पोलीस भरती : कोणत्याही एका जागेसाठी करता येणार अर्ज!

Police Bharti Exam 2024

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,625

Police Bharti Exam 2024

राज्यसरकारने यावेळी पोलिस भरती अधिक काटेकोर केली असून एका पदासाठी उमेदवाराला कोणत्याही एका घटकात केवळ एक अर्ज करता येणार आहे. याआधी वेगवेगळ्या घटकात (जिल्ह्यासाठी) अर्ज दाखल करून दोन-तीन शारीरिक चाचण्या देता येत होत्या. प्रत्येक उमेदवाराचे आधारकार्ड लिंक केल्याने आता तशा संधी संपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना अत्यंत काळजीपूर्वक घटक निवडावा लागणार आहे. 

 

एकूण १७४३० पदासाठीच्या पोलिस भरतीत पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी सव्वीस घटकांत ९५९५ जागा, राज्य राखीव पोलिस दलातील पदासाठी एकोणीस घटकांमध्ये ४३४९ जागा, चालक पदासाठी सव्वीस घटकांमध्ये १६८६ जागा तर कारागृह पदासाठी १८०० जागा उपलब्ध आहेत. पोलिस भरतीसाठी ५ मार्च ते ३१ मार्च ही ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारांना पोलिस कॉन्स्टेबल, एसआरपीएफ, चालक, कारागृह व बँडचालक अशा पाच पदांसाठी पात्र उमेदवार पाचही ठिकाणी ऑनलाइन अर्ज करू शकतात, मात्र एका पदासाठी कोणताही एकच घटक निवडावा लागणार आहे. उदा. कॉन्स्टेबल पदाकरिताच्या २६ घटकांपैकी कोणत्याही एकाच घटकात अर्ज करता येईल. दुसऱ्या घटकांत अर्ज करू लागला तर आधीच्या अर्जासोबत आधार लिंक असल्याने दुसरा अर्ज स्वीकारला जात नाही. शारीरिक चाचण्या वेगवेगळ्या तारखांना होणार असल्या तरी लेखी परीक्षा राज्यभर एकाच वेळी घेतली जाणार असल्याचे जाहिरातींमध्ये स्पष्ट केले आहे. आजारी पडणे, गोळाफेक फसणे, धावताना जायबंदी होणे, मासिक पाळी अशा कारणांनी संधी हुकलेल्यांना आता पूर्वीप्रमाणे दुसरी संधी मिळणार नाही. यानिमित्ताने यंत्रणेवरील ताण कमी होऊन संख्या फुगणार नाही असेही मत व्यक्त केले जात आहे.

पाच पदांपैकी कॉन्स्टेबल, कारागृह या दोन पदांसाठी पात्रता समान असल्याने सरसकट उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. बँडचालकासाठी वादनकलेचे प्रमाणपत्र आणि चालकासाठी वाहन परवाना आवश्यक राहणार आहे. तर एसआरपीएफसाठी अजूनही केवळ मुलांनाच संधी आहे. लोहमार्ग पोलिस पद वेगळे काढून सहावा पर्याय देता आला असता तो सरकारने टाळला आहे.

 

 


पोलीस भरती सर्व उमेदवारांची परीक्षा एकाचवेळी होणार

Police Bharti Exam 2024

राज्यातील गृह विभागाने १७ हजार पोलिसांची पदभरती सुरू केली असून आजपासून (मंगळवार) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.  अंतर्गत उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा एकाचवेळी होणार असल्याने उमेदवारांनी अर्ज करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस भरतीत ज्यांची वयोमर्यादा नुकतीच संपली, त्यांनाही संधी मिळावी आणि सध्या इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या निकालापर्यंत अर्ज करण्याची मुदत असावी, अशा दोन प्रमुख मागण्या जोर धरू लागल्या आहेत.

 

आता जाहीर झालेल्या भरतीला लोकसभेच्या आचारसंहितेचा कोणताही अडथळा नाही. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्यास तरुणांना मोठा दिलासा मिळू शकतो. दरम्यान, उन्हाळा संपताच अर्जदार उमेदवारांची मैदानी चाचणी होईल आणि त्यानंतर सर्वच उमेदवारांची एकदाच लेखी परीक्षा उरकली जाणार आहे. साधारणत: नाव्हेंबर-डिसेंबरमध्ये या भरतीतील निवड झालेल्या नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

 

पोलीस भरती : कोणत्याही एका जागेसाठी करता येणार अर्ज!

 

 

पोलीस भरती : कोणत्याही एका जागेसाठी करता येणार अर्ज!

App Download Link : Download App

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम