One Liners : 29 जुलै | एका ओळीत सारांश : 29 जुलै

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
39

एका ओळीत सारांश, 29 जुलै 2021

Admin

दिनविशेष

  • जागतिक निसर्ग संवर्धन दिवस – 28 जुलै.
  • आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस – 29 जुलै.

पर्यावरण

  • इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) या संस्थेने प्रजातींसाठी सादर केलेले नवीन जागतिक मानक, जे त्याच्या मूळ संख्येचा आकार आणि आरोग्य पुनर्प्राप्त करण्यासाठी किती जवळ आहे हे स्पष्ट करून प्रजातींचे संवर्धन स्थितीचे अधिक समृद्ध चित्र प्रदान करण्यात मदत करेल – ‘IUCN ग्रीन स्थिती.
  • ‘IUCN ग्रीन’ स्थितीच्या यादीत समाविष्ट केल्या गेलेल्या प्रजाती – गुलाबी कबूतर (मॉरिशस), करड्या रंगाचा लांडगा आणि कांडेलीया ओबोवाटा कांदळवन (पूर्व आशिया).

आंतरराष्ट्रीय

  • “सेरेन्डिपिटी सॅफिर” नाव देण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठा स्टार नीलम रत्नांचा समूह, ज्याचे वजन सुमारे 510 किलोग्राम किंवा 2.5 दशलक्ष कॅरेट आहे, ____ येथे सापडला – रत्नपुरा (श्रीलंकेची रत्न राजधानी).

राष्ट्रीय

  • सर्वोत्कृष्ट व्यवस्थापनासाठी ‘अर्थ गार्डीयन’ श्रेणीत ‘नॅटवेस्ट ग्रुप अर्थ हीरोज पुरस्कार’ प्राप्त करणारे अभयारण्य – सातपुडा व्याघ्र प्रकल्प (होशंगाबाद जिल्हा, मध्य प्रदेश).
  • 27 जुलै 2021 रोजी, विज्ञान व पर्यावरण केंद्र (CSE) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ____ याने ‘गंगा नदीच्या खोऱ्यात जलसंवेदनशील शहरे तयार करणे’ या विषयावर आधारित एक नवीन क्षमता निर्मितीचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे – राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG).

व्यक्ती विशेष

  • नवी दिल्ली पोलीस आयुक्त – राकेश अस्थाना.
  • 1956 साली मलेशियात, परदेशात विजेतेपद मिळविणारा प्रथम भारतीय बॅडमिंटनपटू ठरलेला आणि 1961 साली अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारा पहिला व्यक्ती, ज्यांचे 28 जुलै 2021 रोजी पुणे येथे निधन झाले – नंदू नाटेकर.

क्रिडा

  • वर्ल्ड अॅथलेटिक्स या संस्थेची ‘2022 वर्ल्ड रेस वॉकिंग टीम चँपियनशिप’ स्पर्धा 1 मार्च ते 6 मार्च 2022 या काळात ____ येथे आयोजित केली जाणार आहे – ओमान.
  • ऑलिम्पिकमध्ये सर्फिंग (जल क्रिडा) या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकणारी प्रथम महिला सर्फर – कॅरिसा मूरे (अमेरिका).
  • _____ येथे भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाचे उद्घाटन झाले – मुंबई, महाराष्ट्र.

राज्य विशेष

  • तीन वर्षांपूर्वी अखिल भारतीय पातळीवर झालेल्या व्याघ्रगणनेत 526 वाघांसह शीर्ष स्थानी असणारा आणि ‘टायगर स्टेट’ हा दर्जा प्राप्त करणारा राज्य – मध्य प्रदेश.
  • तामिळनाडू सरकारने स्थापन केलेल्या प्रथम ‘थगैसल थमिझार पुरस्कार’चा प्राप्तकर्ता – एन. शंकरैया.
  • कर्नाटक राज्याचे नवीन मुख्यमंत्री – बसवराज बोम्मई.

ज्ञान-विज्ञान

  • ECIL आणि _____ या संस्थांनी ऑक्सिजन रेट, शरीराचे तापमान आणि हृदय गती यावर लक्ष ठेवण्यासाठी “कोविड बीप” नामक एक स्वदेशी बहुउद्देशीय उपकरण विकसित केले – ESIC हैदराबाद.

सामान्य ज्ञान

  • कान्हा व्याघ्र प्रकल्प – मध्यप्रदेश.
  • मानस व्याघ्र प्रकल्प – आसाम.
  • मेळघाट व्याघ्र प्रकल्प – महाराष्ट्र.
  • पलामाऊ व्याघ्र प्रकल्प – झारखंड.
  • रणथंभोर व्याघ्र प्रकल्प – राजस्थान.
  • सिमलिपाल व्याघ्र प्रकल्प – ओडिशा.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम