One Liners : 31 जुलै | एका ओळीत सारांश : 31 जुलै
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 31 जुलै 2021
संरक्षण
- भारत आणि रशिया या देशांच्या नौदलांचा 12 वा द्वैवार्षिक द्विपक्षीय संयुक्त सागरी सराव ‘इंद्र नेव्ही-21’, 28 जुलै ते 29 जुलै 2021 या कालावधीत ____ समुद्रात पार पडला – बाल्टिक समुद्र.
- _____ 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2021 दरम्यान ‘2021 इंटरनॅशनल आर्मी गेम्स (IAG)’ याचे काही कार्यक्रम आयोजित करेल – चीनी भुदल.
अर्थव्यवस्था
- भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेमेंट सिस्टम प्रदाता, प्रीपेड कार्ड वाटप करणारे, कार्ड नेटवर्क आणि व्हाईट लेबल एटीएम संचालकांना _______ यासारख्या त्याच्या केंद्रियकृत देयके प्रणालींमध्ये (CPS) प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे – रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT).
पर्यावरण
- पश्चिम बंगाल वन विभाग ______, जो जगातील सर्वात मोठा नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेश आहे आणि जगातील एकमेव ‘कांदळवन वाघ’ प्रजातीचे घर आहे, येथे एक कांदळवन संसाधन केंद्र स्थापन करण्याची योजना आखत आहे – सुंदरबन.
आंतरराष्ट्रीय
- इंटरनॅशनल रोड फेडरेशनच्या “वर्ल्ड रोड स्टॅटिस्टिक्स’ यांच्या क्रमवारीनुसार, 199 देशांतील एकूण अपघातांच्या बाबतीत भारत _____ क्रमांकावर आहे – तिसरा.
- 2026 या वर्षासाठी UNESCO वास्तूकलेची जागतिक राजधानी – बार्सिलोना, स्पेन.
राष्ट्रीय
- ‘नेचर इंडेक्स 2021’ याच्या यादीत शैक्षणिक क्षेत्रात भारतीय विद्यापीठांमध्ये ______ हे अव्वल आहे – हैदराबाद विद्यापीठ.
- ____ येथे ‘फूड फोर्टिफिकेशनसाठी उत्कृष्टता केंद्र’ स्थापन केले जाईल – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी अँड एंटरप्रेन्योरशिप मॅनेजमेंट (NIFTEM).
- _____ याने “बायोटेक-प्राइड (माहिती विनिमयाद्वारे संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन) मार्गदर्शक तत्त्वे” विकसित केली – जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय.
- ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ अंतर्गत, पंतप्रधानांनी 29 जुलै 2021 रोजी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ____ याचा प्रारंभ केला, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये बहुपर्यायी प्रवेश आणि निकास पर्याय उपलब्ध होणार – अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट (शैक्षणिक क्रेडीट बँक).
- 29 जुलै 2021 रोजी, पंतप्रधानांनी CBSE शाळांमध्ये इयत्ता 3, 5 आणि 8 वी या वर्गांसाठी क्षमता आधारित ______ याचे उद्घाटन केले – ‘SAFAL / सफल (शिकण्याच्या पातळीचे विश्लेषण करण्यासाठी रचनात्मक मूल्यांकन / Structured Assessment for Analyzing Learning levels) मूल्यांकन कार्यचौकट
- 29 जुलै 2021 रोजी, पंतप्रधानांनी नॅशनल डिजिटल एज्युकेशन आर्किटेक्चर (NDEAR) आणि ___ याचे उद्घाटन केले – नॅशनल एज्युकेशन टेक्नोलॉजी फोरम (NETF).
क्रिडा
- उन्हाळी ऑलिम्पिक खेळांमध्ये सलग दोन ऑलिम्पिक उपांत्य फेरी गाठणारा पहिलं बॅडमिंटनपटू – पी व्ही सिंधू (भारत).
राज्य विशेष
- 29 जुलै 2021 पासून, _____ सरकारने ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात लागू केला – ओडिशा.
ज्ञान-विज्ञान
- ____ या संस्थेने ‘युटेलसॅट क्वांटम’ नामक जगातील पहिला व्यावसायिक पूर्णपणे रिप्रोग्रामेबल उपग्रह प्रक्षेपित केला – युरोपियन स्पेस एजन्सी.
- ______ येथे TriCa (त्रिची कार्बाइन) नावाचे एक नवीन शस्त्र विकसित केले गेले, जे त्रिची असॉल्ट रायफलची एक छोटी आवृत्ती आहे – ऑर्डनन्स फॅक्टरी तिरुचिरापल्ली.
सामान्य ज्ञान
- नामदाफा व्याघ्र प्रकल्प – अरुणाचल प्रदेश.
- नागार्जुनसागर सागर व्याघ्र प्रकल्प – आंध्रप्रदेश.
- दुधवा व्याघ्र प्रकल्प – उत्तरप्रदेश.
- कलाकद मुंडनथुरई व्याघ्र प्रकल्प – तामिळनाडू.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents