One Liners : 27 जुलै : एका ओळीत सारांश : 27 जुलै

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
46

एका ओळीत सारांश, 27 जुलै 2021

Admin

दिनविशेष

  • कांदळवन परिसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस – 26 जुलै.

आंतरराष्ट्रीय

  • 2021-2026 या कार्यकाळासाठी व्हिएतनाम देशाचे पंतप्रधान – फाम मिन्ह चिन्ह.

राष्ट्रीय

  • वेलची शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी रबर मंडळाने तयार केलेल्या RubSIS अ‍ॅप सारखेच एक अ‍ॅप तयार करण्यासाठी मसाले मंडळ, रबर मंडळ आणि _____ यांनी भागीदारी केली आहे – डिजिटल यूनिवर्सिटी ऑफ केरळ.
  • _____ मंत्रालयाने ‘नदी को जानो’ अ‍ॅप सुरू केले – शिक्षण मंत्रालय.
  • विद्यमान शहरांसाठी IGBC ग्रीन सिटीज प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारे देशाचे पहिले ग्रीन SEZ – कांडला SEZ (KASEZ).
  • केंद्रीय सरकारने देशातील संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी _____ स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे – नॅशनल रिसर्च फाउंडेशन (NRF).

क्रिडा

  • भारतीय कनिष्ठ कुस्तीपटू _____ हिने हंगेरीच्या बुडापेस्ट येथे खेळल्या गेलेल्या ‘कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप’ स्पर्धेच्या 73-किलोग्राम गटामध्ये सुवर्णपदक जिंकले – प्रिया मलिक.

राज्य विशेष

  • _____ सरकारने ‘MyGov-मेरी सरकार’ संकेतस्थळ सुरू केले – उत्तर प्रदेश.
  • अरुणाचल प्रदेश सरकारने ______ या संस्थेला “अधिकृत थिंक टँक आणि नॉलेज पार्टनर” म्हणून मान्यता दिली – IIM शिलॉंग.
  • मासिक व तिमाही खर्चाच्या पद्धतीवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी ______ सरकारने “बजेट एक्झिक्यूशन टेक्निक ऑटोमेशन” (BETA) नामक एक नवीन प्रणाली विकसित केली आहे – ओडिशा.
  • ______ राज्याचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा यांनी 26 जुलै 2021 रोजी पदाचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना सादर केला आहे – कर्नाटक.
  • विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय _____ येथे “जैव-संसाधन आणि शाश्वत विकास केंद्र”ची स्थापना करेल – किमिन (जिल्हा पापुम पारे, अरुणाचल प्रदेश).

सामान्य ज्ञान

  • “काही प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक नजरकैदेत असलेल्या व्यक्तींच्या संदर्भात आदेश देण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 373.
  • “फेडरल न्यायालयाचे न्यायाधीश आणि प्रलंबित असलेल्या कार्यवाही” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 374.
  • “संविधानातील तरतुदींच्या अधीन राहून काम करणारी न्यायालये, प्राधिकारी आणि अधिकारी” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 375.
  • “भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG)” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 377.
  • “लोक सेवा आयोग” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 378.
  • “अडचणी दूर करण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 392.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम