पोलीस भरतीची लेखी कधी कधी होणार, नवीन अपडेट!!
Police Bharti 2022 Written Exam Date
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Written Exam Date
Police Bharti Written Exam Date : प्राप्त नवीन अपडेट नुसार, महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील मैदानीचा पहिला टप्पा संपला आहे. मात्र लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांना अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
राज्यात 18 हजार 331 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतीलमैदानी प्रक्रिया झालीय. मात्र तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. 72 तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे.
‘मैदानी’त उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका पदासाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार ‘लेखी’साठी निवड होणार आहे. त्यानुसार एक लाख ८३ हजार ३१० उमेदवार लेखीसाठी पात्र ठरतील. पण, तृतीयपंथींची ‘मैदानी’ झाल्याशिवाय पोलिस भरतीच्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेताच येणार नाही. निकष ठरल्यानंतर मार्चमध्ये त्यांची मैदानी चाचणी पार पडेल. दुसरीकडे दहावी-बारावीसह बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांमुळे केंद्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
तब्बल १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले
राज्यात १८ हजार ३३१ पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील ‘मैदानी’चा पहिला टप्पा संपला आहे. परंतु, तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. ७२ तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने एक लाख ८४ हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे. राज्याच्या गृह विभागाला पुरेसे मनुष्यबळ मिळावे, या हेतूने दोन वर्षांपासून नियोजित असलेली पोलिस भरती आता सुरु आहे. पोलिस शिपाई, चालक अशी एकूण १८ हजारांहून अधिक पदे भरली जात आहेत. त्यासाठी तब्बल १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
दरम्यान, पोलिस भरतीसाठी तृतीयपंथी देखील अर्ज करू शकतात, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आणि त्या काळात राज्यभरातून ७२ तृतीयपंथींनी पोलिस भरतीसाठी अर्ज केले. तरीपण सर्व जिल्ह्यातील पोलिस प्रमुखांनी पहिल्यांदा तृतीयपंथी वगळून सर्वच उमेदवारांची मैदानी चाचणी सुरु केली.
सोलापूरसह बहुतेक जिल्ह्यांमधील उमेदवारांची मैदानी चाचणी आठवड्यापूर्वीच संपली आहे. ‘तृतीयपंथी’च्या मैदानी चाचणीचे निकष निश्चित करून २८ फेब्रुवारीपूर्वी सुद्धा न्यायालयात तो अहवाल सादर करता येऊ शकतो. पण, अजून निकष न ठरल्याने त्या उमेदवारांची मैदानी मार्चमध्ये होईल. त्यानंतर सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
कशी राहणार लेखी परीक्षा !
100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती,
पोलीस भरतीची लेखी,
Police Bharti 2022 Written Exam Date,
Police Bharti
Table of Contents