पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; पिंपरी-चिंचवड महापालिकेत १६ हजार ८३८ पदांची जम्बो भरती। PCMC Recruitment 2023

PCMC Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,857

PCMC Recruitment 2023

पिंपरी-चिंचवड शहराचा होणारा विस्तार तसेच वाढलेला कामाचा ताण लक्षात घेऊन आकृतिबंधामध्ये सुधारणा केली आहे. सुरुवातीला महापालिकेच्या आकृतिबंधात एकूण ११ हजार ५१३ विविध पदांना मंजुरी मिळाली होती. आकृतिबंधात सुधारणा करून पुन्हा पदसंख्या वाढविली आहे. त्यात तब्बल ५ हजार ३२५ पदांची निर्मिती केली आहे. त्यामुळे तब्बल १६ हजार ८३८ पदांचा सुधारित आकृतिबंध तयार झाला आहे. शासनाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेकडून जम्बो नोकर भरती केली जाणार आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गात झाला आहे. तसेच, वाढती लोकसंख्या आणि कामकाजाचा वाढलेला ताण लक्षात घेता अधिक संख्येने अधिकारी व कर्मचारी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आकृतिबंध तयार आहे. त्यात विविध गटांतील एकूण १६ हजार ८३८ पदे आहेत. पूर्वीच्या आकृतिबंधाच्या तुलनेत ५ हजार ३२५ पदांची नव्याने निर्मिती केली आहे. 

दरम्यान, जुना आकृतिबंध तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या काळात तयार केला होता. त्या काळातच त्या आकृतिबंधास राज्य शासनाने मंजुरी दिली होती. मात्र, नोकरभरतीस बंदी असल्याने तसेच कोरोना महामारीमुळे ती पदे भरता आली नाहीत. केवळ वैद्यकीय, आरोग्य तसेच अत्यावश्यक विभागातील नोकर भरतीस राज्य शासनाने हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे ११ हजार ५१३ पैकी केवळ ७ हजार ५३ पदे सध्या कार्यरत होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे.

 

मे महिन्यात होणार ‘ही’ भरती
महापालिकेच्या वतीने खासगी संस्थेमार्फत वैद्यकीय विभागातील परिचारिका व इतर पदांसाठी परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, आरोग्य निरीक्षक, अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर व समाजसेवक अशा एकूण ३८६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल १ लाख ३० हजार अर्ज ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा मे महिन्यामध्ये होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

PCMC,

पिंपरी-चिंचवड,

PCMC Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम