रमेशचंद्र दत्त 1848-1909 यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८४८ - मृत्यू : १९०९)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
रमेशचंद्र दत्त हे भारताच्या आर्थिक इतिहासाचे सखोल विवेचक व भाष्यकार होते.सेवानिवृत्तीनंतरच्या काळात त्यांनी महत्त्वपूर्ण वैचारिक व ललित ग्रंथ लिहिले.
रमेशचंद्र दत्त यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
जन्म : १३ ऑगस्ट १८४८ (कोलकाता)
मृत्यू: ३० नोव्हेंबर १९०९ (बडोदा)
- रामायण आणि महाभारताचा इंग्रजीत अणुवादन
शिक्षण – कोलकाता विश्वविद्यालय, युनिवर्सिटी कॉलेज लंडन
व्यवसाय – इतिहासकार, अर्थशास्त्री, भाषाशास्त्री, सिविल सेवक, राजनेता
पत्नी – मनमोहिनी दत्त
- १८६८ आर. सी. रास परीक्षेसाठी इंग्लंडला
- १८६९ परीक्षा उत्तीर्ण
- १८७१ श्री ईयर्स इन इंग्लंड
- उडीसाचे कमिशनर, बडोदाचे दिवान, रॉयल कमिशनचे सदस्य
- १८९९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (लखनौ अधिवेशन अध्यक्ष)
- १८९७-१९०४ लंडन विश्वविद्यालय – भारतीय इतिहासाचे प्राध्यापक
ग्रंथ :
१) ए हिस्ट्री ऑफ सविलिजेशन इन एशेट इंडिया २) लेटर हिंदू सिविलिजेशन
३) इकॉनोमिक हिस्ट्री ऑफ इंडिया ४) इंडियंस इन दि विक्टोरियन एज
५) ए हिस्ट्री ऑफ दि लिटरेचर ऑफ बंगाल ६)दि महाभारत रोड दि रामायण
७) लेज ऑफ एन्शीएंट इंडिया ८) ग्रेट एपिक्स ऑफ एन्शीएंट इंडिया
९) शिवाजी १०) लेक ऑफ पाम्स
११) दि स्लेव गर्ल ऑफ आगरा १२) श्री ईसर्स इन इंग्लंड
१३) वि पेजेंद्री ऑफ बंगाल १४) ऋग्वेद
१५) इंग्लंड अॅन्ड इंडिया १६) बंगबिजेता (१८७४)
१७) माधवीकंकण (१८७७) १८) महाराष्ट्र जीवन प्रभात (१८७८)
१९) राजपुत जीवन संध्या (१८७९) २०) संसार (१८८६)
२१) समाज (१८९४) २२) शतवर्ष
२३) संसार कथा
सेवानिवृत्तीनंतर त्यांची लंडन विद्यापीठात भारतीय इतिहासाचे अध्यापक म्हणून नियुक्ती झाली. १९०४ मध्ये ते भारतात परतल्यावर बडोदा संस्थानात महसूलमंत्री म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले. १९०८ मध्ये ते विकेंद्रीकरण आयोगाचे सदस्य म्हणून नेमले गेले. १९०९ मध्ये बडोदा संस्थानचे दिवाण म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बडोद्यास त्यांचे निधन झाले. सेवानिवृत्तीनंतरच्या काळात त्यांनी महत्त्वपूर्ण वैचारिक व ललित ग्रंथ लिहिले.
भारताचा इतिहास व बंगाली साहित्याचा परियच पाश्चात्त्यांना व्हावा म्हणून त्यांनी इंग्रजीत काही ग्रंथ लिहिले. द लिटरेचर ऑफ बेंगॉल (१८८७), हिस्टरी ऑफ सिव्हिलिझेशन इन एन्शन्ट इंडिया (खंड, १८९०), लेज ऑफ एन्शन्ट इंडिया (पद्य, १८९४), महाभारत व रामायण यांचा इंग्रजी काव्यानुवाद (१८९९) इ. ग्रंथांचा या संदर्भात उल्लेख करता येईल.
याशिवाय त्यांच्या इंग्रजी ग्रंथांत थ्री यीअर्स इन यूरप (१८७२), पीझंट्री ऑफ बेंगॉल (१८७५) आणि यांखेरीज इंग्रजी अंमलाखालील भारताच्या आर्थिक परिस्थितीसंबंधी व दारिद्रद्र्यासंबंधी मूलगामी संशोधन व विवेचन करणारे ग्रंथ इत्यादींचा समावेश होतो. भारतीयांच्या हितार्थ रमेशचंद्रांनी केलेल्या कार्याची विस्तृत माहिती त्यांच्या स्पीचेस अॅँड पेपर्स (२ खंड, १९०२) या इंग्रजी ग्रंथात आली आहे. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांना त्या काळी बरीच प्रतिष्ठा व प्रसिद्धी लाभली होती.
बंकिमचंद्रांच्या प्रोत्साहनाने रमेशचंद्र बंगालीत लिहू लागले आणि एक थोर बंगाली साहित्यिक म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यांची पहिली ऐतिहासिक बंगाली कादंबरी वंगविजेता (१८७४) ही अकबरकालीन ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधिष्ठित आहे. त्यानंतर रमेशचंद्रांनी माधवीकंकण (१८७७), महाराष्ट्र जीवन प्रभात (१८७८) आणि रजपूत जीवन संध्या (१८७९) अशा तीन ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. संसार (१८८६) व समाज (१८९४) या मध्यमवर्गीय जीवनावर आधारित अशा दोन सामाजिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या.
रमेशचंद्र दत्त हे भारताच्या आर्थिक इतिहासाचे सखोल विवेचक व भाष्यकार होते. भारतीय अर्थव्यवस्था ही अविकसित नसून तिचा विकास व गतिमानता कुंठित (बद्ध) झाल्याचे दत्तांचे ठाम मत होते. सबंध असमाधानकारक कृषिस्वरूप, विशेषतः भारतातील भूधारणव्यवस्था, ह्या गोष्टी आर्थिक विकासाला अडथळा आणीत असून त्यांयोगे शेतमजूर कुळे, तसेच लहान व मध्यम शेतकरी या सर्वांचे जीवनमान निराशाजनक बनले आहे इत्यादीसंबंधी दत्तांनी केलेल्या विश्लेषणामध्ये पुढे पन्नास वर्षांनंतर उदयास आलेली नवीन विचारबीजे आढळतात.
दत्तांच्या लेखनशैलीतील सौंदर्य, आवेश व जोम हा सर्वांना आकृष्ट करीत असे आणि त्यांच्या कल्पनाविचारांचा आशय सर्वांवर प्रभाव पाडीत असे. त्यांनी प्रतिपादिलेली काही सत्ये, सुधारित स्वरूपात, अर्थशास्त्रीय मूलसिद्धांतांप्रमाणे आजही टिकून राहिली आहेत, असे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी दत्तांविषयी म्हटले आहे.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents