One Liners : 28 जुलै | एका ओळीत सारांश : 28 जुलै
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 28 जुलै 2021
दिनविशेष
- 2021 साली जागतिक यकृतशोथ (हिपॅटायटीस) दिवस (28 जुलै) याची संकल्पना – ‘हिपॅटायटीस कांट वेट‘.
संरक्षण
- भारत आणि रशिया या देशांचा “इंद्र-21” नामक 12 वा संयुक्त लष्करी सराव 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत ____ येथे होणार आहे – व्होल्गोग्राड, रशिया.
- भारतीय नौदलाचे INS तलवार जहाजाने ‘एक्झरसाइज कटलास एक्सप्रेस 2021’ या सरावात भाग घेतला, जो 26 जुलै 2021 ते 06 ऑगस्ट 2021 या कालावधीत _____ किनारपट्टीवर आयोजित केला गेला – आफ्रिकेची पूर्व किनारपट्टी.
आंतरराष्ट्रीय
- सामोआ देशाची पहिली महिला पंतप्रधान, ज्यांनी 27 जुलै 2021 रोजी पदभार स्वीकारला – फिआमे नाओमी माताफा.
- ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम ग्लोबल फ्यूचर काउन्सिल ऑन स्पेस’ यांनी कल्पना मांडलेला जगातील प्रथम ________ उपक्रम तयार करण्यात आला आहे, ज्याद्वारे अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी आणि अंतराळ मोहिमेचे सुरक्षित आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी कार्य केले जाणार – स्पेस सस्टेनेबिलिटी रेटिंग (SSR).
राष्ट्रीय
- संसदेत “राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था विधेयक 2021” मंजूर झाल्यामुळे, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील ____ व तामिळनाडूतील तंजावूर येथील ‘भारतीय अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्था’ (IIFPT) या दोन शिक्षणसंस्थांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था हा दर्जा प्राप्त होणार – हरयाणातील कुंडली येथील ‘राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था’ (NIFTEM).
- भारतातील 40 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ – धोलावीरा – हडप्पाकालीन शहर (कच्छचे रण, गुजरात).
- केंद्रीय सरकारने _____ यांच्या संयुक्त विद्यमाने “अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक्स यासाठी राष्ट्रीय उत्कृष्ठता केंद्र” स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई.
- देशातील आदिवासींच्या विविध प्रकारची लोकनृत्ये, कला व संस्कृती यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने ____ क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांची स्थापना केली आहे – सात.
व्यक्ती विशेष
- अमेरिकेच्या ‘यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID)’ याचे मिशन डायरेक्टर बनणारा पहिला भारतीय वंशाचा अमेरिकावासी – वीणा रेड्डी.
- के2 (8,611 मीटर) हे जगातील दुसर्या क्रमांकाचे पर्वत शिखर सर करणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती – शेहरोझ काशिफ (19 वर्षीय पाकिस्तानचा नागरिक).
क्रिडा
- _____ याने सर्फिंग क्रिडाप्रकारचे प्रथम ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले – इटालो फेरेरा (ब्राझील).
राज्य विशेष
- ‘ड्रिंक-फ्रॉम-टॅप’ प्रकल्प राबविणारे देशातील पहिले शहर – पुरी, ओडिशा.
- ______ सरकारने आदिवासींचे आरोग्य व आदिवासींचे जीवनमान उंचावण्याच्या दोन उद्दीष्टांसह “देवारण्य योजना” नामक आयुष आधारित आर्थिक उन्नतीकरण योजना तयार केली आहे – मध्य प्रदेश.
ज्ञान-विज्ञान
- देशातील हवामान बदलांच्या प्रभावाचा अंदाज वर्तवण्यासाठी देशी हवामान मॉडेल ठरणारे अत्याधुनिक ‘अर्थ सिस्टम मॉडेल (ESM)’ _____ या संस्थेने विकसित केले – हवामान बदल संशोधन केंद्र (CCCR), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM, पुणे).
सामान्य ज्ञान
- डिसेंबर 2005 मध्ये, ____ अन्वये राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) याची स्थापना करण्यात आली – वन्यजीवन (संरक्षण) कायदा, 1972.
- ____ साली “व्याघ्र प्रकल्प” (Project Tiger) याचा प्रारंभ करून भारत सरकारने वाघाच्या (राष्ट्रीय भूचर प्राणी) संवर्धनासाठी अग्रणी पुढाकार घेतला – वर्ष 1973.
- बांदीपूर व्याघ्र प्रकल्प – कर्नाटक.
- कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प – उत्तराखंड.
- अमनागड बफर व्याघ्र प्रकल्प – उत्तरप्रदेश.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents