One Liners : 25 जुलै | एका ओळीत सारांश : 25 जुलै
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 25 जुलै 2021
दिनविशेष
- भारतात, 161 वा प्राप्तिकर दिवस – 24 जुलै 2021.
- 2021 साली ‘जागतिक जलसमाधी प्रतिबंध दिवस’ (25 जुलै) याची संकल्पना – “एनीवन कॅन ड्रॉन, नो वन शुड“.
अर्थव्यवस्था
- भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या कोणत्याही संचालकाला दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाची मर्यादा _____ केली आहे, जी आधी 25 लक्ष रुपये एवढी होती – 5 कोटी रुपये.
आंतरराष्ट्रीय
- संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने (UNGA) “______” ठराव मंजूर केला आहे, ज्याद्वारे त्यांच्या 193 सदस्य राष्ट्रांना त्यांच्या देशातील प्रत्येकासाठी डोळ्यांची काळजी घेण्याकरिता सेवा प्राप्त व्हावी यांची खात्री करुन घ्यावी असे आवाहन केले गेले आहे – “प्रत्येकासाठी दृष्टी (Vision for Everyone)”.
- 23 जुलै 2021 रोजी, _____ आणि भारत या देशांच्या सरकारांनी स्थानिक संस्थांच्या मार्फत उच्च प्रभावी सामुदायिक विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय अनुदान सहाय्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली – मालदीव.
राष्ट्रीय
- 22 जुलै 2021 रोजी, राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाने विस्वास योजना लागू करण्यासाठी _____ सोबत करारनामा केला – जन लघु वित्त बँक.
- नीती आयोग आणि ______ यांनी संयुक्तपणे “रिन्यूएबल्स इंटिग्रेशन इन इंडिया 2021” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला – आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA).
- केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने ______, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, स्टार अॅग्रीबाझार आणि पतंजली सेंद्रिय संशोधन संस्था यांचा समावेश असलेल्या पाच कंपन्यांसोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे, ज्याद्वारे देशात शेतीसाठी डिजिटल परिसंस्था तयार करण्यासाठी व्यवहार्यता तपासण्यासाठी संकल्पनेचा पुरावा विकसित केला जाईल – मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.
व्यक्ती विशेष
- भारताच्या _____ याने रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित ‘इंटरनॅशनल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड (IMO) 2021’ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले – प्रांजल श्रीवास्तव.
- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंडळाचे नवीन अध्यक्ष – नारायण तातू राणे.
क्रिडा
- ______ हिने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 49 किलोग्रॅम भारोत्तोलन स्पर्धेत रौप्य पदक जिंकून भारतासाठी पहिले पदक जिंकले – मीराबाई चानू (भारोत्तोलक).
राज्य विशेष
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 ऑगस्ट 2021 रोजी ____ राज्यात ‘अन्न उत्सव’ (राज्यभर मोफत शिधा वाटप कार्यक्रम) याचा प्रारंभ करणार – मध्य प्रदेश.
- _____ सरकारने क्लायमेट ग्रुप याच्या ‘EV100’ उपक्रमाशी भागीदारी केली आहे – महाराष्ट्र.
- आसाम सरकारने ______ यांच्या 120 वर्ष जुन्या निवासस्थानाला ‘जिवंत वारसा इमारत’ घोषित केले – गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
- 39 व्या ओडिशा ललित कला अकादमी पुरस्कारांचे प्राप्तकर्ते – विश्वरंजन कर, सुधीरंजन महारथ (शिल्पकला), विकास चंद्र सेनापती (रेखाचित्रासाठी), सूर्यकांत स्वाइन, अनुप कुमार चंद, ज्योती प्रकाश सेठी (जलरंगासाठी), प्रमोदकुमार महाराणा (समकालीन चित्रकला) आणि सुजितकुमार स्वाइन (प्रिंटमेकिंगसाठी).
सामान्य ज्ञान
- “आणीबाणीच्या परिस्थितीत ‘कलम 19’ (मानवी हक्कांचे संरक्षण) याच्या तरतुदींचे निलंबन” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 358.
- “आणीबाणीच्या परिस्थितीत ‘खंड 3’ (मूलभूत हक्क) यामधील तरतुदींचे निलंबन” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 359.
- “आर्थिक आणीबाणी” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 360.
- “राष्ट्रपती आणि राज्यपाल आणि राज्यप्रमुख यांना संरक्षण” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 361.
- “संधि, करार इत्यादींमुळे उद्भवणार्या तंट्यांमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 363.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents