One Liners : एका ओळीत सारांश, 22 डिसेंबर 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
60

एका ओळीत सारांश, 22 डिसेंबर 2021

Admin

संरक्षण

  • BIMSTEC सदस्य राष्ट्रांसाठी ‘PANEX-21’ नामक एक मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कवायत 21 डिसेंबर 2021 रोजी _____ येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग येथे आयोजित करण्यात आली – पुणे, महाराष्ट्र.
  • नवीन स्वदेशी मल्टी-टेरेन आर्टिलरी गन 155-BR (MArG 155-BR) विकसित करणारी भारतीय कंपनी – भारत फोर्ज लिमिटेड, पुणे.

अर्थव्यवस्था

  • नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने ‘______’ नावाने एक नवीन कंपनी प्रशासन विषयक उपक्रम सुरू केला, जो एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्या स्वेच्छेने स्वीकारू शकतात – NSE प्राइम.

आंतरराष्ट्रीय

  • भारताचे नीती आयोगाचे अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि _____ या संस्थानी त्यांच्या महत्त्वाकांक्षी नाविन्यपूर्ण कृषी-तंत्र कार्यक्रमासाठी त्यांचे पहिले ‘अॅग्रीटेक चॅलेंज कोहोर्ट’ उपक्रमाचा प्रारंभ केला आहे, ज्याचा उद्देश आशिया आणि आफ्रिकेतील छोट्या शेतकर्‍यांना महामारीनंतरच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत करणे हा आहे – युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंड (UNCDF).

राष्ट्रीय

  • _____ संस्थेने 20 डिसेंबर 2021 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) सोबत एका आशय पत्रावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे तृणधान्याला मुख्य प्रवाहात आणण्यावर आणि भारतातील हवामानास अनुकूल शेती बळकट करण्यावर भर दिला जाईल – नीती आयोग.
  • भारतातील सर्वात मोठा ‘ड्रोन शो’ कार्यक्रम ______ येथे 20 डिसेंबर 2021 रोजी ‘अमृत महोत्सव’ मालिकेचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला – लखनऊ, उत्तर प्रदेश.
  • _____ (सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था) ही सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या ‘सार्वजनिक ग्रंथालयांना सहाय्याच्या जुळणार्‍या योजना’ अंतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान करते – राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन (कोलकाता).
  • _____ मंत्रालय ‘नॅशनल मिशन ऑन लायब्ररी स्कीम’ याची अंमलबजावणी करते – केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय.
  • सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली सहा सार्वजनिक ग्रंथालये – राष्ट्रीय ग्रंथालय (कोलकाता), केंद्रीय संदर्भ ग्रंथालय (कोलकाता), केंद्रीय सचिवालय ग्रंथालय (नवी दिल्ली), दिल्ली सार्वजनिक ग्रंथालय, खुदा बख्श ओरिएंटल सार्वजनिक ग्रंथालय (पटना) आणि रामपूर रझा ग्रंथालय (रामपूर).

राज्य विशेष

  • जम्मू व काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी AICTE संस्थेच्या _____ नामक वैयक्तिक आणि संस्थात्मक आनंद निर्देशांक अॅपचे अनावरण केले – युवर वन लाइफ (YOL).
  • _____ विभागाने 20 डिसेंबर 2021 रोजी ‘प्रोजेक्ट अभय’ हा प्रकल्प सुरू केला, जो मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल आणि अशासकीय संस्था यांचा एक संयुक्त उपक्रम आहे – दिल्ली पोली.

ज्ञान-विज्ञान

  • रबर मंडळ (भारत) अंतर्गत असलेल्या ______ संस्थेतील संशोधकांनी चार ते पाच दिवस लागणाऱ्या पारंपारिक पद्धतीऐवजी केवळ 24 तासांत ‘शीट रबर’ सुकवण्याची पद्धत विकसित केली – भारतीय रबर संशोधन संस्था (RRII).

सामान्य ज्ञान

  • E9 देश – बांगलादेश, ब्राझील, चीन, इजिप्त, भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, नायजेरिया आणि पाकिस्तान.
  • शिक्षण प्रणालींमध्ये वेगवान बदल करुन शाश्वत विकास उद्दिष्ट 4 यांच्या पुनर्प्राप्तीला गती देणे, हे ____ याचे ध्येय आहे – E9 पुढाकार.
  • निशस्त्रीकरण परिषद (Conference on Disarmament) – स्थापना: वर्ष 1984; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड; सदस्य: 65.
  • रासायनिक शस्त्रास्त्रे प्रतिबंधक संघटना (Organisation for the Prohibition of Chemical Weapons -OPCW) – स्थापना: 29 एप्रिल 1997; मुख्यालय: हेग, नेदरलँड; सदस्य: 193.
  • पारंपारिक शस्त्रे व दुहेरी-वापरायोग्य वस्तू व तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर  नियंत्रणासाठी वासेनर व्यवस्था – स्थापना: 12 जुलै 1996; सचिवालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया.
  • भारतीय अणुचाचणीनंतर, आण्विक पुरवठादार गट (NSG) याची स्थापना – मे 1974.
  • अण्वस्त्र प्रसारबंदी करार (Non-Proliferation Treaty -NPT) – स्वाक्षरी: 1 जुलै 1968; प्रभावी: 5 मार्च 1970; पक्ष: 190.
  • ऑस्ट्रेलिया गट (रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्राच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी) – स्थापना: वर्ष 1985; पक्ष: 43.
  • क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण प्रशासन (MTCR) – स्थापना: वर्ष 1987; पक्ष: 35.

 


One Liners : एका ओळीत सारांश, 22 डिसेंबर 2021
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम