One Liners : एका ओळीत सारांश, 29 एप्रिल 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
111

एका ओळीत सारांश, 29 एप्रिल 2020

Admin

दिनविशेष

  • 2020 या वर्षी कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिनाची (28 एप्रिल) संकल्पना – “स्टॉप द पँडेमीक: सेफ्टी अँड हेल्थ अॅट वर्क कॅन सेव्ह लाईव्ह्ज.
  • आंतरराष्ट्रीय नृत्य दिन – 29 एप्रिल.

अर्थव्यवस्था

  • या सार्वजनिक बँकेनी बचत गटांच्या सदस्यांसाठी एक लाख रुपयांपर्यंतची एक विशेष कर्ज योजनेचे अनावरण केले आहे – इंडियन ओव्हरसीज बँक.
  • हे स्टॉक एक्सचेंज 4 मे 2020 पासून कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज विभागातल्या व्यापार प्रणालीवर नकारात्मक मूल्य दर्शविणारे वैशिष्ट्य उपलब्ध करणार – BSE.

पर्यावरण

  • या ध्रुवीय प्रदेशावरील 1 दशलक्ष चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेले ओझोन छिद्र असामान्य वातावरणीय परिस्थितीमुळे बंद झाले – आर्कटिक.

आंतरराष्ट्रीय

  • या संस्थेनी 27 एप्रिल 2020 रोजी ‘यूथ-लीड कम्युनिटी कॉल: कोविड-19 अँड क्लायमेट इमर्जन्सी’ कार्यक्रमाचे आयोजन केले – संयुक्त राष्ट्रसंघ वैश्विक दळणवळण विभाग.
  • 28 एप्रिल 2020 रोजी झालेल्या कोविड-19 विषयक BRICS परराष्ट्र मंत्र्यांची आभासी परिषदेचे अध्यक्ष – रशिया.
  • केवळ आयुर्वेदला समर्पित असलेली जगातली पहिली टेलिमेडिसिन सेवा – TotalAyurvedaCare.com.

राष्ट्रीय

  • भारत सरकारने या वित्तीय संस्थेसोबत 1.5 अब्ज डॉलरच्या कर्जासह ‘कोविड-19 अॅक्टिव्ह रिस्पॉन्स अँड एक्सपेन्डीचर सपोर्ट प्रोग्राम’ (CARES प्रोग्राम) यावर स्वाक्षरी केली – एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB).

व्यक्ती विशेष

  • संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिलेल्या ‘अर्थ अँथम’ लिहिणारे भारतीय कवी – अभय कुमार.
  • ओडिशा उच्च न्यायालयाचे 31 वे मुख्य न्यायाधीश – न्यायमूर्ती मोहम्मद रफिक.
  • मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश – न्यायमूर्ती दिपंकर दत्त.
  • ‘सयाजीराव गायकवाड III: द महाराजा ऑफ बरोडा’ पुस्तकाचे लेखक – उमा बालसुब्रमण्यम.

राज्य विशेष

  • बोडोलँड प्रादेशिक परिषदेच्या प्रशासनाची जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती – जगदीश मुखी.
  • या राज्य सरकारने कोविड-19 याच्या बाबतीत बातमी देणाऱ्या पत्रकारांसाठी 50 लक्ष रुपयांचे विमा संरक्षण जाहीर केले – आसाम.

सामान्य ज्ञान

  • आसामच्या बोडोलँड प्रादेशिक प्रशासकीय जिल्हे – कोकराझार, बक्सा, चिरंग आणि उदलगुरी.
  • भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरण (TRAI) – स्थापना: 20 फेब्रुवारी 1997; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • आंतरराष्ट्रीय रंगमंच संस्था (ITI) – स्थापना: वर्ष 1948; मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स.
  • BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज), आशिया खंडातले प्रथम स्टॉक एक्सचेंज – स्थापना: वर्ष 1875; स्थळ: मुंबई, महाराष्ट्र.
  • संयुक्त राष्ट्रसंघ वैश्विक दळणवळण विभागाची स्थापना – 13 फेब्रुवारी 1946.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम