पिंपरी चिंचवड पालिकेतील पद भरतीचा मार्ग मोकळा!1 हजार 578 जागा भरती येणार | PCMC Recruitment 2023

PCMC Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
3,642

PCMC Recruitment 2023

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पद भरतीसाठी आस्थापना खर्चाच्या 35 टक्के मर्यादेच्या अटीचा अडथळा दूर झाला आहे. राज्य शासनाने ही अट शिथील करुन महापालिकेला 1 हजार 578 जागा भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत लवकरच अत्यावश्‍यक सेवेतील जागांची भरती केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ब वर्गात आहे. त्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात आला असून यामध्ये 16 हजार जागांचा समावेश आहे. यात काही जुनी पदे वगळून काही नवीन पदे निर्माण केली आहेत. तसेच दर महिन्यास किमान 15 ते 20 अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर आणि स्वेच्छानिवृत्ती घेऊन निवृत्त होत आहेत.

 

त्यामुळे पालिकेत रिक्त जागांचा अनुषेश वाढत असून सध्या 9 हजार 785 जागा रिक्त आहेत. महापालिका हद्दीत नागरीकरण झपाट्याने होत आहे. नागरी सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेकांना अतिरिक्त पदभार सोपवून कामे करून घेतली जात आहेत. शहराचे वाढते नागरीकरण पाहता उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्‍त ताण जाणवत आहे. तसेच नागरिकांची कामे होण्यासही विलंब होत आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.

 

अल्प मनुष्यबळामुळे अडचणींचा सामना
महापालिकेच्या विविध विभागातील अ, ब, क आणि ड या चार वर्गवारीनुसार 16 हजार 838 जागा मंजूर आहेत. यामध्ये सद्यस्थितीत 7 हजार 53 जागा भरलेल्या आहेत. तर 9 हजार 785 जागा रिक्त आहेत. असे असताना दुसरीकडे महापालिकेच्या उत्पन्नाच्या अस्थापना खर्च हा जास्तीत-जास्त 35 टक्‍यांपेक्षा जास्त असू नये, असे बंधन आहे. सध्याचा अस्थापना खर्च हा 35 टक्‍यांच्या आत आहे. त्यामुळे रिक्त जागांची आकडेवारी जरी मोठी असली तर पुढील काळात महापालिका फक्त 1 हजार 578 जागांच भरू शकते. खर्चाच्या मर्यादेमुळे पालिकेतील अग्निशामक, वैद्यकीय, आरोग्य, पाणी पुरवठा, पर्यावरण यासह आदी अत्यावश्‍यक विभागातीलही रिक्त जागांची भरती करण्यास प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब पालिका प्रशासनाने शासनाच्या निदर्शास आणून दिली आहे. त्यामुळे अस्थापना खर्चाची 35 टक्‍यांची अट शासनाकडून शिथिल करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

पिंपरी चिंचवड,

PCMC Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम