प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८८५- मृत्यू : १९७३)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
674

प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

 

नाव: केशव सिताराम ठाकरे

जन्म : १७ सप्टेंबर १८८५ (रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला.)

हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. त्याचबरोबर इतिहास संशोधकही होते. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे हे त्यांचे पुत्र महात्मा फुले हे केशव ठाकरेंचे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या साहिल्याचा अभ्यास करूनच केशव ठाकरेंच्या समाजसुधारनेबाबत संकल्पना स्पष्ट झाल्या.

सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. बालविवाह, विधवांच्या केशवपनाची अभद्र रुवी, देवळ्यातील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो की, अस्पृश्यता किंवा हुंडाप्रथा असो ते या सर्व आघाड्यांवर आखेरपर्यंत लढत राहीले.

अन्याय्य रुढी, जाती-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वकृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला. समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडात आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांनी ब्राह्मणशाहीला नेहमी विरोध केला खरा ब्राह्मण या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खर्‍या  ब्राह्मणाची भूमिका मांडली.

मुंबईत त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन केली. शाहू महाराज म्हणतात, “लाच देऊन ज्याला वश करता येत नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे. ती म्हणजे प्रबोधनकार होय.”

प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

  • नियतकालिके  प्रबोधन, सारथी, लोकहितवादी
  • ग्रंथ  कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवाचा धर्म की, धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, क्रमरिकांचे शाप, वकृत्वशास्त्र सातारचे दैव की देवाचा साताश, ग्रामण्याचा साघंत इतिहास, हिंदवी स्वराज्याचा खून, शेतकर्‍यांचे स्वराज्य, शांनीमाहात्म्य इ. ग्रंथ त्यांनी लिहीले.
  • चरित्र : समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा हे आत्मचिरत्र लिहिले.
  • नाटके :

खरा ब्राह्मण, टाकलेले पोर, संगीत सीताशुद्धी, संगीत विधिनिषेध त्यांचे हे साहित्य समाजसुधारणेसाठी क्रांतीकारकच ठरले.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा लढा होता. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि                 पक्ष यांना बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते.

केशव ठाकरे यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, वाङमयीन, इतिहासविषयक व नाट्य क्षेत्रातील योगदान                   मोलाचे आहे.

  • १९०२ ठाकरेंचे वडिल सिताराम रामचंद्र घोडपकर यांचे निधन झाले.
  • शिक्षण – पाचवीपर्यंतचे शिक्षण पनवेल येथे झाले. सहावीसाठी कल्याणला गेले. पुढील शिक्षणासाठी देवास (मध्य) प्रदेश) येथील व्हिक्टोरिया हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला.
  • १९०५-०६ च्या स्वदेशी आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता.
  • १९१० मध्ये त्यांचा विवाह रमाबाई यांचीशी झाला.
  • १९१६-१७ होमरूळ लीग चळवळीत सहभाग विविध नेत्यांची भाषणे टिपूण ते शब्दलिखित करून वृत्तपत्रात प्रकाशित करायचे.
  • १९१४-१८ या काळात वक्तृत्वशास्त्र या ग्रंथाचे लेखन केले.
  • १६ ऑक्टोबर १९२१ प्रबोधन पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • सत्यशोधक विचारसरणीच्या प्रचारासाठीच त्यांनी प्रबोधन हे नियतकालिक सुरू केले. हे खूपच गाजले होते. त्यातूनच त्यांना प्रबोधनकार ही पदवी प्राप्त झाली.
  • १७ नोव्हेंबर १९१८ कोदंडाचा टणत्कार हा ग्रंथ प्रकाशित झाला.
  • १९४७ प्रतापसिंग छत्रपती आणि रंगो बापूजी हा ग्रंथ प्रकाशित केला.

प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

वृत्तपत्र क्षेत्रात आगमन

तत्त्वविवेचक या छापखान्यात इ.स. १९०८च्या सुमारास असिस्टंट शास्त्री अर्थात मुद्रितशोधक या नात्याने ठाकरे यांचा वृत्तपत्राशी प्रथम संबंध आला. तेथे लक्ष्मण नारायण जोशी हेडशास्त्री होते. त्या काळात रोज निघणाऱ्या आणि सरकारी दडपशाहीने लगेच गायब होणाऱ्या हंगामी वृत्तपत्रांचे ते छुप्या ररीतीने लेखन करत. अशा छुप्या लेखनाची दीक्षा त्यांनीच ठाकरे यांना दिली. त्याआधी विद्यार्थी असताना ठाकरे यांनी विद्यार्थी हे मासिक चालवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानतंर, दोन-तीन साप्ताहिके, विविध वृत्त व इंदुप्रकाश पत्रात ते लेखन करत असत.

ठाण्याच्या जगत्समाचार साठीही ते लेख लिहित असत. जलशांच्या निमित्ताने ठाकरे जळगावला गेले. तेथेकाव्यरत्नावलीकार नारायण नरसिंह फडणीस यांच्याशी त्यांचा परिचय झाला. ठाकरे यांनी तेथे सारथी हे मासिक सुरू केले. पत्रव्यवसायातील आपल्या या आगमनाचे श्रेय ठाकरे फडणिसांनाच देतात.

प्रबोधन

प्रबोधन पाक्षिक काढण्यापूर्वी ठाकरे यांच्या सार्वजनिक कार्यांची चर्चा सर्वत्र झाली होती. सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा ठाकरे यांचा निर्णय अभ्यासपूर्ण होता. इतिहाससंशोधक वि.का. राजवाडे यांनी कायस्थ प्रभूंबाबत काही विधाने केली होती. त्यावर कोदण्डाचा टणत्कार (१९१८) हा ग्रंथ लिहून त्यांनी राजवाडे यांची विधाने ऐतिहासिक पुरावे देवून खोडून काढली होती. या प्रकरणी जागृतीसाठी महाराष्ट्रभर ठाकरे यांनी दौराही केला होता. ब्राम्हणेतर चळवळीकडेही ते त्यानंतर वळले. चळवळी, प्रचार करायचा, इतरांच्या प्रचाराला उत्तर द्यायचे, तर हाती वृत्तपत्रासारखे साधन हवे.

या जाणिवेतून वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. त्यावेळी ते सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करत होते. सरकारी नोकरांना वृत्तपत्र चालविण्यास बंदी होती. पण ठाकरे यांनी तशी परवानगी मिळवली. त्यानंतर १६ ऑक्टोबर १९२१ रोजी केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रबोधन पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. पत्र पाक्षिक होते. पत्राच्या नावाबरोबरच उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत असे संस्कृत वचन होते. त्याबरोबरच सामाजिक, धार्मिक आणि नैतिक गोष्टींना हे पत्र वाहिले असल्याचा उल्लेखही इंग्रजीत होता.

अधिक मूलभूत सुधारणा म्हणून सामाजिक सुधारणांना प्रबोधनने प्राधान्य दिले. प्रि. गो. चि. भाटे, गोपाळराव देवधर, गो. म. चिपळूणकर, भाऊराव पाटील आदींनी या पत्राला पाठिंबा दिला. त्यापैकी अनेकांचे लेखही पत्रात प्रसिद्ध होत.

या प्रबोधन मासिकामुळे के.सी. ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखले जाऊ लागले.

क्षात्रजगदगुरूंचे पीठ शाहू महाराजांनी निर्माण केले. त्यावेळी ठाकरे यांनी मानसिक दास्याविरुद्ध बंड (१९९२) असा टीकात्मक लेख लिहिला. रोखठोक भाषेत लिहिणे, हे ठाकरे यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचे विचार आजच्या काळालाही लागू पडतील असे आहेत. त्याच लेखात ते म्हणतात, मठ आला, की मठाधिपती आले, की संपद्राय सुरू झाला, संप्रदायाच्या मागोमाग सांप्रदायिक गुलामगिरी ठेवलेलीच.

परप्रातीयांना विरोध

मुंबईत परप्रांतीय, विशेषत दाक्षिणात्य मंडळी मोठ्या संख्येने येऊ लागली. त्यामुळे मराठी माणसांची गैरसोय होऊ लागली. त्याला प्रबोधनने १९२२मध्ये सर्वप्रथम तोंड फोडले. तसेच, पत्राच्या पहिल्या अंकापासूनच कवी वसंतविहार यांच्या समाजहितवादी कविता त्यात प्रसिद्ध होत असत. प्रबोधनचा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसार झाला. १९२३मध्ये मुंबईत बसलेले बस्तान मोडून प्रबोधन साताऱ्यात स्थलांतरित झाले. तेथील काही कटु घटनानंतर ठाकरे पुण्यात आले. तेथे ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादात तेही पडले. काही ब्राह्मण मंडळींनी डिवचल्यामुळे पुण्यात छापखाना उभारून ठाकरे यांनी प्रबोधन मासिक स्वरूपात आणि लोकहितवादी हे साप्ताहिक सुरू केले. साहजिकच, पुण्यातल्या वादात ठाकरेही उतरले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या प्रकरणात ठाकरे यांनी परखडपणे पुतळाविरोधकांचा समाचार घेतला. पण अखेर कंटाळून त्यांनी पुणे सोडले. मासिक व साप्ताहिकही १९२६मध्ये बंद पडले. ते मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी स्वत वर्तमानपत्र काढले नाही. पण अनेक वृत्तपत्रांत ते वेळोवेळी लिहीत राहिले.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम