पोलीस पाटील भरती वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या सविस्तर माहिती | Police Patil Recruitment 2023
Police Patil Recruitment 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Patil Recruitment 2023
Police Patil Recruitment 2023 : महत्वाची माहिती !! औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरले जाणार असून, याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आदेश काढले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 384 पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी एक पत्र काढले आहेत. यासाठी 21 फेब्रुवारीपासून अर्ज मागवले जाणार आहे. तर 29 मार्चला यासाठी लेखी परीक्षा होणार आहे. तसेच 15 एप्रिलला अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जेही उमेदवार पोलीस पाटील भरती २०२३ ची आतुरतेने वाट बघत आहेत ते या भरती करीता अर्ज करू शकता.
पोलीस पाटील भरती वेळापत्रक | Police Patil Bharti 2023 Time Table
अ.क्र. | भरती प्रकियेचे टप्पे | कार्यवाहीचा कालावधी |
1 | उपविभागीय अधिकारी यांनी रिक्त पदांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे | 5 जानेवारी 2023 पर्यंत |
2 | बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करून घेणे | 06 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 पर्यंत |
3 | गावनिहाय आरक्षण निश्चित करणे | 21 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2023 पर्यंत |
4 | जाहिरात प्रसिद्ध करणे | 06 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत |
5 | अर्ज मागविणे | 21 फेब्रुवारी ते 08 मार्च 2023 पर्यंत |
6 | अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र पाठविणे | 09 मार्च ते 23 मार्च 2023 पर्यंत |
7 | लेखी परीक्षा घेणे | 29 मार्च रोजी |
78 | पत्र उमेदवारांची तोंडी परीक्षा (मुलाखती) घेणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे | 15 एप्रिल रोजी |
9 | पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देणे | 26 एप्रिल रोजी |
औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्हयातील पोलीस पाटलांची 384 एवढी पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठया संख्येने पदे रिक्त असल्या कारणाने गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अशी अडचण निर्माण होऊन गावातील अपराधाचे प्रमाण वाढु नये, गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ व शांतता अबाधित राहिल, नैसर्गिक आपत्ती सारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल, यादृष्टीकोनातून पोलीस पाटीलांची सदर रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. या करीता जिल्हयामध्ये एकसूत्रीपणा असावा या दृष्टीकोनातून पोलीस पाटील भरतीचे वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असल्याने महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम 1967 चे कलम 3 नुसार प्राप्त अधिकारानुसार पोलीस पाटील भरतीचे निर्देश देत असल्याचं जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Police Patil,
Police Patil Recruitment 2023,
पोलीस पाटील भरती वेळापत्रक,
पोलीस पाटील भरती
Table of Contents