One Liners : 18 जुलै | एका ओळीत सारांश : 18 जुलै
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 18 जुलै 2021
दिनविशेष
- नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस – 18 जुलै.
संरक्षण
- 16 जुलै 2021 रोजी भारतीय नौदलाला _____ देशाच्या नौदलाकडून दोन MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर प्राप्त झालेत – अमेरिका.
आंतरराष्ट्रीय
- ईस्वातिनी (दक्षिण आफ्रिकेचा एक देश) देशाचे नवीन पंतप्रधान – क्लेओप्स द्लामिनी.
- संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटनेच्या (FAO) नेतृत्वात ‘DEAL’ (Data for the Environment, Agriculture and Land Initiative) या उपक्रमांतर्गत अचूक, सर्वसमावेशक आणि सुसंवादी डिजिटल भूमीपयोग व भूमीपयोगी बदलाच्या माहितीचा संग्रह पूर्ण करणारा जगातील पहिला खंड – आफ्रिका.
राष्ट्रीय
- व्यक्ती-जवळील सरकारी सुविधा शोधण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ____ सोबत सामंजस्य करार करून उमंग अॅपमध्ये नकाशा सेवा सक्षम केल्या आहेत – मॅपमायइंडिया.
- ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) कंपनीने _____ नामक इमारत बांधणी सेवांसाठी कमीतकमी ऊर्जा कार्यक्षमतेच्या आवश्यकतेसाठी एक आदर्श संहिता आणि सत्यापन चौकट प्रसिद्ध केली – ‘इको निवास संहिता 2021’.
व्यक्ती विशेष
- ‘माटी घोडा’ पुस्तकाचे लेखक – प्रदीप्त महापात्रा.
- वर्ल्ड बायोइकॉनॉमी फोरमने त्याच्या सल्लागार समितीमध्ये _____ (प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष) यांची नेमणूक केली – प्रमोद चौधरी.
राज्य विशेष
- ____ राज्याने “डिजिटल साथी – बच्चों का सहारा, फोन हमारा” या नावाने ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाइल फोन दान करण्याचे भारताचे पहिले अभियान सुरू केले – हिमाचल प्रदेश.
- दिल्ली विद्युत नियामक आयोगाचे नवीन अध्यक्ष – न्यायमूर्ती शबीहुल हसनैन.
ज्ञान-विज्ञान
- _____ येथील संशोधकांनी 3,001 किलोमीटर लांबीच्या प्रक्षेपणाच्या रूपात 319 टेराबाइट्स प्रति सेकंद एवढ्या जगातील सर्वात वेगवान इंटरनेट गतीने नवीन विश्व विक्रम नोंदविला – राष्ट्रीय माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान संस्था, जपान.
- ______ संस्थेने आचार्य नागार्जुन विद्यापीठ आणि इकोलास्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत्त जैव-विघटनयोग्य वेष्टन उत्पादने बाजारात आणण्यासाठी करार केला – संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO).
सामान्य ज्ञान
- “अखिल भारतीय सेवा” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 312.
- “संक्रमणकालीन तरतुदी” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 313.
- “संघ व राज्यांसाठी लोकसेवा आयोग” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 315.
- “निवडणूक आयोगाच्या निहित असणारया निवडणुकांचे अधीक्षण, निर्देश आणि नियंत्रण” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 324.
- “धर्म, वंश, जाती किंवा लिंगाच्या आधारावर कोणतीही व्यक्ती मतदार यादीमध्ये समावेश करण्यास अपात्र नाही किंवा व्यक्तीचा विशेषतः मतदार यादीमध्ये समावेश केल्याचा दावा करू शकत नाही” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 325.
- “प्रौढ मताधिकाराच्या आधारे लोकसभेची आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 326.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents