पोलीस भरती वयोमर्यादा २ वर्षांनी वाढणार!- 17,130 पदांची पोलीस भरती,नोव्हेंबर दुसऱ्या आठवड्यात!
Police Bharti 2022 Maharashtra New Update
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti 2022 Maharashtra New Update
करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली असली तरी राज्यातील सर्व वयोगटांतील अधिकाधिक तरुणांचा समावेश करण्याच्या उद्देशाने तसेच सर्व जाती व समाजातील तरुणांचा या भरतीत समावेश करण्याच्या उद्देशानेही याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेषत: मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका या भरतीला बसू नये, असाही प्रयत्न असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर भरतीच्या अटी आणि शर्तीमध्ये बदल केला जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल. या संदर्भातील अधिकृत वेबसाईट वर GR आणि माहिती अजून यायची आहे.
सोलापूर : कोरोनामुळे दोन वर्षांत पोलिसांसह अन्य शासकीय नोकरभरती राबविता आली नाही. त्यामुळे राज्यातील लाखो तरूणांची वयोमर्यादा संपुष्टात आली. काहीजण वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांना आता भरतीत सहभागी होता येणार नाही. या पार्श्वभूमीवर आता पोलिस भरतीसाठी तरूणांची वयोमर्यादा दोन ते तीन वर्षांनी वाढणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय उद्या (मंगळवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे.
राज्यात पोलिसांची १४ हजार ९५६ पदांची एकाचवेळी भरती होणार आहे. ३ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार होता. पण, कोरोना काळात व त्यापूर्वी राज्यात शासकीय नोकरभरती झाली नाही. याच दरम्यान राज्यातील लाखो तरूणांची नोकर भरतीत सहभागी होण्याची वयोमर्यादा संपली. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुध्दा वयोमर्यादा तथा संधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला होता. याच धर्तीवर आता राज्याच्या क व ड संवर्गातील नोकर भरतीत तरूणांना वाढीव संधी किंवा वयोमर्यादा वाढवून मिळेल, असा विश्वास गृह व सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केला. अनेक सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी त्यासंबंधीची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी त्यासंबंधीचा अंतिम निर्णय होणार आहे. नोकर भरतीत वयोमर्यादा वाढवून शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील लाखो तरूणांना दिलासा देईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नोव्हेंबरअखेरीस ही प्रक्रिया सुरु होणार आहे.
पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आल्याने तरुण वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटली. तरुणांनी यावरून समाजमाध्यमांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. २०२१ मधील पोलीस शिपाई संवर्गातील जाहिरात देण्याबाबतची पुढील कार्यवाही प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत असल्याच्या सूचना महासंचालक कार्यालयातील प्रशिक्षण व खास पथके या विभागामार्फत देण्यात आली. तसेच ही जाहिरात देण्याबाबतचे यथावकाश कळविण्यात येईल, अशा सूचना राज्यातील सर्व पोलीस विभागांना देण्यात आल्या होत्या. भरतीबाबतची ही जाहिरात १ नोव्हेंबरला काढण्यात येणार होती. राज्यभरात रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार होती.
जवळपास १४ हजार ९५६ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार होती. मात्र करोनाकाळात भरती होऊ न शकल्याने वय उलटलेल्या उमेदवारांना संधी मिळावी, हा पोलीसभरतीमागील स्थगितीचा सरकारचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. तसचे जातनिहाय भरतीबाबत फेरआढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील अधिकाधिक तरुणांना या भरतीत सहभाग घेता यावे, या उद्देशाने अटी-शर्तीमध्ये बदल करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी गरज पडल्यास टप्प्याटप्प्यानेही भरती करण्यात येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठकीत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे समाजमाध्यमांवर मात्र तरुणांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून भरती प्रक्रिया रखडली असताना आता नव्या १४ हजार ९५६ पदांच्या भरतीमुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी इच्छुकांकडून केली जात आहे.
आज, नवीन पोलीस भरती पुढे ढकलल्याचा GR सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या बातमीनुसार सध्या पोलीस भरती सुरु होण्याची तारीख १० ते १५ दिवस पुढे ढकलली जाऊ शकते, आपल्याला माहीतच आहे मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजन पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे वयोमर्यादा मध्ये शिथिलता देण्याच्या दृष्टीने ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा शिथिल करण्यात येऊ शकते. परंतु या संदर्भातील अधिकृत अपडेट् अजून यायचा आहे.
App Download Link : Download App
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती,
Police Bharti 2022 Maharashtra New Update,
पोलीस भरती वयोमर्यादा
Table of Contents