[PMGKY] प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
PMGKY PM Gareeb Kalyan Yojana | प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पंजीकरण | Pradhan Mantri Garib Kalyan Yojana | प्रधानमंत्री राशन सब्सिडी योजना | PMGKY 2020 |
[PMGKY] प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2020
पार्श्वभूमी :
कोरोना व्हायरसच्या महामारीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन केले आहे .
यामुळे ग्रामीण /शहरी भागातील मजुरांना आपल्या कामाला मुकावे लागले . सर्व कामधंदे ठप्प असून सगळी अर्थव्यवस्था विस्कळीत झालेली आहे .आपल्या भारतात नियमित रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे .
अश्या मजुरांवर या लॉकडाउनच्या काळात खूप वाईट परिस्थिती येईल याचे भान राखता .आपल्या देश्याच्या अर्थमंत्र्यांनी दिनांक 26 मार्च २०२० रोजी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2020 जाहीर केली .
या योजनेची अंमलबजावणी दिनांक 01 एप्रिल 2020 पासून केली जाईल .
[PMGKY] प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2020
- 26 मार्च 2020 अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली
- अंमलबजावणी -01 एप्रिल 2020
- लाभार्थी – आपल्या देशातील गरीब लोक
- एकूण खर्च : 01 लाख ७० हजार कोटी
योजनेची वैशिष्टे :
- लोकांनी आपल्या घरातच राहून कोरोना या विशाणुजन्यआजाराचा प्रादुर्भाव रोखला जाईल ,या काळात कोणी उपाशी राहणार नाही हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे .
- गरीब कल्याण अन्न योजना : या योजनेंतर्गत प्रत्येक व्यक्तीला 05 किलो अन्नधान्या व्यतिरिक्त 05 किलो गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे . म्हणजेच प्रत्येक कुटुंबाला येणारे 03 महिने 01 किलो दाल व 10 किलो अन्नधान्य [गहू + तांदूळ ]मोफत मिळणार आहे .
- वैद्यकीय विमा : अर्थ मंत्र्यांनी कोविड- 19 सोबत लढणाऱ्या लोकांसाठी 50 लाख रुपयाचा वैद्यकीय विमा देण्याची घोषणा केली . या मध्ये पुढील व्यक्तीचा समावेश असणार आहे. यामुळे 22 लाख लोकांना या विम्याचा लाभ घेता येईल .
- डॉक्टर
- नर्स
- अशा सेविका
- इतर -जे कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये लोकांची दिवसरात्र सेवा करत आहे .
- PM किसान योजनेंतर्गत शेतकर्यांना 2000 रुपयाचा हप्ता लवकर देण्यात येईल
- मनरेगा मजुरांच्या वेतनात वाढ : केंद्र सरकारने प्रत्येक मनरेगा मजुरांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला मनरेगा मजुरांना 20 रु पगारवाढ देण्यात येणार आहे ,याआधी मनरेगा मजुरांना 182 रु वेतन मिळत होते .ते आता 202 रुपये होईल याअंतर्गत जवळपास 5 करोड मनरेगा कुटुंबाना फायदा होईल .
- जेष्ठ नागरिक, विधवा आणि अपंगांना साह्यता : या योजनेअंतर्गत, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विधवा, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना सरकार 2 हप्त्यांमध्ये 1000 रुपयांची सूट देईल. याद्वारे 3 कोटी गरीब लोकांना याचा फायदा होणार आहे.
- महिलांसाठी मदतः – अर्थमंत्र्यांनी जन धन योजनेंतर्गत २० कोटी महिलांसाठी जनधन खात्यात पुढील 3 महिने 500 रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे.
- उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलिंडर: पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत 8.3 कोटींच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 3 महिने सरकार मोफत सिलिंडर देईल.
- स्वंय साह्यता गटाच्या महिलांसाठी कर्जः अशा महिला स्वंय साह्यता गटाशी संबंधित आहेत त्यांना तत्काळ 10 लाख ऐवजी 20 लाख रुपयांच्या कर्जाएवजी 20 लाख रुपयाचे कर्ज मिळणार आहे , याचा लाभ सुमारे 7 कोटी कुटुंबांवर होईल .
- औषधे सुद्धा घरपोच मिळणार : लोकांना सर्व औषधे घरपोच मिळणार आहे ,त्यामुळे लोकांना मेडीकल स्टोअर्स वर जाण्याची गरज पडणार नाही ,यामुळे सामाजिक अंतर राखण्यास मदत होईल
- संघटीत व बांधकाम क्षेत्रातील कर्मचार्यासाठी EPF चा लाभ मिळणार आहे .
- शासनाच्या कंत्राटी कर्मचार्यांना पूर्ण वेतन मिळणार .
- प्रादेशिक ग्रामीण बँकाचे पुनर्जीवन करण्यात येणार आहे .
[PMGKY] प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यासाठी पात्रता :
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी खालील लोक पात्रअसतील
- शहरी व ग्रामीण भागातील गरीब लोक
- शेतकरी ,मनरेगा मजूर ,स्थलांतरित मजूर
- पेन्शनधारी ,विधवा महिला ,जेष्ठ नागरिक ,अपंग
- जनधन खाता धारक महिला
- स्वंय साह्यता गटाच्या महिलां
- उज्वला योजनेचे लाभार्थी
- संघटीत क्षेत्र व बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी
[PMGKY] प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी आवश्यक कागदपत्र :
- रेशनकार्ड
- ओळखीचा पुरावा – आधार कार्ड /मतदान कार्ड / वाहन चालविण्याचा परवाना [ ड्रायव्हिंग लायसन्स] / पासपोर्ट यापैकी कोणताही एक
- वयाचा /जन्माचा दाखला .
- जनधन खाते बँक पासबुक
- मनरेगा कार्ड
[PMGKY] प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया :
या योजनेद्वारे मिळणारे सर्व फायदे /आर्थिक लाभ हे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे .तसेच स्वस्त धान्य दुकानात राशन कार्ड दाखवून अन्नधान्य चा लाभ मिळणार आहे .म्हणून यासाठी कुठलाही अर्ज करण्याची आवश्यकता नाही .
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents