One Liners : 16 जुलै | एका ओळीत सारांश : 16 जुलै

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
53

एका ओळीत सारांश, 16 जुलै 2021

Admin

संरक्षण

  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ‘पब्लिक ग्रिव्हेंस रिड्रेस अँड मॉनिटरींग सिस्टम (CPGRAMS)’ नामक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रावर आधारित तक्रार व्यवस्थापन अॅपचे उद्घाटन केले, जे ____ या संस्थेच्या मदतीने संरक्षण मंत्रालयाने विकसित केले आहे – IIT कानपूर.

अर्थव्यवस्था

  • भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्ड वितरित करणाऱ्या _____ कंपनीला 22 जुलै 2021 पासून नवीन देशांतर्गत ग्राहकांना कार्ड वाटप करण्यापासून रोखले आहे – मास्टरकार्ड.
  • _____ बँकेने विविध डिजिटल बँकिंग उत्पादने, फिनटेक भागीदारी आणि डिजिटल विपणन यांचा विकास करण्यासाठी मुंबईत नमन सेंटर येथे ‘डिजिटल व्हर्टिकल’चे उद्घाटन केले – युनियन बँक ऑफ इंडिया.

आंतरराष्ट्रीय

  • आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (ASEAN) आणि _____ यांनी जगातील पहिल्या ब्लॉक-टू-ब्लॉक हवाई परिवहन कराराला मान्यता दिली – युरोपिय संघ.

राष्ट्रीय

  • इंडियन अकॅडमी ऑफ हायवे इंजिनियर्स (IAHE) या संस्थेने _____ येथे प्रगत परिवहन तंत्रज्ञान आणि प्रणाली केंद्र (CATTS) स्थापित करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स (ऑस्ट्रेलिया) सोबत करारावर स्वाक्षरी केली – IAHE, नोएडा.
  • ध्रुवीय विज्ञानाच्या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये परस्पर सहमती दर्शविण्याच्या उद्देशाने _____ आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या दरम्यान सामंजस्य करार झाला – जैवतंत्रज्ञान विभाग.
  • ______ यांची भारतातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये आंतरराष्ट्रीय उत्पादने, वित्तीय सेवा आणि वित्तीय संस्था विकसित आणि नियमित करण्यासाठी एक एकीकृत नियामक संस्था म्हणून स्थापना केली गेली आहे – आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA).

क्रिडा

  • क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘टोकियो ऑलिम्पिक 2020’ यामध्ये भाग घेणाऱ्या भारतीय संघासाठी ____ या शीर्षकाचे अधिकृत गाणे सादर केले – चीअर4इंडिया: हिंदुस्थानी वे.
  • ______ यांना ‘टोकियो ऑलिम्पिक 2020’ यामधील ‘ऑलिम्पिक लॉरेल’ सन्मान प्राप्त झाला असून ते हा सन्मान प्राप्त करणारे किप केनो नंतर दुसरे ठरले आहे – मुहम्मद युनुस (बांग्लादेश).

राज्य विशेष

  • ‘रुद्राक्ष’ नावाचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्राचे उद्घाटन ____ येथे झाले – वाराणसी, उत्तर प्रदेश.
  • मध्य प्रदेश राज्य विधी सेवा प्राधिकरणाने ____ या तीन जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक प्रकल्प म्हणून ऑनलाइन तंटा निवारण मंचाचे उद्घाटन केले – ग्वाल्हेर, जबलपूर आणि भोपाळ.
  • _____ जिल्ह्यात देशातील पहिले ‘धान्य वितरण एटीएम’ सुरू करण्यात आले आहे – गुरुग्राम, हरयाणा.

ज्ञान-विज्ञान

  • गगनयान कार्यक्रमाचा भाग म्हणून ISRO संस्थेने _____ इंजिनची तृतीय दीर्घ कालावधीसाठी यशस्वी चाचणी घेतली – विकास इंजिन.

सामान्य ज्ञान

  • मेघालय, त्रिपुरा आणि मणीपूर या राज्यांची स्थापना – 21 जानेवारी 1972.
  • “वस्तू व सेवा कर परिषद” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 279().
  • “वित्त आयोग” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 280.
  • “भारत सरकारचे कर्ज घेणे” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 292.
  • “राज्याचे कर्ज घेणे” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 293.
  • “राज्याच्या हद्दीत येणाऱ्या मौल्यवान स्त्रोत आणि विशेष आर्थिक क्षेत्र, संपदा स्त्रोतांचे संघात असणे” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 297.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम