राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १९०९- मृत्यू : १९६८)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रश होऊन त्यांना भात म्हणत. बारश्याला दिनांक ११ मे १९०९ रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु श्री संत गुलाब महाराज व याव्लीचे महाराज यांनी मुलाचे नाव ‘माणिक’ ठेवले आणि आशीर्वाद देवून निधून गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आडकोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ ! ठेवले होते.
इ.सन.१९२५ मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन,कीर्तन, प्रवचन करू लागले. त्यांनी खंजेरी वर उत्तम भजने गायली.दि. २३ फेब्रुवारी १९३५ शनिवार रोजी सालबर्डी येथील अज्ञांत आले. पुढे त्यांचा गांधीजींशी सहवास झाला. २८ ऑगष्ट१९४२ शुक्रवार रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली. आणि डिसेम्बर मध्ये सुटका झाली. १९४३ मध्ये विश्वशांतीनाम सप्ताह झाला.५ एप्रिल १९४३ सोमवार रोजी श्री गुरुदेव मुद्र्नाल्याची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. १९ नोहेंबर १९४३ शुक्रवार रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली.हरीजनां साठी त्यांनी मन्दिरे खुली केली. ते म्हणत गावा गावासी जागवा । भेदभाव समूळ मितवा” उजळा ग्रामोन्नतिचा दिवा । तुकड्या म्हणे ।”
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा बद्दल संपूर्ण माहिती
संपूर्ण नाव : माणिक बंडोजी इंगळे
जन्म : ३० एप्रिल १९०९ (यावली अमरावती)
मृत्यू : ११ ऑक्टोबर १९६८ (गुरुकुंज आश्रम अमरावती)
आई : मंजुळा माता
वडिल : बंडोपंत
गुरू : आडकोजी महाराज
कार्य :
- १५ जानेवारी १९२५ गृहत्याग करून तपोसाधनेसाठी रामटेकच्या उभारण्यात निघाले, सात महिने श्रिराम मंदिर, नारायण टेकडी, कापूरबावडी परिसरात योगसाधना,
- १ ऑक्टोबर १९२५ चंद्रपूर जिल्ह्यातील नेरिला कृष्णराव भुते यांच्या आग्रहाने गेले. चिमुरच्या बालाजी मंदीरात भजन गायले.
- १९२६ सहा महिने राम दिपी, सात बहिनी पहाड आणि ताडोबाच्या वनात वास्तव्य केले.
- १९२९ श्रीतुकड्यादासकृत भजनावली प्रकाशित सध्या स्वानंदामृत भजनावली असे नाव आहे.
- १९३५ सालवडींच्या यज्ञान दहा लाख लोकांची उपस्थिती.
- ४ एप्रिल १९३५ मोझरी धर्मसेवा आश्रमाचे भूमीपुजन
- ३१ मार्च १९३६ महात्मा गांधी यांनी राष्ट्रसंतांना सेवाग्रामला बोलविले.
- ५ मे १९३६ पवनार आश्रमात आचार्य विनोबा भावे यांनी महाराजांना संमेलनात सहभागी होण्यासाठी आमंजन दिले.
- १९४० आकोल्याच्या शिख धर्म परिषदेत सहभाग.
- गावागावात आरती मंडळ स्थापन करून लोकजागृती,
- आदिवासीना जीवन जगण्याचा पाठ दिला.
- १९४१ वरखेडला श्री गुरुदेव चरखा संघ स्थापना.
- २५ सप्टेंबर १९४२ बेलापूर साखर कारखान्यातील भजनानंतर महाराजांना क्रांतीवीर तुकडोजी अशी ओळख.
- १९४२ मोझरीत राष्ट्रधर्म शिक्षण वर्गात मर्दानी व मैदानी व्यायामाचे शिक्षण.
- अब काहे को धुम मचाते हो या भजनावरुन राष्ट्रसंतांना अटक करून नागपूर, रायपूरच्या तुरुंगात टाकण्यात आले होते.
- १९४३ श्री गुरुदेव मासिक सुरू
- १९४४ अनेक गावांमध्ये महिलामंडळ आणि राष्ट्रसेविका समितीची स्थापना.
- ११ नोव्हेंबर १९४७ रामटेकचे मंदिर हरिजनांसाठी खुले.
- १९४९ आमगावात सामुदायीक शेतीचा यशस्वी प्रयोग राबविला.
- १९५३ – १५ व्या विदर्भ साहित्य संघाचे उद्घाटक व आयोजक पदाचा मान.
- २२ जुलै १९५३ पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरी राष्ट्रसंतांना मागिता लेखणाची प्रेरणा मिळाली.
- ३१ जुलै १९६७ अध्यात्म केंद्राची स्थापना
- ६ जुलै १९६८ पंढरपूर येथील हनुमान मंदिर मैदानात आषाढी एकादशीला अखेरचे भजन.
- ११ ऑक्टोबर १९६८ सायंकाळी ४ वाजून ५८ मिनीटांनी महानिर्वान
राष्ट्रसंतांची साहित्य संपदा :
वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मराठी साहित्य संपदा
1)ग्रामगीता(ओवीबद्ध)
2)तुकड्यादास भजनांमृत सागर ( मराठी)
3)अनुभवांमृत अभंग गाथा
4)अनुभव सागर भजनांवली भाग 1
5)अनुभव सागर भजनांवली भाग 2
6) जीवन जागृती भजनांवली
7)लोक शाहीचे पोवाडे
8) समाज संजीवनी भजनांवली
9) दिव्यदर्शन भजनांवली
10) क्रांतीवीणा भजनांवली
11) नव -जागृती भजनांवली
12)विवेक – माधुरी भजनांवली
13)राष्ट्रीय भजनांवली
14)अरुणोदय भजनांवली
15) भक्तीकुंज भजनांवली
16)आदेश रचना
17) आत्मविकास अभंगावली.
18) माझी आत्मकथा
19) स्फूर्ति तरंग
20)सुविचार- स्मरणी
21) आनंदामृत ( ओवीबद्ध ग्रंथ)
22) श्री गुरुदेव विवाह पद्धती
23) गीता प्रसाद (लेख संग्रह)
24)युग प्रभात (लेख संग्रह )
25) विश्वशांति योग लेखसंग्रह
26) आर्वीच्या संत मायबाई चरित्र
27) मायमंजुळा चरित्र
28) राष्ट्रसंतांची प्रवचने
29) राष्ट्रसंतांची पत्रे
30) राष्ट्रसंतांची भाषणे
31)भाव मंजिरी
32)संस्कार साधना
33)प्रचार मार्गदर्शिका
मराठीतील साहित्य –
भजने – ११६० अभंग – २२०९ श्लोक – ६७६
ओव्या – ५१४९ पोवाडे – १० मंगलअष्टक – ११
हिंदीतील साहित्य –
भजने – २३६९ बरखा – १७४६ सदविचार – १५१७
प्रार्थनाटक – ०८ मंगलअष्टके – ०५
अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयसेवेची पूर्तीच होय. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.
खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents