राजर्षी शाहू महाराज यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८७४- मृत्यू : १९२२)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,483

शाहू महाराजांना शेतकऱ्यांचा राजा, कष्टकऱ्यांचा राजा, कुस्तीकरांचा राजा, भारतीय वसतीगृहाचे जनक, आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाते.

राजर्षी शाहू महाराज यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

जन्म: २६ जून १८७४ (सामाजिक न्याय दिवस)

जन्मगाव : कोल्हापूर (कागलच्या जहागिरीत), लक्ष्मी विलास राजवाडा

आईचे नाव : राधाबाई वडिल जयसिंगराव घाटगे

संपूर्ण नाव : यशवंत जयसिंगराव घाटगे

पत्नी : लक्ष्मीबाई साहेब

  • १८७६ शाहू महाराजांच्या लहान भावाचा (बापूसाहेबांचा जन्म.
  • १८७७ राधाबाईचे निधन
  • १८८३ चौथे शिवाजी (नारायणराव) यांचे निपुत्रिक निधन. (अहमदनगरच्या तुरुंगात)
  • १७ मार्च १८८४ रोजी चौथ्या शिवाजीच्या पत्नी आनंदीबाई यांनी जयसिंगराव पाटगे (आबासाहेब) यांचे जेष्ठ चिरंजीव यशवंत यास दत्तक घेतले त्यावेळी त्यांचे वय १० वर्षे होते.
  • १८८४ राजकोट येथील राजकुमार विद्यालयात व धारवाड येथे शिक्षण त्यांचसोबत बुवासाहेब इंगळे हे क्रिडापटू होते.
  • सर फ्रेंजर व रघुनाथराव सबनीस हे गुरु
  • २० मार्च १८८६ आबासाहेब यांचे निधन (३० व्या वर्षी)
  • ८ मे १८८८ शाहूंच्या हस्ते कोल्हापूर मीरज रेल्वेमार्गांची पायाभरणी (१८९१ पासून हा मार्ग सुरू)

राजर्षी शाहू महाराज यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 

  • १८८६-८९ दत्तोबा शिंदे व पांटू भोसले यांच्याकडून मल्ल विद्या शिकले.
  • १८८९-९३ स्टुअर्ट फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे प्रशिक्षण.
  • १ एप्रिल १८९१ बडोद्याच्या गुणाजी खानवीलकर यांची लक्ष्मीबाई या कन्येशी विवाह.
  • दोन मुले एक राजाराम दुसरा – शिवाजी
  • दोन मुली एक राधाबाई दुसरी – आऊबाई
  • १८९१ गव्हर्नर लॉर्ड हेरिस यांच्या हस्ते कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गाचे उद्घाटन.
  • १८९३ शाहू महाराजांचे देशी शिक्षक म्हणून रघुनाथ सबनीस यांची निवड.

 

  • १० मार्च १८९४ शाहू महाराजांना कन्यारत्न (मुलीचे नाव – राधाबाई)
  • २ एप्रिल १८९४ शाहू महाराजांचा राज्याभिषेक (त्या वेळेस त्यांच्या दरबारी लॉर्ड हॉरस हा ब्रिटीशांचा राजनैतिक प्रतिनिधी म्हणून काम पाहत होता.)
  • १८९४ जनकल्यानकारी प्रथम जाहीरनामा काढला.
  1.  वेठबिगारी पद्धत कोल्हापूर संस्थानात बंद
  2.  रघुनाथ सबणीस यांची चिटणीस म्हणून निवड.
  • १८९५ : 
  1. मोतीबाग येथे कुस्तीकरांसाठी तालीम सुरू केली
  2. शाहपुरी येथे गव्यची बाजारपेठ सुरू केली.
  3. गव्हर्नर जनरलने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचे अधिकार शाहू महाराजांना दिले.
  • १८९५ सौ. राधाबाई केळकर यांची स्त्री शिक्षण खात्याच्या अधिक्षिका म्हणून नेमणूक.

 

  • १८९६ :   
  1.  व्हिक्टोरिया मराठा बोडिंग या पहिल्या वसतीगृहाची स्थापना
  2. अहिल्याबाई यांच्या स्मरणार्थ कोल्हापूरमध्ये देशी दवाखाना चालू केला.
  • १८९७ : 
  1. शाहू महाराजांना पुत्ररत्न (मुलाचे नाव राजाराम)
  2.  कर्नल रे यांची राजनैतीक प्रतिनिधी म्हणून कोल्हापूरमध्ये निवड
  • १८९९ कमीज विद्यापीठाने शाहू महाराजांचा सन्मान व डॉक्टर ऑफ ही मानद पदवी दिली.
  • १९०० महाराणी व्हिक्टोरियाने शाहू महाराजांना महाराज ही पदवी दिली.
  • १९०१ : 
  1. कोल्हापूर संस्थानात गोवंश हत्या बंदी कायदा केला.
  2. महाराणी व्हिक्टोरिया मराठा बोटिंग सुरू केले.
  3. दिगंबर जैन वसतीगृह सुरू केले.
  • १९०२ मागासलेल्या जाती जमातीसाठी सरकारी नोकरीत ५० टक्के राखील जागा घोषित करणारे भारतातील प्रथम संस्थान.
  • १९०२ शाहू महाराज राजा एडवर्डच्या राज्यारोहण कार्यक्रमासाठी इंग्लडला गेले.
  • १९०२ सार्वजनिक पाटबंधारे धोरण जाहीर करणारे प्रथम संस्थानिक.
  • १९०४ भास्कर जाधव यांची कोल्हापूर जाहीर करणारे अधिक्षक म्हणून नियुक्ती (भास्कर जाधव यांनी १८९५ मध्ये सहाय्यक सुभा म्हणुनही काम केले होते.)
  • १९०६ :
  1. शाहू स्पिनिंग अॅन्ड विव्हिंग मिलची पायाभरणी
  2. द किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
  3. मुस्लिम समाजातील मुलांसाठीचे वसतृगृह सुरू केले.
  • १९०७ :
  1. सहकारी तत्त्वावर शाहू कापड मिलची स्थापना.
  2.  वीरशैव लिंगायत वसतीगृहाची स्थापना.
  3. भोगावती नदीवर राधानगरी धरणाची पायाभरणी त्यास महाराणी लक्ष्मी तलाव असे नाव देण्यात आले.
  • १९०८ :

१) अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क वसतीगृहाची स्थापना               २) राधाबाई यांचे विवाह

  • या विवाहाच्या स्मरणार्थ कोल्हापूरमध्ये सभामंडप बांधण्यात आला.
  • राधानगरी हे गाव वसविले.
  • १९०८ राधानगरी धरण बांधले. श्रीमंत बापुसाहेब महाराज यांच्या नियंत्रणाखाली. (या धरणाच्या सागराचे नाव लक्ष्मीबाई सागर)
  • १९११ कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची स्थापना.
  • १९१२ :
  1.  पाटील शाळा सुरू केल्या.
  2. खासबाग येथे तालीम सुरू केली.
  3. पांचाळ ब्राह्मण वसतीगृह, कायस्थ प्रभू वसतीगृह व सारस्वत बोर्डिंग हे वसतीगृह सुरू केले.
  • १९१३ :
  1. सत्यशोधक समजाची पहिली शाळा कोल्हापूरमध्ये सुरु केली.
  2. अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना कोल्हापूरमध्ये केली.
  • १९१४ – कोल्हापूर येथे औद्योगिक व शेतकी प्रदर्शनाचे उद्घाटन
  • १९१५ – इंडियन ख्रिश्चन वसतीगृहाची स्थापना
  • १९१६ – डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना निपानी येथे केली.
  • १९१७ :
  1. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याची घोषणा केली व मोफत सुद्धा.
  2. डॉ. कुर्तकोटी यांची कर्मवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून नेमणूक.
  3. विधवा पुनर्विवाह कायदा व विवाह नोंदणी कायदा यांच्या अंमलबजावणीस सुरूवात.
  4. खामगाव येथील ११ व्या मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष.
  • १९१८ :

राजर्षी शाहू महाराज यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

  1. कोल्हापूर येथे आर्य समाजाची स्थापना.
  2. कोल्हापूर संस्थानात बलुतेदारी पद्धत बंद करण्यात आली.
  3. आंतरजातीय विवाह कायदा केला.
  4.  कुलकर्णी वतने रद्द केली.
  5. तलाठी शाळा सुरु केल्या.
  6. शाहु महाराजांचे दुसरे चिरंजीव शिवाजी यांचे निधन.
  7. राजाराज कॉलेजची स्थापना.
  • १९१९ :
  1. कानपूर येथील १३ व्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेचे अध्यक्ष येथे त्यांना राजर्षी पदवीने सन्मानित केले.
  2. स्त्री अत्याचार प्रतिबंधक व घटस्फोट मान्यता कायदा मंजुर
  3. वैदिक शाळा स्थापन.
  • १९२० :
  1. जोगिणी देवदासी निर्मूलन कायदा संमत
  2.  हुबई येथील ब्राह्मणेत्तर समाज परिषदेचे अध्यक्ष.
  3. छावजगद्गुरु म्हणून सदाशिवराव पाटील यांची नियुक्ती.
  4. पुणे येथे शिवाजी सोसायटीची वार्षिक सभा भवानी पेठेतील विट्ठल धर्मशाळेत शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली.
  • शाहू महाराजांनी आर्थिक सहाय्य केलेली वृत्तपत्रे
  1. संजीवन दत्तात्रय भिकाजी रणदिवे ब्राह्मणेत्तर चळवळीचे (साप्ताहिक)
  2. शिवछत्रपती (दैनिक) कितवान निंबाळकर
  3. मुकनायक डॉ. आंबेडकर, डेक्कर रयत (इंग्रजी साप्ताहिक काठोरी व लट्ठे )
  4. राष्ट्रवीर – साप्ताहिक
  5. संदेश साप्ताहिक
  • ६ मे १९२२ शाहु महाराजांचा मृत्यू (मुंबई)
  • शाहु महाराजांबद्दल काढलेले उद्गार
  1.  “सर्वांगीण युगपुरुष” – वि. रा. शिंदे
  2. “छत्रपती शाहू महाराजासारखा सखा राजा यापूर्वी आम्हा दलितांना कधी लाभला नाही व यापुढेही लाभणार नाही” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  3.  He was a king But democretic king – माधवजी बागल
  • शाहु महाराजांनी काढलेले उद्गार
  1. माझी जनता फक्त इयत्ता ३ री उत्तीर्ण झाली तरी मी माझे संपूर्ण राज्य तिच्या स्वाधीन करेन.
  2. कामगारांना संघटीत व्हा, हे संघटनेचे युग आहे.
  • राजब्रिदवाक्य – जय भवाणी
छत्रपती शाहू महाराजांची कोल्हापूर शहरातील २३ वसतीगृहे :

१) व्हिक्टोरिया मराठा बोटिंग (१९०१)

२) दिगंबर जैन बोडिंग (१९०१)

३) वीरशैव लिंगायत बोटिंग (१९०७)

४) पांचाळ ब्राह्मण वसतीगृह (१९९२)

५) कायस्य प्रम वसतीगृह (१९१२)

६) सारस्वत बोर्डिंग (१९१२)

७) इंडियन ख्रिश्चन वसतीगृह (१९१५)

८) देवज्ञ बोर्डिंग (१९१६)

९) वैश्य हॉस्टेल (१९१८)

१०) आर्य समाज हॉस्टेल (१९१८)

११) ठोर चांभार हॉस्टेल (१९१९)

१२) श्री नामदेव बोर्डिंग (१९१९)

१३) शिवाजी वैदिक बोर्डिंग (१९२०)

१४) सोमवंशीय आर्य क्षत्रिय बोर्डिंग (१९२०)

१५) सुतार बोडिंग (१९२१)

१६) नाभीक विद्यार्थी बोर्डिंग (१९२१)

१७) देवांग बोर्डिंग हाऊस (१९२१)

१८) भोई समाज बोर्डिंग (१९२१)

१९) राजपुतवाडी बोर्डिंग (१९२१)

२०) रुकडी बोर्डिंग (१९२१)

२१) मुस्लीम बोर्डिंग (१९२१)

२२) इंदुमती बोर्डिंग

२३) भिसे क्लार्क बोर्डिंग (महार, मांग, ढोर, चांभार मुलांसाठी )

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम