रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास
स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त अशी रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे.
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास
रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात वसलेला आहे.
• जिल्ह्याच्या उत्तर सिमेवरून सावित्री नदी वाहते. जिल्ह्याच्या दक्षिण सिमेवरून शुक नदी वाहते.
• राज्याचे या जिल्ह्याने 2.66% क्षेत्र व्यापले आहे.समुद्र किनारा – 237 km (राज्यातील सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला जिल्हा)
• जिल्हा मुख्यालय – रत्नागिरी येथे आहे
रत्नागिरी जिल्हयातील तालुके :
रत्नागिरी जिल्हयात एकुण 9 तालुके आहेत
- रत्नागिरी
- खेड
- गुहागर
- चिपळुण
- दापोली
- मंडणगड
- राजापुर
- लांजा
- संगमेश्वर (तालुका मुख्यालय – देवरुख)
• लोकसंख्या – 1615069 (सन 2001 – 11) या दशकात या जिल्ह्याने लोकसंख्या वृद्धी = -4.82% दर्शविला.
रत्नागिरी जिल्हयातील मृदा प्रकार :-
जांभा खडकांपासून बनलेली मृदा आहे. ऑक्सिडीकरण प्रक्रियेमुळे तिचा रंग गर्द लाल ते तांबूस – तपकिरी असा आढळतो.
येथील मृदेचे वर्गीकरण खालील ४ प्रकारात करता येते
1. भातासाठी उपयुक्त – ओलावा धरून ठेवणारी
2. नारळ-सुपारी साठी – समुद्र किनार्यालगतची मृदा
3. आंबा, काजू, फलोत्पादन – डोंगरउताराची वरकस जमीन
4. लागवडीस अयोग्य जमिन – सरयुक्त मृदा
रत्नागिरी जिल्हयातील खनिजे :-
1. जांभा – बांधकामासाठी उपयुक्त
2. कुरंद दगड – धन्य दळण्याची जाती बनविण्यासाठी
3. शिरगोळा दगड – रांगोळी बनविण्यासाठी
4. सिलिका खनिज – राजापूर तालुक्यात सापडते.
5. इल्मेनाइट – मालगुंड ते पुर्णगंड या परिसरात आढळतात.
रत्नागिरी जिल्हयातील प्रमुख नद्या :-
-
सावित्री,
-
भरणा,
-
जोग,
-
जगबुडी,
-
वशिष्ठी,
-
शास्त्री,
-
बाव,
-
काजवी,
-
मुचकंदी
या सर्व नद्या उत्तरे कडून दक्षिणे कडे वाहतात
रत्नागिरी जिल्हयातील हवामान :- सम, उष्ण, दमट
रत्नागिरी जिल्हयातील गरम पाण्याचे झरे :-
-
उन्हाळे —- राजापूर तालुका (राजापूर येथेही गरम पाण्याचे झरे आहे.)
-
उन्हावरे —- दापोली तालुका
-
आरवली—- संगमेश्वर तालुका
-
राजवाडी —- संगमेश्वर तालुका
रत्नागिरी जिल्हयातील वने :-
जिल्ह्यात वनांचे क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यात एकून क्षेत्रफळापैकी 51.13% वन व्याप्त क्षेत्र आहे.
जिल्ह्याच्या पुर्वीकडील सहयाद्री डोंगररांगात कातकरी ही आदिवासी जमात आढळते.
रत्नागिरी जिल्हयातील डोंगरी किल्ले :-
-
सुमारगड,
-
मंडनगड,
-
भैरवगड,
-
महिपतगड,
-
रायगड,
-
पासगड,
-
प्रचीतगड,
-
वासोटा.
रत्नागिरी जिल्हयातील जलदुर्ग :-
-
सुवर्णदुर्ग,
-
रत्नदुर्ग,
-
जयगड,
-
पूर्णगड
रत्नागिरी जिल्हयातील घाट :-
घाट |
मार्ग |
|
महाड-दापोली रास्ता |
|
कऱ्हाड-चिपळूण |
|
कोल्हापूर-राजापूर रास्ता |
|
सातारा – रत्नागिरी |
|
कोल्हापूर-रत्नागिरी रास्ता |
रत्नागिरी जिल्हयातील खाड्या :-
-
बाणकोट,
-
केळशी,
-
दाभोळ,
-
जयगड,
-
भाट्ये,
-
पूर्णगड,
-
जैतापुर,
-
विजयदुर्ग
रत्नागिरी जिल्हयातील उद्योगधंदे :-
समुद्राशी संबंधीत व्यवसाय रत्नागिरीत मोठया प्रमाणात असुन येथील अर्थव्यवस्था बर्याच प्रमाणात समुद्राशी निगडीत आहे.
-
येथे काजुच्या बोंडापासून फेणी हे मद्य तयार केले जाते
-
या ठिकाणचा हापुस आंबा फार प्रसिध्द असुन विदेशात देखील निर्यात केला जातो.
-
नारळ, काजु, फणस, आमसुल (रातांबा) सूध्दा मुबलक प्रमाणात होतात.
-
या ठिकाणी प्रामुख्याने तांदळाची शेती केली जाते.
-
कोकम पासून आमसुल तयार करणे
-
एनरॉन विद्युत प्रकल्प
रत्नागिरी जिल्हयातील महामार्ग :-
-
राष्ट्रीय महामार्ग ६६ (जुने नाव NH 17 )
हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पुर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १२६९ किमी धावणारा हा महामार्ग मुंबईला केरळमधील कोची ह्या शहराशी जोडतो. पनवेल, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुपी, मंगलोर व कालिकत ही रा.म. 66 वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
रा. म. 66हा कोकणातील तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. १९९८ सालापर्यंत कोकण रेल्वे सुरू होण्या्पूर्वी
रा. म.66हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता.NH 17 – पनवेल–मंगळूर (गोवामार्गे)
-
राष्ट्रीय महामार्ग 204 – रत्नागिरी–कोल्हापूर एकूण लांबी १२६ किमी (राज्यातच सुरू होऊन राज्यातच संपतो.)
रत्नागिरी जिल्हयातील बोगदा :-
रत्नागिरी जवळचा “कुरबुडे” येथील 6.5 लांबीचा बोगदा हा देशातील दुसर्या क्रमांकाचा बोगदा ठरतो.
रत्नागिरी जिल्हयातील महत्वाची स्थळे :-
1. रत्नागिरी :- लोकमन्या टिळक जन्मस्थान, रत्नदुर्ग किल्ला, भगवती बंदर(भात्ये), थिबा राजवाडा, पतितपावन मंदिर (सावरकरांचे सामाजिक कार्य.)
2. गणपतीपुळे : रत्नागिरी पासुन साधारण 40 कि.मी. अंतरावर गणपतीपुळे हे स्वयंभु गणेशाचे मंदिर असुन साधारण 400 वर्षांपुर्वी पासुन हे मंदिर असल्याचे येथील भावीक सांगतात.
3. भात्ये :- कोकण कृषि विध्यापीठांतर्गत असलेले नारळ संशोधन केंद्र.
4. दापोली :- बाळासाहेब सावंत कोकण कृषि विध्यापीठ. रत्नागिरीचे महाबळेश्वर असे म्हणतात
5. हर्णे :- बंदर, सुवर्णदुर्ग (जलदुर्ग)
6. बाणकोट :- बंदर (खाडीच्या मुखाशी असलेले बंदर) मंडणगड तालुक्यात.
7. दाभोळ :- मासेमारी केंद्र
8. पन्हाळेकामी :- कोरीव लेणी (ढापोली तालुक्यात)
9. उन्हाळे :- राजपुरजवळ गरम पाण्याचे झरे. राजपूरची गंगा प्रसिद्ध आहे
10. केळशी :- याकुब बाबांची दर्गाह
11. संगमेश्वर :-
1) बाबा व घारेश्वर गंगा या नाद्यांच्या संगमावरील ठिकाण. 2) कर्णेश्वराचे मंदिर प्रसिद्ध 3) संभाजी महाराज स्मारक
12. पावस :- स्वामी स्वरूपानंद समाधी आहे
नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
सराव पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
101 total views , 1 views today
Table of Contents