One Liners : 19 जुलै | एका ओळीत सारांश : 19 जुलै

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
43

एका ओळीत सारांश, 19 जुलै 2021

Admin

आंतरराष्ट्रीय

  • 2018 साली _______ येथे झालेल्या जीवाश्म खणणाची “जगातील सर्वात मोठे जीवाश्म खणण” या शीर्षकाखाली अधिकृतपणे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकात नोंद झाली, ज्यामध्ये जवळजवळ 1000 लोकांचा सहभाग होता आणि जवळजवळ 2000 जीवाश्म शोधले गेले होते – पेन डिक्सी फॉसील पार्क अँड नेचर रिझर्व (ब्लास्डेल, न्यूयॉर्क, अमेरिका).
  • आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने (ISO) सर्वांसाठी प्रवेशयोग्य पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन आणि संबंधित सेवांसाठी जगातील प्रथम मानक “_____” प्रकाशित केले – ISO 21902.

राष्ट्रीय

  • भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) स्थापन केलेल्या “पंडित दीनदयाल उपाध्याय कृषी विज्ञान पुरस्कार 2020’ याचा विजेता – कृषी विज्ञान केंद्र, कलबुरागी.

व्यक्ती विशेष

  • भारतीय कृषी संशोधन परिषदेने स्थापन केलेल्या ‘कृषी संशोधनामध्ये उत्कृष्टततेसाठी नॉर्मन बोरलॉग राष्ट्रीय पुरस्कार’चे विजेता – काजल चक्रवर्ती.

क्रिडा

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवीन सदस्य (यासह ICCची एकूण सदस्य संख्या: 106) – मंगोलिया, ताजिकिस्तान (आशियातील 22 वा आणि 23 वा सदस्य) आणि स्वित्झर्लंड (युरोपचा 35 वा सदस्य).

राज्य विशेष

  • 18 जुलै रोजी लागू झालेल्या ‘किसान मित्र ऊर्जा योजना’ अंतर्गत _____ राज्यामधील शेतकर्‍यांना मासिक 1000 रुपये अनुदान मिळेल – राजस्थान.
  • _____ राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने सरकार आणि सरकार-अनुदानित महाविद्यालयांसाठी MOODLE लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम नामक प्रणाली कार्यरत केली – मणिपूर.
  • सेंद्रिय उत्पादनांची खरेदी-विक्री करण्यासाठी शेतकरी आणि खरेदीदार यांच्यात समन्वय व वाटाघाटीसाठी राजस्थानच्या कृषी विभागाने विकसित केलेला नवीन मोबाइल अॅप – ‘राज किसान ऑरगॅनिकऍप.
  • ____ येथे एक सांस्कृतिक केंद्र उभारण्यासाठी हरयाणा सरकारला तत्वत: मान्यता मिळाली आहे – कुरुक्षेत्र.
  • ओडिशाचा पहिला ‘ग्रास आर्ट पार्क’ ___ येथे उभारला गेला आहे – ITI  बेरहमपूर.

ज्ञान-विज्ञान

  • _______ संस्थेच्या संशोधकांनी वनस्पतींमध्ये एक महत्त्वाचे जीन ओळखले आहे, जे बियाणाला रोपटे बनवते – भारतीय विज्ञान शिक्षण संशोधन संस्था (IISER) भोपाळ.
  • जगात प्रथमच, ______ संस्थेच्या संशोधकांनी प्रयोगशाळेत चॉकलेट तयार केले आहे, ज्यामुळे केवळ एक कोको बी चॉकलेट बनविण्याच्या कारखान्यात बदलू शकते – ज्यूरिख युनिव्हर्सिटी ऑफ एप्लाइड सायन्सेस, स्वित्झर्लंड.

सामान्य ज्ञान

  • “विधानसभेच्या निवडणुकांच्या संदर्भात तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 327.
  • “विधानसभेच्या निवडणुकांच्या संदर्भात तरतूद करण्यासाठी राज्याच्या विधानसभेचा अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 328.
  • “निवडणूकीच्या संदर्भातल्या मुद्द्यांमध्ये न्यायालयांकडून हस्तक्षेप होता कामा नये” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 329.
  • “लोकसभेत अनुसूचित जाती व जमातींसाठी जागांचे आरक्षण” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 330.
  • “लोकसभेत अँग्लो-भारतीय समुदायाचे प्रतिनिधित्व” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 331.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम