पोलीस भरतीची मैदानी चाचणी 2 जानेवारी पासून | Police bharti 2022 Physical Test Date

पोलीस भरतीची मैदानी परीक्षेच्या तारखा जाहीर-Police bharti 2022 Physical Test Date

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
8,173

Police bharti 2022 Physical Test Date

Police bharti 2022-2023 : पोलीस भरतीच्या अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती जवळ जवळ सर्वच उमेदवारांचे अर्ज भरून झाले. पोलिस भरतीच्या माध्यमातून राज्यात १८ हजार ३३१ पदांची भरती होणार आहे. सहा-सात वर्षांपासून शासकीय मेगाभरती निघाली नसल्याने पोलिस भरतीसाठी तब्बल 15 लाखच्या आसपास उमेदवारांनी अर्ज केले आहेत. आता उमेदवार मैदानी चाचणीची प्रतीक्षा करीत आहेत. व त्याची तारीख समोर आली आहे. त्यासंदर्भत व मैदानी चाचणी दिनांक खाली पहा.

पोलीस भरतीची मैदानी परीक्षेच्या तारखा जाहीर

मैदानी चाचणीच्या दृष्टीने प्रत्येक शहर-जिल्ह्यात मैदानांची तयारी केली जात आहे. पहिल्यांदा चालक पदांची मैदानी होईल आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. दररोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. १९ डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जागांसाठी नेमके किती व कोणत्या संवर्गातील किती अर्ज प्राप्त झाले आहेत, याची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पाठवली जाणार आहे. २२ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यांनी ठरवलेले नियोजन पोलिस महासंचालकांना कळवायचे आहे. मंगळवारी (ता. २०) त्यासंबंधी पोलिस महासंचालक बैठक घेतील. त्यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणत्या ठिकाणी परीक्षा द्यायची हे ठरवायचे आहे. कोणत्याही उमेदवारांना दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही. भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमीत कमी राहणार असून भरतीत कोणत्याही प्रकारची वशिलेबाजीला वाव राहणार नाही, असे तगडे नियोजन करण्यात आले आहे.

जेथे मैदानी तेथेच लेखी परीक्षा

पोलिस भरतीसाठी काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत. पण, त्या उमेदवारांना केवळ एकाच ठिकाणी मैदानी व लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. मैदानी चाचणी झाल्यावर काही दिवसांनी लेखी चाचणी होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेतली जणार आहे. परंतु, उमेदवाराने ज्या शहरात-जिल्ह्यात मैदानी चाचणी दिली, त्याचठिकाणी त्याला लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे.

 

गैरप्रकारावर ‘सीसीटीव्ही अन्‌ व्हिडिओ’ वॉच

मैदानी चाचणी सर्वच उमेदवारांची होईल, त्यातून प्रत्येकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होईल. मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. तसेच प्रत्येक इव्हेंटचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे. त्यासंबंधीच्या सूचना पोलिस महासंचालकांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Police Bharti Exam Date 

  • राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस शिपाई व चालक पदाच्या १७ हजार १३० जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • तब्बल तीन वर्षांपासून त्यासंदर्भात अनेकदा घोषणा झाल्या, पण भरती प्रक्रिया सुरु होऊ शकली नाही.
  • गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत भरती प्रक्रियेला मंजुरी दिली.
  • आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच लाख उमेदवारांनी अर्ज केल्याचा अंदाज आहे.
  • उमेदवारांनी आरक्षणनिहाय जागांचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले आहेत.
  • दुसरीकडे मैदानी व लेखी परीक्षेची जय्यत तयारीसुध्दा सुरू केली आहे. मैदानी चाचणी ५० गुणांची तर लेखी परीक्षा १०० गुणांची असणार आहे.
  • प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे.
  • मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण बंधनकारक आहेत.
  • पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना मोठा फायदा होणार आहे.
  • परंतु, लेखी परीक्षेसाठी त्यांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहे.
  • भरतीसाठी राज्यभरातून चार लाखांपर्यंत अर्ज येतील, असा अंदाज आहे.

Police Bharti Written Exam Date 

१२ डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरु करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

Police Bharti Exam Date 2022

पोलिस भरतीची स्थिती

  • एकूण जागा- १७,१३०
  • अर्ज करण्याची मुदत – ३० नोव्हेंबर
  • मैदानी चाचणीची तारीख – १२ डिसेंबर
  • ‘लेखी’चा संभाव्य महिना – जानेवारी २०२३

नॉन क्रिमेलिअरची चिंता नको…

पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना आर्थिक उन्नत गटात मोडत नसल्यासंदर्भातील नॉन क्रिमेलिअर सादर करावे लागणार आहे. त्यासाठी गृह विभागाने १ एप्रिल २०२१ ते २१ मार्च २०२२ या काळातील नॉन क्रिमेलिअरची मूळ प्रत असावी, अशी अट घातली. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि आता ती मुदत संपून गेली अन्‌ तेव्हाचे क्रिमेलिअर कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला. काही आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदने देखील दिली. पण, मागील उत्पन्नावर सद्यस्थितीत काढलेले नॉन क्रिमेलिअर भरतीसाठी चालणार असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे उमेदवारांची चिंता दूर झाली आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

मैदानी चाचणी अधिकृत दिनांक 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

पोलीस भरतीची मैदानी चाचणी,

पोलीस भरती,

Police bharti 2022 Physical Test Date,

Police bharti 2022-2023

Police Bharti Exam Date,

Police Bharti Written Exam Date

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम