One Liners : 23 जुलै | एका ओळीत सारांश : 23 जुलै
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 23 जुलै 2021
संरक्षण
- 21 जुलै आणि 22 जुलै 2021 रोजी ____ यामध्ये भारतीय नौदलाने रॉयल नेव्ही कॅरियर स्ट्राइक ग्रुप सोबत द्विपक्षीय पॅसेज एक्झरसाइज (PASSEX) यामध्ये भाग घेतला – बंगालची खाडी.
- ____ देशाने ‘चेकमेट’ नामक नवीन पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाचे अनावरण केले – रशिया.
आंतरराष्ट्रीय
- ______ आणि आंतरराष्ट्रीय पॅरालंपिक समिती (IPC) यांनी कुठेही, प्रत्येकासाठी आरोग्यासाठी आणि खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक पुढाकारांच्या माध्यमातून विविधता आणि समता वाढविण्यासाठी एकत्र कार्य करण्यासाठी करार केला – जागतिक आरोग्य संघटना (WHO).
- पहिल्या ‘इंटरनॅशनल कल्चर सिनेमा फिल्म फेस्टिव्हल-2021’ यामध्ये ‘फिल्म ऑफ द फेस्टिव्हल’ पुरस्काराचे विजेता – “कांडा बोडे” (इथिओपियाचा चित्रपट) आणि “सिंधुस्तान” (भारत).
राष्ट्रीय
- केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या अहवालानुसार, या केंद्रशासित प्रदेशांना वगळता इतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (SCPCR) स्थापन करण्यात आले आहेत – जम्मू व काश्मीर आणि लडाख.
- 22 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने _____ येथे एका एकात्मिक बहुउद्देशीय पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या स्थापनेस मान्यता दिली – लडाख केंद्रशासित प्रदेश.
- संस्कृती आणि वारसा जपताना वेगाने वाढणाऱ्या ऐतिहासिक शहरांच्या समावेशक व सुनियोजित विकासासाठी UNESCO संस्थेने त्याच्या ‘हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट’ अंतर्गत निवडलेली भारतीय शहरे – अजमेर (राजस्थान), वाराणसी (उत्तर प्रदेश), ग्वालियर आणि ओरछा (मध्य प्रदेश).
व्यक्ती विशेष
- 1 जुलै 2021 रोजी, इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (ICC) याच्या 28-सदस्यीय कार्यकारी मंडळामध्ये नवनियुक्त सदस्य – मारिएन कौटिन्हो आणि राल्फ मुपिटा.
क्रिडा
- 2020-21 हंगामातील ‘ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF) मेन्स फुटबॉलर ऑफ द इयर’ पुरस्काराचा विजेता – संदेश झिंगन.
- 2020-21 हंगामातील ‘AIFF मेन्स इमर्जिंग फुटबॉलर ऑफ द इयर’ पुरस्काराचा विजेता – सुरेश सिंग वांगजम.
राज्य विशेष
- _____ राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व पंचायतींमध्ये पंचायत सचिवालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे – उत्तर प्रदेश.
- तेलंगणा सरकारच्यावतीने घोषित, ‘दशरथी कृष्णाचार्य पुरस्कार 2021’ याचा विजेता – डॉ एलुरी शिवा रेड्डी.
ज्ञान-विज्ञान
- ____ संस्थेने ‘श्वास ऑक्सिराईज’ बाटली तयार केली आहे, जी मानवी शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढवते – भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर.
सामान्य ज्ञान
- “राज्याची अधिकृत भाषा” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 345.
- “दोन राज्यांमध्ये किंवा राज्य व संघ यांच्यातल्या संभाषणासाठी अधिकृत भाषा” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 346.
- “राज्यातल्या लोकसंख्येमधील एका वर्गाकडून बोलल्या जाणार्या भाषेशी संबंधित विशेष तरतूद” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 347.
- “सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांमध्ये तसेच कायदे, विधेयके इत्यादींसाठी वापरली जाणारी भाषा” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 348.
- “हिंदी भाषेच्या विकासासाठी दिशादर्शक” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 351.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents