पोलीस भरती लेखी परीक्षा तारखा जाहीर,परंतु पोस्टपोन होणार परीक्षा?

Police Bharti Exam Date

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,824

Maharashtra Police Bharti Exam Date 

Police Bharti Exam Date: डिसेंबरमध्ये मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय देत पोलीस दलात कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरच्या पदांसाठी अर्ज करण्याची परवानगी ट्रान्सजेंडर्सना दिली होती. पण, शारीरिक चाचणीचे निकष ठरलेले नसल्याने किंवा राज्य सरकारने ट्रान्सजेंडर्सची शारीरिक चाचणीच तयार न केल्याने गेल्या दोन महिन्यांत झालेल्या चाचण्यांना बसण्याची त्यांना परवानगी नव्हती. त्यामुळे 19 मार्च रोजी महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी प्रस्तावित असलेल्या लेखी परीक्षा प्रक्रियेला आता ट्रान्सजेंडर समुदायाने विरोध दर्शवला आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ट्रान्सजेंडर्ससाठी स्वतंत्र कॅटेगरी तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर 72 ट्रान्सजेंडर्सनी नोकरीसाठी अर्ज केला होता. पण, राज्य सरकारने ट्रान्सजेंडर उमेदवारांच्या शारीरिक चाचण्यांसाठी निकष निश्चित केलेले नाहीत, असं त्या उमेदवारांना सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, राज्याने भरती प्रक्रिया सुरू ठेवली आहे आणि शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या इतर प्रवर्गातील उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. “तोपर्यंत ट्रान्सजेंडर्ससाठी निकष निश्चित केले नसल्यास आम्ही पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी घेतली जाणारी लेखी परीक्षा घेण्यास परवानगी देणार नाही, यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकतो कारण हायकोर्टाने 28 फेब्रुवारीपूर्वी ट्रान्सजेंडरसाठी निकष निश्चित करण्याचे निर्देश दिले होते,” असं चांद तडवी म्हणाले.

ट्रेनिंग व स्पेशल स्क्वॉड्स विभागाचे महासंचालक संजय कुमार म्हणाले, “लेखी परीक्षा नुकतीच प्रस्तावित करण्यात आली आहे आणि आम्ही ट्रान्सजेंडरसाठी निकष अंतिम करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. येत्या काही दिवसांत त्याला राज्य सरकारची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. जर 19 मार्चपर्यंत निकष निश्चित झाले नाहीत तर आमच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याचा पर्याय आहे. ”

दरम्यान, आता निकष मंजूर होऊन ट्रान्सजेंडर्सच्या चाचण्या सुरू होतात की मग महिला व पुरूष उमेदवारांच्या लेखी परीक्षा रद्द होतील, हे येत्या काळातच कळेल.

महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील मैदानीचा पहिला टप्पा संपला आहे. मात्र लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांना अजुनही संभ्रम आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोलापूर पोलीस भरतीची लेखी परीक्षा १९ मार्च २०२३ रोजी होणार आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती देणारा GR खाली दिलेला आहे. 

पोलीस भरती लेखी परीक्षा तारखा जाहीर,परंतु पोस्टपोन होणार परीक्षा?

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

पोलीस भरती,

पोलीस भरती लेखी परीक्षा,

Police Bharti Exam Date,

Police Bharti,

Maharashtra Police Bharti Exam Date

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम