.
प्रथम व्यंजन संधी झालेल्या शब्दात क/च/ट/त/प ही पाच अक्षरे येतात.
कठोर/मृदु (20) + कठोर व्यंजन (10) = क/च/ट/त/प + कठोर व्यंजन
उदा.
वाग् + चातुर्य = वाक्चातुर्य
षड् + शास्त्र = षट्शास्त्र
विपद् + काल = विपत्काल
वाक्पति = वाग् + पति
क्षुध् + पिपासा = क्षुत्पिपासा
शरद् + काल = शरत्काल
वाग् + तांडव = वाक्तांडव
आपद् + काल = आपत्काल
2] तृतीय व्यंजन संधी :-
दोन शब्दाची संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क, च, ट, त, प यापैकी कोणताही वर्ण आल्यास त्यापासून संधी होत असतांना त्या वर्णाचे जागी त्याच वर्गातील तृतीय व्यंजन येते या संधीला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात.
तृतीय व्यंजन संधी झालेल्या शब्दात ग/ज/ड/द/ब ही पाच अक्षरे येतात.
अ) कठोर व्यंजन (10) + मृदु व्यंजन (14) = ग/ज/ड/द/ब + मृदु व्यंजन
उदा.
वागीश = वाक् + ईश
वाग्देवी = वाक् + देवी
अजंत = अच + अंत
वडानन = वट् + आनन
अब्ज = अप् + ज
सदाचार = सत् + आचार
सदानंद = सत् + आनंद
ब) कठोर व्यंजन + स्वर = ग/ज/ड/द/ब + स्वर
उदा.
जगदीश = जगत् + ईश
जगदीश्वर = जगत् + ईश्वर
सदिच्छा = सत् + इच्छा
वागीश्वरी = वाक् + ईश्वरी
3] अनुनासिक व्यंजन संधी :-
पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापूढे अनुनासिक आल्यास त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन संधी होते त्यास अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात.
कठोर/मृदु (20) + अनुनासिक (5) = अनुनासिक + अनुनासिक
उदा.
वाड्निश्चय = वाक् + निश्चय
षण्मास = षट् + मास
जगन्नाथ = जगत् + नाथ
संमती = सत् + मती
सन्मार्ग = सत् + मार्ग
तन्मय = तत् + मय
सन्मती = सत् + मती
4] ‘त’ ची व्यंजन संधी :-
अ) त् + च = च + च = च्च
त् + छ = च + छ = च्छ
उदा.
1) उत् + चारण = उच्चारण
2) सत् + चरित्र = सच्चरित्र
3) उत् + छेद = उच्छेद
ब) त् + ज = ज + ज = ज्ज
त् + झ = ज + झ = ज्झ
उदा.
1) सत् + जन = सज्जन
2) उत् + ज्वल = उज्जवल
क) त् + ट = ट + ट = ट्ट
त् + ठ = ट + ठ = ट्ठ
उदा.
1) सत् + टीका = सट्टिका
2) तत् + टीटा = तट्टीका
ड) त् + ल = ल + ल = ल्ल
उदा.
1) तत् + लीन = तल्लीन
2) उत् + लेख = उल्लेख
3) उत् + लंघन = उल्लंघन
इ) त् + श = च + छ = च्छ
उदा.
1) सत् + शिष्य = सच्छिष्य
2) उत् + श्वास = उच्छवास
3) उत् + शिष्ट = उच्छिष्ट
5] ‘म’ ची व्यंजन संधी :-
अ) ‘म्’ पुढे स्वर आल्यास तो ‘म्’ मध्ये मिसळतो.
म् + स्वर = म् + स्वर
उदा.
सम् + आचार = समाचार
सम् + आप्त = समाप्त
सम् + आरोप = समारोप
सम् + आलोचन = समालोचन
ब) ‘म्’ पुढे व्यंजन आल्यास ‘म्’ चा लोप होतो व मागील अक्षरावर अनुस्वार येतो.
‘म्’ चा लोप होऊन ‘म’ च्या अलीकडील अक्षरावर अनुस्वार येतो.
उदा.
सम् + पर्क = संपर्क
सम् + ताप = संताप
सम् + त = संत
सम् + योग = संयोग
सम् + शय = संशय
सम् + सार = संसार
6] ‘छ’ ची व्यंजन संधी :-
‘छ़’ पूर्वी स्वर आला तर त्या दोघांमध्ये ‘च़्’ हा वर्ण येतो.
स्वर + छ = च्छ
उदा.
1) मुक्त + छंद = मुक्तच्छंद
2) परि + छेद = परिच्छेद
3) अनु + छेद = अनुच्छेद
4) अर्थ + छटा = अर्थच्छटा
5) मातृ + छाया = मातृच्छाया
6) पितृ + छाया = पितृच्छाया
7] ‘न’ ची व्यंजन संधी :-
अ) न् + कोणतेही व्यंजन = न् – (निघून जातो)
उदा.
1) राजन् + कुमार = राजकुमार
2) आत्मन् + हत्या = आत्महत्या
3) राजन् + मुद्रा = राजमुद्रा
4) प्राणिन् + हिंसा = प्राणिहिंसा
5) पक्षिन् + तीर्थ = पक्षितीर्थ
6) आत्मन् + प्रशंसा = आत्मप्रशंसा
ब) न् + स्वर = न् – (निघून जातो) (स्वर संधी)
उदा.
1) राजन् + इंद्र = राजेंद्र
2) योगिन् + ईश्वरी = योगीश्वरी
3) आत्मन् + आराम = आत्माराम
8] ‘र’ ची व्यंजन संधी :-
अ) र् + मृदु व्यंजन = र् + मृदु व्यंजन
उदा.
1) आशीर् + वाद = आशीर्वाद
2) चतुर् + वर्ण = चतुर्वर्ण
3) चतुर् + वेद = चतुर्वेद
4) पुनर् + जन्म = पुंनर्जन्म
5) पुनर् + विवाह = पुनर्विवाह
6) दुर् + भिक्ष = दुर्भिक्ष
7) पुनर् + वसन = पुनर्वसन
ब) र् + स्वर = र् + स्वर
उदा.
1) चतुर् + अस्त्र = चतुरस्त्र
2) दूर् + आग्रह = दुराग्रह
3) चतुर् + आनन = चतुरानन
4) चतुर् + अंग = चतुरंग
विसर्ग संधी :-
एका मागोमाग येणार्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण विसर्ग व दूसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर ते दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळून विसर्ग संधी होईल.
विसर्ग + स्वर = विसर्ग संधी
विसर्ग + व्यंजन = विसर्ग संधी
व्यंजन + व्यंजन = व्यंजनाचा विसर्ग होऊन विसर्ग संधी
विसर्ग संधीचे प्रकार :-
1) विसर्ग उकार संधी :
2) विसर्ग ‘र’ संधी :
3) विसर्ग ‘ष’ संधी :
4) विसर्ग ‘स’ संधी :
5) इतर विसर्ग संधी :
1) विसर्ग उकार संधी :-
अ/आ : + मृदु व्यंजन = अ + उ = ओ + मृदु व्यंजन
उदा.
1) मन: + भाव = अ + उ = ओ = मनोभाव
2) सर: + वर = अ + उ = ओ = सरोवर
3) तेज: + मय = अ + उ = ओ = तेजोमय
विसर्ग उकार संधी कशी ओळखावी :- संधी झालेल्या शब्दात दुसर्या अक्षराला एक काना आणि एक मात्रा येतो आणि त्याच्या पुढचे अक्षर हे मृदु व्यंजन असते.
यशोधन = यश+धन
मनोरथ = मन:+रथ
अधोवदन = अध:+वदन
तेजोनिधी = तेज:+निधी
मनोराज्य = मन:+राज्य
अधोमुख = अध:+मुख
2) विसर्ग ‘र’ संधी :-
अ) र् + कठोर व्यंजन = : + कठोर व्यंजन
उदा.
1) अंतर् + करण = अंत:करण
2) पुनर् + स्थापना = पुन:स्थापना
3) पुनर् + प्रक्षेपण = पुन:प्रक्षेपण
4) प्रातर् + काल = प्रात:काल
ब) उ/इ : + मृदु व्यंजन = र् + मृदु व्यंजन
उदा.
1) दु: + जन = दुर् + जन = दुर्जन
2) नि: + भय = निर् + भय = निर्भय
3) नि: + यात = निर् + यात = निर्भय
4) धनु: + विद्या = धनुर् + विद्या = धनुर्विद्या
क) उ/इ : + स्वर = र् + स्वर
उदा.
1) नि: + अर्थक = निरर्थक
2) नि: + अंक = निरंक
3) नि: + आदर = निरादर
4) नि: + इच्छ = निरिच्छा
5) बहि: + अंग = बहिरंग
3) विसर्ग ‘ष’ संधी :-
उ/इ : + क, ख, प, फ = ष्क, ष्ख, ष्प, ष्फ
उदा.
1) दु: + काळ = दुष्काळ
2) नि: + कारण = निष्कारण
3) नि: + कर्ष = निष्कर्ष
4) बहि: + कार = बहिष्कार
5) नि: + पाप = निष्पाप
6) दु: + कर्म = दुष्कर्म
7) नि: + फल = निष्फल
अपवाद :
1) नि: + पक्ष = नि:पक्ष
2) दु: + ख = दु:ख
4) विसर्ग ‘स’ संधी :-
अ) अ/आ : + कर / कार / कर्ता = स्क + —–
विसर्गाच्या मागे अ/आ स्वर व पुढे ‘कृ’ धातूची रुपे आल्यास विसर्गाचा ‘स’ बनतो त्यास विसर्ग ‘स’ संधी असे म्हणतात.
उदा.
1) नम: + कार = नमस्कार
2) पुर: + कार = पुरस्कार
3) पुर: + कर्ता = पुरस्कर्ता
4) भा: + कर = भास्कर
ब) स् + कठोर व्यंजन = : + कठोर व्यंजन
उदा.
1) मनस् + पटल = मन:पटल
2) तेजस् + कण = तेज:कण
क) विसर्गाच्या मागे उ/इ स्वर आला व विसर्गाच्या पुढे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो, किंवा विसर्गाच्या पुढे येणार्या व्यंजनाचे द्वित्त होते.
उ/इ : + स/श = 1) विसर्ग कायम राहतो / 2) स्स / श्श
उदा.
1) नि: + संदेह = नि:संदेह / निस्संदेह
2) नि: + सार = नि:सार / निस्सार
3) नि: + शंक = नि:शंक / निश्शंक
4) दु: + शासन = दु:शासन / दुश्शासन
5) इतर विसर्ग संधी :-
अ) अ : + कठोर व्यंजन = विसर्ग कायम राहतो
उदा.
1) रज: + कण = रज:कण
2) इत: + पर = इत:पर
3) अंत: + कलह = अंत:कलह
4) तेज: + पुंज = तेज:पुंज
ब) अ : + स्वर = विसर्ग निघून जातो.
उदा.
1) अत: + एव = अतएव
2) इत: + उत्तर = इतउत्तर
क) 1) : + च / छ = श + च = श्च
2) : + त / थ = स + त = स्त / स्थ
3) : + ट = ष + ट = ष्ट
उदा.
1) नि: + चय = निश्चय
2) नि: + चल = निश्चल
3) शनै: + चर = शनैश्चर
4) नि: + चिंत = निश्चिंत
5) नि: + तेज = निस्तेज
6) मन: + ताप = मनस्ताप
7) दु: + तर = दुस्तर
8) धनु: + टंकार = धनुष्टंकार
मराठीतील विशेष संधी :-
एकामागोमाग येणार्या दोन स्वरांपैकी एक स्वर कायम राहतो व दूसरा निघून जातो, तेव्हा त्यास मराठीतील विशेष संधी असे म्हणतात.
विशेष संधीचे दोन प्रकार पडतात :-
1) पूर्वरूप संधी
2) पररूप संधी
1) पूर्वरूप संधी :-
मराठीत केव्हा केव्हा संधी होत असतांना एकत्र येणार्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसर्या स्वराचा लोप होतो. या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात.
पूर्वरूप संधी = पहिलं कायम राहतो (स्वर) + दूसरा स्वर निघून जातो
उदा.
1) खिडकी + आत = ई + आ = खिडकीत
2) काही + असे = ई + अ = काहीसे
3) थोडे + असे = ए + अ = थोडेसे
4) कीती + एक = ई + ए = कीतीक
5) गरज + अनुरूप = गरजेनुरूप
2) पररूप संधी :-
केव्हा केव्हा एकत्र येणार्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दूसरा स्वर कायम राहतो. अशा प्रकारच्या संधीला पररूप संधी असे म्हणतात.
पररूप संधी = पहिला स्वर लोप पावतो + दूसरा कायम राहतो (स्वर)
उदा.
1) घर + ई = घरी
2) घर + आत = घरात
3) तेथे + ईल = तेथील
4) जुन + आट = जुनाट
5) हर + एक = हरेक
6) रेखा + ईव = रेखीव
7) कर + ऊन = करून
8) न + उमजे = नुमजे
‘ही’ हे शब्दयोगी अव्यय संख्याविशेषणाला जोडताना दोन प्रकारे पररूप संधी होते.
1) ‘ह’ चा लोप न होता :-
उदा.
1) दोन + ही = दोन्ही
2) तीन + ही = तिन्ही
2) ‘ह’ चा लोप होऊन :-
उदा.
1) दोन + ही = दोनी
2) तीन + ही = तिनी
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents