पोलीस भरती ३० ऑगस्ट पूर्वीच पूर्ण होणार भरती प्रक्रिया, मैदानी चाचणी २०मे नंतरच होणार!
Police Bharti 2024 Result
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti 2024 Result
निवडणुकी मुले ढकलण्यात आल्या असून, पोलिस भरती प्रक्रियाही थांबवण्यात आली आहे. राज्यात शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर पोलिस भरतीची मैदानी चाचणी त्यादृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. मैदानी व लेखी चाचणीचे एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार शिपाई पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे. चालकपदासाठी उमेदवारांना स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. साधारणतः ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे परीक्षार्थीनीही मैदानी चाचणीचा सरावा करावा. ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने शिक्षण विभागातर्फे नियोजन देखील केले जात आहे.
अशी असणार चाचणी ‘पोलिस भरती २०२४’ च्या मैदानी
चाचणीत १०० मीटर व १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक असे प्रकार असणार आहेत. या चाचणीत उमेदवारास किमान ४० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत.
Police Bharti 2024 Result
मोठ्या प्रमाणावरील बेरोजगारी आणि सार्वजनिक क्षेत्रांत नोकऱ्या मिळवण्याची तरुणांची आकांक्षा यांच्यातील संघर्ष लक्षात घेऊन, सार्वजनिक रोजगार मिळविण्यासाठी कोणताही अन्यायकारक किंवा फसवणुकीचा मार्ग अवलंबला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, जिल्हा पोलीस चालक पदाच्या भरतीप्रक्रियेत एकाच पदासाठी विविध जिल्ह्यांतून अर्ज करणाऱ्या २,८९७ उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून कायम ठेवला. भरतीच्या नियमांचे उल्लंघन करून एकाच पदासाठी एकाहून अधिक जिल्ह्यातून अर्ज केल्याबद्दल निवड प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात २०० उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती ए, एस. चांदूरकर आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या.
जिल्हा पोलीस चालक पदासाठी २०१९ मध्ये काढण्यात आलेल्या जाहिरातीनंतर एक लाख १७ हजार उमेदवारांनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २,८९७ उमेदवारांनी एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या ई-मेलवरून आणि माहिती बदलून अर्ज केले होते. मात्र, ही भरती पोलीस दलातील रिक्त पदांसाठी असून ९७.५ टक्के उमेदवारांना मोजक्या उमेदवारांच्या वर्तनाची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार देताना स्पष्ट केले.
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents