One Liners : एका ओळीत सारांश, 18 डिसेंबर 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
62

 

एका ओळीत सारांश, 18 डिसेंबर 2021

Admin

दिनविशेष

  • अरबी भाषा दिवस – 18 डिसेंबर.
  • 2021 साली ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरित लोक दिवस’ (18 डिसेंबर) याची संकल्पना – हारनेसिंग द पोटेंशियल ऑफ ह्यूमन मोबिलीटी.

अर्थव्यवस्था

  • ________ याच्या संशोधकांनी ‘डिमांड-सप्लाय मिसमॅच इंडेक्स’ तयार केला आहे जो महागाईचा अंदाज लावू शकतो – भारतीय रिझर्व्ह बँक.

पर्यावरण

  • “युमिलिपेस पर्सेफोने” असे नाव देण्यात आलेल्या मिलिपीड किंवा सहस्त्रपाद (संधिपाद / arthropod प्राणी) याची नवीन प्रजाती ______ देशात शोधण्यात आली आहे, जो तब्बल 1,306 पाय असलेला पहिला ज्ञात सहस्त्रपाद आहे – ऑस्ट्रेलिया.

आंतरराष्ट्रीय

  • भारताचे राष्ट्रपती, श्री राम नाथ कोविंद यांनी _____ येथे नूतनीकरण केलेल्या ऐतिहासिक ‘रामना काली’ मंदिराचे उद्घाटन केले – ढाका, बांगलादेश.
  • बांग्लादेश शिष्टमंडळाने 17 डिसेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथील सफदरजंग रेल्वे स्टेशनपासून _____ पर्यंत “स्वर्णिम विजय वर्ष स्पेशल” रेलगाडीने प्रवास सुरू केला – आग्रा.
  • ______ सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘नगादग पेल गी खोर्लो’ नामक आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला – भूतान.

राष्ट्रीय

  • पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 17 डिसेंबर 2021 रोजी _____ येथे आयोजित अखिल भारतीय महापौर परिषदेचे उद्घाटन केले – वाराणसी, उत्तर प्रदेश.
  • उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी 16 डिसेंबर 2021 रोजी ‘महिलांमधील क्षयरोग विषयक राष्ट्रीय संसदीय परिषद’चे उद्घाटन केले, जे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालय यांनी ____ येथे आयोजित केले होते – नवी दिल्ली.
  • ‘नदी उत्सव’ 16 डिसेंबर 2021 रोजी सुरू झाला आहे, जो ___ याने आयोजित केला आहे – केंद्रीय जलशक्ती मंत्रालय.

क्रिडा

  • भारतीय भारोत्तोलक _______ने ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे ‘राष्ट्रकुल भारोत्तोलक अजिंक्यपद 2021’ या स्पर्धेच्या महिलांच्या +87 किलो गटात सुवर्णपदक जिंकण्यासोबतच आठ राष्ट्रीय विक्रम रचले – पूर्णिमा पांडे.

राज्य विशेष

  • तामिळनाडूचे राज्य गीत – तमि थाई वजथू.
  • गोवा मुक्ती दिवस – 19 डिसेंबर.
  • भारत सरकार आणि जर्मनी डेव्हलपमेंट बँक (KFW) यांनी _____ प्रकल्पासाठी 442.26 दशलक्ष युरो एवढ्या निधीसाठी कर्जावर स्वाक्षरी केली – सूरत मेट्रो रेल्वे.
  • ______ सरकारने राज्यातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेल नर्सरी योजना 2022-23’ लागू केली, ज्याअंतर्गत सरकारी, खासगी शैक्षणिक संस्था आणि खासगी क्रिडा संस्थांमध्ये खेल नर्सरी सुरू केल्या जातील – हरयाणा.

सामान्य ज्ञान

  • जागतिक बँक – स्थापना: वर्ष 1944; मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका.
  • इस्लामिक विकास बँक (IsDB) – स्थापना: वर्ष 1975; ठिकाण: जेद्दा, सौदी अरब.
  • आशियाई विकास बँक (ADB) – स्थापना: 19 डिसेंबर 1966; मुख्यालय: मंडलयुंग, फिलिपिन्स
  • आफ्रिका विकास बँक (AfDB) – स्थापना: 10 सप्टेंबर 1964; मुख्यालय: अबिजान, कोट डीआईवर.
  • नवीन विकास बँक (पूर्वीची BRICS विकास बँक) – स्थापना: वर्ष 2015; मुख्यालय: शांघाय, चीन.

One Liners : एका ओळीत सारांश, 18 डिसेंबर 2021
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम