प्रल्हाद केशव अत्रे / आचार्य अत्रे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८९८ - मृत्यू : १९६९)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
प्रल्हाद केशव अत्रे / आचार्य अत्रे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
जन्म: १३ ऑगस्ट १८९८
मृत्यू: १३ जून १९६९
जन्मगाव : कोडित खुर्द, ता. पुरंदर
टोपण नाव: केशवकुमार
वडिल: केशव विनायक अत्रे
आई : अन्नपूर्णाबाई
-
- मराठीतील प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ञ, राजकारणी व वक्ते
- संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते.
- १९२३ अध्यापन मासिक
- १९२४ मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी. टी. परीक्षेत वर्गात प्रथम.
- १९२६ रत्नाकर मासिक
- १९२९ मनोरमा मासिक
- १९३४ नारद – नारदी चित्रपटाची कथा व संवादावर लेखन.
- १९३५ नवे अध्यापन मासिक
- १९३७ धर्मवीर पटकथा (हंस पिक्चर्ससाठी)
- १९३७ पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज सुरु.
- १९३८ ‘हंस’ साठीच ब्रह्मचारी कथा लेखन.
- १९३९ इलाखा शिक्षक मासिक
- १९४० नवयुग पिक्चर्सतर्फे लपंडाव चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहीली.
- १९ जानेवारी १९४० – नवयुग साप्ताहिक (१९६२ पर्यंत चालू)
- २ जून १९४७- जयसिंग सांजदैनिक मासिक
- १५ नोव्हेंबर १९५६ – मराठा दैनिक
-
अध्यापन कार्य :
– मुंबई – सँडर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले.
– फोर्टमधल्या भरडा न्यू हायस्कूल – संस्कृत शिक्षक
– पुणे – कॅम्प एज्यूकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक.
-
इतर :
– पुणे – राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना.
– नवयुग वाचनमाला (प्राथामिक शाळेसाठी) व अरूण वाचनमाला (दुय्यम शाळेसाठी) ह्या दोन क्रमिक पुस्तकाच्या माला लिहील्या.
– अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या श्यामची आई चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ मिळाले होते.
-
नाटके :
उद्याचा संसार, एकच प्याला, विडंबन, कवडी चुंबक, गरुदक्षिणा, घराबाहेर, डॉ. लागू, जग काय म्हणेल?, तो मी नव्हेच, पराचा कावळा, प्राणीग्रहण, प्रल्हाद (नाटक), प्रितीसंगम, भ्रमाचा भोपळा, ब्रह्मचारी, मी उभा आहे, मी मंत्री झालो, मोरुची मावशी, लग्नाची बेडी, वंदे भारतम, वीरवचन, शिवसमर्थ
- काव्य : गितगंगा, झेंडूची फुले
- कादंबऱ्या – चांगुणा, मोहित्यांचा शाप
- आत्मचरित्र – कऱ्हेचे पाणी
- पुरस्कार : विष्णुदास भावे पुरस्कार
पुस्तके
शाळांसाठी क्रमिक पुस्तके
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश) यांनी संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते इंग्रजी पाचवी (हल्लीची पाचवी ते नववी) च्या अभ्यासक्रमांत होती, सन १९३४ साली निघालेल्या या क्रमिक पुस्तकांसारखी सुरेख पुस्तके त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही निघाली नाहीत, असे शिक्षकांचे आणि पालकांचे मत आहे. ही पुस्तके पहायला मिळणेही अशक्यप्राय झाल्याने, डिंपल प्रकाशनाने या पुस्तकांची नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती आचार्य अत्रे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त १३ ऑगस्ट २०१७ रोजी बाजारात आणली आहे. आचार्य अत्रे यांचे नवयुग मराठा साप्ताहिकाचा पहिला अंक १९४० २१ जानेवारी रोजी प्रकाशित झाला.
आचार्य अत्रे आणि गिरीश दोघेही हाडाचे द्रष्टे शिक्षक होते. त्यावेळी ते अनुक्रमे कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे मराठीचे अध्यापक होते. अत्रे तर लंडनहून शिक्षणशास्त्रातील उच्च पदविका घेऊन परतले होते; आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा अशा जाणकारांच्या अनुभवातून ही पुस्तके तयार झाली आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अवघ्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शकाचे काम करू लागली. २०१७ सालीही या पुस्तकांतील कल्पना कालसुसंगत असल्याचे जाणवते.
पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषा-शिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली आहेत. पुस्तकांची रचना (Design) करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला आहे. पुस्तके मनोरंजक करण्याच्या प्रयत्नात फार सोपी होतात आणि शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतात. ‘मनोरंजकत्व म्हणजे सुलभत्व नव्हे!’ गद्य-पद्य लेखनातील विविध फुलोरे, छटा आणि तऱ्हा यांचा मनोज्ञ संगम या पुस्तकांत अनुभवायला मिळेल. सारांश, राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि मानवी अशा तिहेरी दृष्टीने या पुस्तकांची केलेली रचना जाणकारांना प्रतीत होईल.’
पुरस्कार आणि सन्मान
- विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. आचार्य अत्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
- आचार्य अत्रे यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने आचार्य अत्रे प्रतिष्ठान (पुणे) यासारख्या अनेक संस्था आचार्य अत्रे पुरस्कार देतात.
- अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन असलेला ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम आहे.
- ’मी अत्रे बोलतोय’ हा एकपात्री कार्यक्रम करणारे अनेकजण आहेत. सदानंद जोशी हे त्यांपैकी एक प्रमुख. डॉ.अनंत एस. परांजपे हेदेखील ’मी अत्रे बोलतोय’ करतात.
- दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिनी म्हणजे १३ ऑगस्ट रोजी सासवड येथे आचार्य अत्रे साहित्य संमेलन भरते. अनेक कार्यक्रमांसोबत त्या संमेलनात अत्र्यांच्या नावाचे काही पुरस्कार दिले जातात.
- आचार्य अत्रे यांच्या संपूर्ण पुस्तकांचा दांडगा अभ्यास असलेले दिलीप देशपांडे हे आचार्य अत्रे यांच्यावर बेतलेला ‘अष्टपैलू अत्रे’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतात.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents