One Liners : 22 September | एका ओळीत सारांश : 22 सप्टेंबर

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
29

एका ओळीत सारांश, 22 सप्टेंबर 2021

Admin

दिनविशेष

  • 2021 साली ‘आंतरराष्ट्रीय सर्पदंश जागृती दिवस’ (19 सप्टेंबर) यासाठी मोहीम – व्हाय आय चोज स्नेकबाइट.
  • आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह (सप्टेंबर महिन्याचा शेवटचा पूर्ण आठवडा) – 20 ते 26 सप्टेंबर 2021.
  • 2021 साली ‘आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह’ यासाठी संकल्पना – सेलिब्रेटिंग थ्राइविंग डिफ कम्युनिटीज.
  • जागतिक स्मृतिभ्रंश / अल्झायमर दिवस – 21 सप्टेंबर.

संरक्षण

  • _____ आणि भारतीय हवाई दलाने विमानचालन विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये शैक्षणिक आणि संशोधन या दोन्ही क्षेत्रात बळकट तंत्रज्ञान तयार करण्याच्या प्रयत्नात एक सामंजस्य करार केला– IIT कानपूर.
  • लष्करी परिचारिका सेवेच्या उपमहासंचालिका _____ यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार 2020’ प्रदान करण्यात आला – ब्रिगेडियर एस व्ही सरस्वती.

आंतरराष्ट्रीय

  • 24 वी आंतरराष्ट्रीय एड्स परिषद (AIDS 2022) 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत ____ येथे आयोजित केली जाईल – मॉन्ट्रियल, कॅनडा.
  • 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत भारत आभासी ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ (GFF) हा कार्यक्रम आयोजित करणार असून तो इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (भारत सरकार) याच्यावतीने ______ आणि भारतीय इंटरनेट आणि मोबाइल संघाच्या (IAMAI) फिनटेक कॉन्व्हर्जन्स कौन्सिल (FCC) आयोजित करणार आहे – नॅशनल पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया (NPCI).

राष्ट्रीय

  • भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) या संस्थेने प्रकाशित केलेल्या तिसरा ‘राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक’ (SFSI) याच्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत प्रथम क्रमांक – गुजरात (त्याखालोखाल केरळ आणि तामिळनाडू).
  • तिसरा ‘FSSAI राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक’ (SFSI) याच्या छोट्या राज्यांच्या श्रेणीत प्रथम क्रमांक – गोवा (त्याखालोखाल मेघालय आणि मणिपूर).
  • तिसरा ‘FSSAI राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक’ (SFSI) याच्या केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीत प्रथम क्रमांक – जम्मू आणि काश्मीर (त्याखालोखाल अंदमान आणि निकोबार बेटे आणि नवी दिल्ली).
  • 21 सप्टेंबर 2021 रोजी, _____ संस्थेने ‘राष्ट्रीय सुगम्य निवडणुका परिषद 2021’ आयोजित केली – भारतीय निवडणूक आयोग (ECI).
  • 21 सप्टेंबर 2021 रोजी, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आझादी का अमृत महोत्सव चिन्हांकित करण्यासाठी ____ याद्वारे आयोजित केलेल्या वाणिज्य उत्सवाचे उद्घाटन केले – वाणिज्य विभाग, भारत सरकार.
  • हिमालयीन चित्रपट महोत्सवाची पहिली आवृत्ती 24 सप्टेंबर 2021 पासून ____ येथे सुरू होईल, ज्याचे आयोजन लडाख प्रशासनाने चित्रपट महोत्सव संचालनालय (DIFF) आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या सहकार्याने केले जात आहे – लेह, लडाख.

व्यक्ती विशेष

  • कन्नड भाषेसाठी ‘अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2020’ याचे विजेते – एस नटराज बुडालू.
  • इंग्रजी भाषेसाठी ‘अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2020’ याचे विजेते – श्रीनाथ पेरूर.
  • संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे पुरस्कृत ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क’ (SDSN) याने _____ यांना “SDG प्रोग्रेस अवॉर्ड” प्रदान केला, जो बांगलादेशमधील दारिद्र्य निर्मूलन, ग्रहाचे संरक्षण करण्यासाठी आणि सर्वांसाठी शांती आणि समृद्धी सुनिश्चित करण्याच्या सार्वत्रिक आवाहनाला दिलेल्या प्रतिसादासाठी दिला गेला आहे – शेख हसीना (बांगलादेशच्या पंतप्रधान).

क्रिडा

  • भारताचा 70 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर – आर. राजा त्विक (17 वर्षांचा).
  • ____ येथे डिसेंबर 2021 महिन्यात 75 व्या संतोष करंडक राष्ट्रीय वरिष्ठ फुटबॉल अजिंक्यपद’ स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन केले जाणार – केरळ (मंजेरी, मलप्पुरम जिल्हा येथे).

राज्य विशेष

  • ____ सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि निर्यातदारांना संस्थात्मक आधार देण्यासाठी एक “निर्यात प्रोत्साहन विभाग” (Export Promotion Bureau) स्थापन करणार असल्याच्या संदर्भात घोषणा केली – हरयाणा.
  • केरळ सरकारने 17 व्या शतकातील डच ऐतिहासिक संग्रहांचा वापर करून वर्ष 1643 ते वर्ष 1852 या कालावधीत केरळच्या इतिहासाचा नकाशा तयार करण्यासाठी ____ प्रकल्प अधिकृतपणे मंजूर केला आहे, जो केरळ कौन्सिल फॉर हिस्टोरिकल रिसर्च (KCHR), नेदरलँड राष्ट्रीय अभिलेखागार आणि नेदरलँडमधील लीडेन विद्यापीठ या संस्था राबविणार आहेत – कॉसमॉस मालाबेरिकसप्रकल्प.

सामान्य ज्ञान

  • राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (NCIB) याची स्थापना – वर्ष 1997.
  • राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) याची स्थापना – 23 डिसेंबर 2005.
  • गृहनिर्माण व शहरी विकास महामंडळ मर्यादित (HUDCO) याची स्थापना – 25 एप्रिल 1970.
  • केंद्रीय विद्यालय संघटनेची स्थापना – 15 डिसेंबर 1963.
  • विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना – 28 डिसेंबर 1953.
  • बार काऊंसिल ऑफ इंडिया – स्थापना: वर्ष 1961; मुख्यालय: नवी दिल्ली.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम