One Liners : एका ओळीत सारांश,16 डिसेंबर 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 16 डिसेंबर 2021
अर्थव्यवस्था
- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) निर्णयानुसार, _______ आणि शेड्युल्ड स्मॉल फायनान्स बँका सरकारी संस्थेचे आर्थिक व्यवसाय हाताळण्यास पात्र असतील – शेड्युल्ड पेमेंट बँका.
- NSE इंडिया (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) यांचा नवीन इंडेक्स, ज्याचा उद्देश डिजिटल या संकल्पनेच्या संपर्कात असलेल्या कंपन्यांची कामगिरी मोजणे हा आहे – निफ्टी इंडिया डिजिटल इंडेक्स.
आंतरराष्ट्रीय
- _____ येथील संयुक्त राष्ट्रसंघ अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) मुख्यालयात “शेख मुजीब-बांगलादेश कक्ष”ची स्थापना करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली – रोम, इटली.
राष्ट्रीय
- केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात ______ आणि कमी मूल्याच्या [रु. 2,000 पर्यंत] BHIM-UPI व्यवहारांना [व्यक्ती-ते-व्यापारी (P2M)] प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रोत्साहन योजना मंजूर केली – रुपे डेबिट कार्ड.
- 15 डिसेंबर 2021 रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील शाश्वत _____ आणि इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले परिसंस्थेच्या विकासासाठी सर्वसमावेशक कार्यक्रमास मान्यता दिली – सेमीकंडक्टर.
- आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने _____ या कालावधीसाठी 93,068 कोटी रुपयांच्या खर्चासह ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ (PMKSY) याच्या अंमलबजावणीस मान्यता दिली – 2021-26.
- _____ येथे रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम (RPAS) सह एकात्मिक केलेला ‘विहंगम’ नावाचा इंटरनेट-आधारित मंच कार्यरत करण्यात आला – महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (MCL).
- NTPC लिमिटेड ही कंपनी ______ येथे “इलेक्ट्रोलायझर वापरून हायड्रोजन उत्पादनासह स्टँडअलोन फ्युएल-सेल आधारित मायक्रो-ग्रिड” याचा प्रकल्प उभारणार आहे, जो भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन आधारित ऊर्जा भांडार प्रकल्प आहे – सिंहाद्री (विशाखापट्टणम जवळ).
क्रिडा
- प्रथम राष्ट्रीय स्तरावरील ‘खेलो इंडिया महिला हॉकी लीग (अन्डर 21)’ या स्पर्धेचे उद्घाटन 15 डिसेंबर 2021 रोजी _____ येथे झाले – मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रिडामैदान, नवी दिल्ली.
- ‘स्पोर्ट्स जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया (SJFI) पदक 2021’ याचा प्राप्तकर्ता – सुनील गावस्कर.
राज्य विशेष
- ______ सरकारने 15 डिसेंबर 2021 रोजी ‘सामान्य प्रवर्ग आयोग’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला – पंजाब.
- झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 15 डिसेंबर 2021 रोजी ____ जिल्ह्यातून ‘सहाय / SAHAY योजना’ (Sports Action Towards Harnessing Aspirations of Youth) याचे उद्घाटन केले – पश्चिम सिंगभूम.
- ओडिशा राज्याचे नवीन पोलीस महासंचालक (DGP) – सुनील कुमार बन्सल.
ज्ञान-विज्ञान
- अमेरिकेच्या NASA संस्थेच्या _______ नामक अंतराळयानाने सूर्याच्या कोरोना क्षेत्रात प्रवेश करून सूर्याला अधिकृतपणे “स्पर्श” केला – पार्कर सोलर प्रोब.
सामान्य ज्ञान
- भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – स्थापना: 1 एप्रिल 1935; मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र.
- भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) – स्थापना: वर्ष 1999; स्थान: हैदराबाद, तेलंगणा.
- भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) – स्थापना: 14 ऑक्टोबर 2003; मुख्यालय: नवी दिल्ली.
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) – स्थापना: 15 ऑगस्ट 1969; मुख्यालय: बंगळुरू, कर्नाटक.
- भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) – स्थापना: 2 एप्रिल 1990; मुख्यालय: लखनऊ, उत्तरप्रदेश.
App Download Link : Download App
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents