महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या: MPSC च्या सर्व परीक्षांच्या दृष्टीने महाराष्ट्राची नदीप्रणाली (Rivers in Maharashtra) हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि या भागावर MPSC च्या सर्व परीक्षांमध्ये दरवर्षी अनेक प्रश्न विचारले जातात. यामध्ये नदीचा उगम, तिची लांबी, तिने व्यापलेले क्षेत्रफळ आणि तिच्या उपनद्या असे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या नद्या (Important Rivers in Maharashtra), त्यांची उगमस्थाने, एकूण लांबी, क्षेत्रफळ आणि उपनद्या ही भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाची माहिती बघणार आहोत.
Rivers in Maharashtra घटकाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. महाराष्ट्रातील नद्यांचा (Rivers in Maharashtra) उगम कुठे होतो, महाराष्ट्रातील नद्यांची लांबी किती आहे, त्यांचे क्षेत्र किती आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत. ही सर्व महत्वाची माहिती आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्य नद्यांनी समृद्ध असे राज्य आहे. संपूर्ण भारतातील अत्यंत महत्त्वाच्या दोन नद्या (गोदावरी आणि कृष्णा) येथे उगम पावतात. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने महाराष्ट्राची जमीन सुपीक बनविली आहे आणि या नद्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक जडणघडणीत खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील नद्यांचे त्यांच्या वहनाच्या दिशेनुसार पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी असे वर्गीकरण करता येते….
महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेले खोरे:
गोदावरी= 49.5%
भीमा-कृष्णा = 22.6%
तापी-पूर्णा = 17.6%
कोकणातील नद्या = 10.7%
नर्मदा = 0.5%
नदी म्हणजे मोठ्या भूप्रदेशावरून एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा नैसर्गिक रुंद थंड पाण्याचा प्रवाह. नदीचा उगम
हा तलाव, मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो. https://t.me/Geography_Quiz
येथे आपण महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या अभ्यासणार आहोत.
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या
नदी |
उपनद्या |
गोदावरी |
प्रवरा,दारणा,प्राणहिता, मांजरा दक्षिण पुर्णा |
सिंदफना |
बिन्दुसरा |
भीमा |
मुळा,मुठा,इंद्रायनी घोड, नीर सीना, कहा पवना कुकडी.भामा |
कृष्णा |
वारणा वेण्णा कोयना पंचगंगा वेलूर |
वैनगंगा |
पैनगंगा, वर्धा कन्हान |
पुर्णा |
नळगंगा,काटेपूर्णा वाणगंगा |
तापी |
गिरणा,पूर्णा,पांझरा,अनेर |
उल्हास |
भातसा.मुरबाडी बारवी |
मांजरा |
मन्याड,लेंडी,तेरणा,तावरजा |
वेण्णा |
पोथरा,धाम,बोर |
नर्मदा |
तवा |
वर्धा |
निरगुडा, रामगंगा |
कन्हान |
नाग,कोलार,सांड,पंच |
join our channel : https://Telegram.me/Geography_Quiz
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
maharashtratil nadya
Table of Contents