राज्यात लवकरच ९८ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी भरती होणार

Police Bharti 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,345

 

Police Bharti 2023

 

लवकरच मेगा पोलीस भरती महाराष्ट्रात सुरू होणार आहे. महा पोलीस भरती 2023 अंतर्गत राज्यात ९८ हजार पोलिसांची भरती होणार आहे. जे महाराष्ट्र राज्यात पोलीस बनण्याची योजना आखत आहेत त्यांनी पोलीस भरती परीक्षा 2023 ची तयारी आतापासूनच करायला हवी. अधिसूचना निघताच ती या पेजवर अपडेट केली जाईल. महाराष्ट्र पोलीस भरती 2023 बद्दल अधिक जाणून घ्या.

 

पोलीस कर्मचारी व लोकसंख्या यांचे प्रमाण सुध रण्यासाठी राज्यात लवकरच ९८ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. राज्यात सध्या एक लाख लोकसंख्येमागे १३६.४५ इतके पोलीस कर्मचारी असून पोलिसांची हीच संख्या २२५ इतकी करण्यात येणार आहे. राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या सध्या २.४५ लाख इतकी आहे. भरतीसंदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच घेतला जाणार आहे.

 

राज्यात लवकरच ९८ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी भरती होणार

 

अर्थ खात्याची उपसमिती व मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती यांनी घेतलेल्या खातेनिहाय आढाव्यानुसार राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची सध्याची संख्या कायम ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र प्रत्येक पोलीस ठाण्यातील तसेच संबंधित युनिटमधील कर्मचाऱ्यांबाबत धोरण निश्चित करण्यात यावे, असे आम्ही सांगितले. हे काम झाल्यानंतर आता आम्ही अतिरिक्त ९८ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यापैकी किमान ५० टक्के पदांना तरी मंजुरी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे, असे गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने मार्चमध्ये संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात देशाचे सध्याचे लोकसंख्या पोलीस यांचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे १५२.८० इतके आहे. नागालँडमध्ये हेच प्रमाण सर्वाधिक ११८९.३३ कर्मचारी तर बिहारमध्ये सर्वात कमी ७५.१६ कर्मचारी इतके आहे.

 

 

 

 

 

 

 

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम